News Flash

घर स्वच्छ ठेवण्यासाठी..

घरी आल्यावर घर नीटनेटके आणि छान सजवलेले असणे ही आपल्यापकी अनेकांची सुंदर घराची कल्पना असते.

घरी आल्यावर घर नीटनेटके आणि छान सजवलेले असणे ही आपल्यापकी अनेकांची सुंदर घराची कल्पना असते. आधुनिक जीवनपद्धतीचा वाढता वेग आणि आपली जगण्याची तऱ्हा यामुळे आपल्याकडे आरामात स्वत:च सगळी साफसफाई करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. या पाश्र्वभूमीवर घराची स्वच्छता राखण्यासाठीच्या काही युक्त्या.

१) पसारा कमी करा, विभागणी करा

एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामांची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल. वेळेचीही विभागणी करा. पंखे, छत, िभती मग फíनचर आणि शेवटी लादी अशी विभागणी करून साफसफाई करा. पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या. विशेषत: कोपरे, कप्पे आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा.

२) स्वच्छतेचे पारंपरिक मार्ग सोडून आधुनिकतेकडे जाण्यास घाबरू नका

नेहमीच्या पद्धतीने केरकचरा काढणे, लादी पुसणे याला सगळ्यांचीच मान्यता असते. कोपऱ्यांच्या साफसफाईचा वेळ कमी करणारी अनेक सोईस्कर आणि अधिक परिणामकारक साधने उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेले ट्रिपल आय टेक्नॉलॉजीचे व्हॅक्यूम क्लीनर्स फारच उततम आहेत. यामुळे साफसफाईचे काम सोपे, कमी वेळात होते. या उपकरणांमधून बाहेर पडणाऱ्या निगेटिव्ह आयओन्समुळे धूळ, धूर, बुरशीसारखे हवेतील सूक्ष्म कण निकामी होतात. त्यामुळे तुम्ही शुद्ध हवेत श्वास घ्याल याची खात्री होते.

३) साफसफाईसाठी आधुनिक उपकरणांचा वापर

या बाबतीत आधुनिक पद्धतीचे स्प्रे मॉप्स कामी येतात. बाजारात काही टू-इन-वन मॉप उपलब्ध आहेत. यामुळे कोरडी धूळ आणि ओला पृष्ठभाग एका फटक्यात स्वच्छ होतात. वाकून, अवघडलेल्या स्थितीत पुसण्यापासून  मुक्ती मिळते आणि हे कामही मजेचे वाटू लागते. घरातील कामे अधिक सोपी आणि विनाकटकटीची व्हावीत यासाठी अनेक यांत्रिक पर्याय उपलब्ध आहेत. आजही अनेक स्त्रिया स्वत:च सगळी कामे करण्याचा अट्टहास धरतात आणि त्यातून चाळिशीच्या पुढील ७० टक्के भारतीय स्त्रियांना खांदा आणि पाठदुखीचा त्रास उद्भवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

४) अत्याधुनिक तंत्रज्ञान

बाजारात अनेक नवी आणि आधुनिक उत्पादने उपलब्ध आहेत. धूूळ आणि कचरा शोषून घेण्यासोबतच लादीवरील ओलावा शोषून घेऊन लादी स्वच्छ करण्याची खास सोय अशा विविध उपयोगांसाठीचे डीप क्लीिनग तंत्रज्ञान असलेल्या वेट अ‍ॅण्ड ड्राय वॅक्यूम क्लीनर्सचा वापर करा.

५) घरातील महत्त्वाच्या जागांचा प्राधान्यक्रम ठरवा

घरातील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेसाठी अधिक वेळ द्या. विशेषत: दिवाणखाना आणि बेडरूम्समधील कोनाडय़ांकडे लक्ष द्या. दिवाणखाना आणि स्वयंपाकघराकडेही नीट लक्ष द्या. पाहुण्यांचा वावर याच ठिकाणी अधिक असतो. व्हॅक्यूम क्लीनर हलके आणि कुठेही नेता येण्यासारखे असतात. त्यामुळे किचकट कोपऱ्यांची स्वच्छता करणेही सोपे होते.

६) कपाटे, खिडक्या, आरसे, विद्युत उपकरणे आणि इतर छोटय़ा कोपऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका

कपाटातील नको असलेल्या वस्तू टाकून द्या. सणांच्या निमित्ताने आरसे आणि खिडक्यांकडे लक्ष देण्याचीही चांगली संधी मिळते. काही छोटेमोठे बदलही करता येतील. शोभेचे लॅम्प्स, दिव्यांची आवरणेही पुसून घ्या. त्यामुळे घरात अधिक उजेड पडेल. अत्याधुनिक स्प्रे मॉप्स बहुपयोगी असल्याने हे काम अतिशय सोपे होते.

७) स्वच्छतेच्या जुजबी संकल्पनांकडे लक्ष न देता नेहमीच हायजिनचा विचार करा

स्वच्छता आणि नीटनेटके घर यातून मिळणाऱ्या ‘फील गुड’ भावनेमुळे तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा दिवस आनंदात जातो. इतकी चांगली स्वच्छता आणि त्याचबरोबर तुमची सोय हे सर्वकाही मिळते फक्त युव्ही सॅनिटायझरचा पर्याय असलेल्या क्लीनर्समधून.

मग, यापूर्वी कधीही केले नव्हते अशा प्रकारे घर स्वच्छ करा आणि वर्षभर आरोगयदायी राहणीमानाचा लाभ घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 5:38 am

Web Title: habits to keep the house clean
Next Stories
1 भाडेतत्त्वावरील मालमत्तांसाठी..
2 उद्यानवाट : निसर्गाच्या सान्निध्यात..
3 वॉटरप्रूफिंग : इमारतीचे वॉटरप्रूफिंग कशासाठी?
Just Now!
X