03 March 2021

News Flash

कलात्मक सजावटीचा आकर्षक पर्याय

शिवाय, हल्ली पर्यावरण जागरूकतेपायी अनेक जण पर्यावरणस्नेही मूर्ती किंवा त्या स्वरूपाची आरास करण्यावर भर देतात

पेपर मॅश अर्थात कागदाचा लगदा
गणपतीची सजावट म्हटली की, थर्माकोल हा एकमेव पर्याय नजरेसमोर असतो. पण कागदाच्या लगद्यातूनही कलात्मक आणि आकर्षक सजावट सहज शक्य आहे. तेव्हा जाणून घेऊ या पेपर मॅश अर्थात कागदाच्या लगद्यातून तयार होणाऱ्या सजावटीविषयी
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळेच घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू असेल. अनेक घरी मखरांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल. तर बऱ्याच जणांना यावर्षी मखरासाठी काय संकल्पना निवडावी, असा प्रश्नदेखील पडला असेल. शिवाय, हल्ली पर्यावरण जागरूकतेपायी अनेक जण पर्यावरणस्नेही मूर्ती किंवा त्या स्वरूपाची आरास करण्यावर भर देतात. फक्त पानां-फुलांची आरास केली म्हणजे ती पर्यावरणस्नेही झाली का? तर नाही. यात देखील अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि याचविषयी आपल्याला खास मार्गदर्शन करीत आहेत हॉबी आयडियाज् डॉट इनच्या तज्ज्ञ सोनल सूर्यवंशी.
त्यांच्या मते, गणपतीसाठी आसन,आरास किंवा इतर कोणत्याही प्रकारची सजावट करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे पेपर मॅश अर्थात कागदाचा लगदा. पेपर मॅश हे नवीन उत्पादन बाजारात उपलब्ध आहे नि वापरायला देखील तो सहज, सोपा आहे. हा वाळविलेला कागदाचा लगदा असून त्यात गरजेनुसार पाणी घालून कणीक मळतो, त्याप्रमाणे तो मळून घ्यावा.
या मळलेल्या गोळ्यापासून गणपतीची सहा ते आठ इंची मूर्ती, पाने, फुले, हॅिगग बॉल्स् अशा सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू यांपासून बनवू शकतो. ते देखील आपल्या आवडीच्या रंगात, आकारात.
मुळातच हा लगदा पांढरा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या गोळ्याला सोनेरी, चंदेरी रंगापासून ते नॅचरल शेडस्मध्ये उपलब्ध असलेल्या पिवळा, नािरगी अशा कोणत्याही रंगात रंगवू शकतात. याचा एक फायदा असा होतो की, तुम्हाला अपेक्षित असलेली रंगसंगती सहज साध्य करता येते. बऱ्याचदा असे आढळून येते की, या सणावारांच्या काळात महागाई चांगलीच वाढलेली असते. नेमके याच वेळेला हव्या त्या रंगातील फुलेदेखील मनाजोगी मिळत नाहीत. अशा वेळी या लगद्याचा वापर करून हव्या त्या रंगातील, हव्या त्या आकाराची पाने-फुले तुम्ही सहजगत्या तयार करू शकता नि ती नसíगक फुलांपानांपेक्षा अधिक काळ टिकणारी देखील असतात. तेव्हा पाहू या, आकर्षक आणि सहज करता येण्याजोग्या सजावटीविषयी-

कलात्मक पंखा
तुमच्या आवडीच्या रंगाचा टिंडेड पेपर, पेन्सिल, क्वििलग टूल, लाल व पिवळ्या रंगांचे कार्ड पेपर.
टिंडेड पेपरच्या एकाच रंगातील कमीत कमी सहा शीटस् घ्याव्यात. कागदाचे एक उलट एक सुलट असे फोल्ड करून जसा पंखा तयार करतो, तसे पंखे तयार करून घ्यावेत. हे पंखे गोलाकार रीतीने एकमेकांना जोडल्यास एक मोठा पंखा तयार होईल.
आता लाल व पिवळ्या रंगाच्या पेपरचा १४ इंच व्यास असलेला वर्तुळ कापा. लाल रंगाच्या पेपरचे तेरा तर पिवळ्याचे दहा असा स्पायरल आकारामध्ये पेपर कापा. क्वििलगटुलच्या साहाय्याने या स्पायरलची फुले तयार करा. अशा प्रकारे तयार झालेल्या फुलांनी या पंख्यावर सजावट करा.

सूर्यफूल
ws02r
कॅनव्हास पेपर, नािरगी कार्ड पेपर, गोलाकार छोटे आरसे, एमडीएफ वुडन प्लेसमॅट, कात्री, आवडीचे अ‍ॅक्रेलिक रंग, पेपर रोल, इ.
एक कॅनव्हास पेपर घेऊन त्याला तुमच्या आवडीचा रंग द्या आणि सुकू द्या. मग नािरगी रंगांचा कार्ड पेपर घेऊन त्याचा २०बाय २० आकाराचा चौरस कापा. या चौरसाला त्रिकोणी घडी घाला. जसे पोळीचे चतकोर तुकडे करतो तसा त्याचा आकार होईल. हा कागद उघडल्यानंतर ते सूर्यफुलाच्या पाकळ्याप्रमाणे दिसेल. आता वुडन प्लेसमॅट घेऊन त्यावर आवडीचा रंग द्यावा नि तो सुकू द्यावा. त्यावर मग फेविक्रिलच्या साहाय्याने छोटे छोटे आरसे चिकटवत तो गोल पूर्ण भरावा.
पेपर रोलची एक रिंग बनवा. त्यावर कार्ड पेपरचे फूल चिकटवा. या फुलाच्या पाकळ्या कडेने किंचितशा वाकवा. त्यामुळे ते खऱ्या सूर्यफुलासारखे वाटेल. हे पूर्ण सुकल्यानंतर त्यावर आरशाची प्लेसमॅट चिकटवा. अशा तऱ्हेने तयार होणारे सूर्यफूल गणपती मूर्तीच्या पाठीमागे ठेवावे. यामुळे मूर्तीला नजर लागू नये म्हणून जी एक आरसा ठेवण्याची पद्धत असते ती देखील इथे पूर्ण होईल नि सजावट देखील तितकीच सुबक आणि अर्थपूर्ण दिसेल.

चटई-आसन
ws03r

रद्दी पेपर, अ‍ॅक्रेलिक रंग तुमच्या आवडीचे, कात्री, सजावटीसाठीचे साहित्य
घरातील रद्दी पेपरच्या एक ते दोन इंच लांबीच्या पट्टय़ा तयार कराव्यात. त्या तुमच्या आवडीच्या अ‍ॅक्रेलिक रंगाने रंगाव्यात. मग या पट्टय़ा एकमेकांत गुंफून त्याची छानशी चटई तयार करावी. त्या तुमच्या आवडीच्या अ‍ॅक्रेलिक रंगाने रंगाव्यात. या चटईच्या कोपऱ्यांवर फुले अथवा मोती किंवा चमचमणाऱ्या टिकल्या चिकटवून तुमच्या आवडीप्रमाणे सजावट किंवा नक्षीकाम करा. अशी ही आकर्षक चटई गणपतीच्या मूर्तीखाली आसन म्हणून खूप छान शोभून दिसते.

अशा या पर्यावरणस्नेही कागदाच्या लगद्यापासून सुबक, आकर्षक सजावट करून यंदा गणपती बाप्पासह पर्यावरणाची देखील तितकीच काळजी घेत सणाचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणीत करूया. यासंदर्भात अधिक माहितीसाठी www.hobbyideas.in ही वेबसाइटवर पाहू शकता.
सुचित्रा प्रभुणे  suchup@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:55 am

Web Title: ganpati decoration with paper
Next Stories
1 लहान मुले असलेल्या घर ग्राहकांनी घ्यावयाची दक्षता
2 गणपती येती घरा!
3 गृहखरेदीचा श्रीगणेशा
Just Now!
X