24 November 2017

News Flash

वृद्धांसाठी घरात हे कराच!

वृद्धत्वामुळे नजर कमजोर होत असल्याने तुमचे घर प्रकाशमान ठेवणे अत्यावश्यक आहे.

लोकसत्ता टीम | Updated: August 19, 2017 4:44 AM

तुमचे घर खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी आरामदायी ठिकाण आहे. एक आकर्षक बेड, मनाला शांतावणारे रंग आणि तुम्ही स्वत:चा म्हणू शकता असा एक निवांत कोपरा. परंतु जसजसे वय वाढू लागते तसे काही अन्य आवश्यक बदल घरात करणे गरजेचे असते. वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या घरात वावरणे सहज सोपे होईल यासाठी गृहसजावटीतील काही सूचना.

हॅण्डरेल लावणे

हॅण्डरेलचा वृद्धांना खूप फायदा होतो, कारण वयस्क माणसांचा चालताना तोल जाईल की काय याची भीती असते. परंतु हॅण्डरेलने त्यांच्या मनातील ही भीती दूर होते. खरे तर, बाथरूमपासून सगळीकडे हॅण्डरेल लावावे, जिथे धरण्यासाठी काहीही नसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक ठरते. ही एखादी माíगका असेल. ज्येष्ठांना प्रत्यक्ष मदत करण्याशिवाय, हॅण्डरेल त्यांचा आत्मविश्वासही वाढवतील. तुमच्या घराच्या रचनेचा एक भाग वाटतील अशा रीतीने तुम्ही हॅण्डरेल लावू शकता.

तुमचे घर प्रकाशमान ठेवा

वृद्धत्वामुळे नजर कमजोर होत असल्याने तुमचे घर प्रकाशमान ठेवणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाला आपल्या घरात कुठे-कसे फिरायचे हे माहीत असले तरी, एखाद्या वस्तूवरून अडखळण्याची शक्यता असते. घरात भरपूर प्रकाश असल्यास असे अपघात  टाळता येतील. विशेषत: बाथरूमकडे जाणाऱ्या माíगकेत छोटे एलईडी दिवे लावा. ते नेहमीच्या दिव्यांसारखे खूप प्रकाशमान नसतात आणि ते खूप वीजही खर्च करीत नाहीत.

अँटी स्किड टाइल्स लावणे

स्किड प्रूफ असलेल्या टाइल्स लावल्याने तुमच्या अध्र्या चिंता मिटतात. या टाइल्सचा पोत नेहमीच्या टाइल्ससारखा गुळगुळीत नसतो आणि त्यामुळे बाथरूममधील अपघात टाळता येऊ शकतात.

सपाट पृष्ठभाग ठेवणे

ज्येष्ठ नागरिकांचे तुमच्या सर्व खोल्यांच्या प्रवेशद्वारामधून अडखळणे टाळण्यासाठी उंचवटे बांधणे टाळा. त्याऐवजी, संपूर्ण घरात सपाट पृष्ठभाग ठेवा, जेणेकरून वृद्धांना सहजपणे चालणे आणि व्हीलचेअर असेल तर फिरणे शक्य होईल. तुमच्या घरात व्हीलचेअर वापरणारे ज्येष्ठ नागरिक असल्यास तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे स्क्रॅच न होणाऱ्या टाइल्सचा वापर करणे, जेणेकरून तुमच्या टाइल्स कायमस्वरूपी नेहमीसारख्या चकचकीत राहतील.

विविध प्रकारच्या उपलब्ध उत्पादनांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांची काळजी घेऊ शकता.

केतन त्रिवेदी (वरिष्ठ महाव्यवस्थापक, मार्केटिंग, एचअ‍ॅण्डआर जॉन्सन)

First Published on August 19, 2017 4:44 am

Web Title: house decoration according to older person