15 December 2017

News Flash

उन्हाळ्यात घरगुती उपकरणांची काळजी कशी घ्यावी

मायक्रोव्हेवच्या वापरामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो आणि या प्रक्रियेत विजेच्या बिलांची रक्कमही घटते.

लोकसत्ता टीम | Updated: May 6, 2017 3:49 AM

उन्हाळ्यात सगळ्यात जास्त एअर कंडिशन वापरला जातो.  तुम्हाला थंडावा उत्तम मिळावा यासाठी एसीने अगदी योग्य काम करणे गरजेचे असते. म्हणूनच, उन्हाळ्यात एसी वापरायला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे सव्‍‌र्हिसिंग (वेट/ड्राय) करून घ्यावे. यात एसीची पूर्ण तपासणी आणि स्वच्छता केली जाईल आणि खात्रीने तो चांगले काम करेल.

एसी योग्य प्रकारे काम करतो आहे की नाही आणि कमीत कमी ऊर्जा घेतोय की नाही, हे पाहण्यासाठी एसी सेट करणे (२४ डिग्री हे योग्य परिमाण आहे) गरजेचे आहे.

मायक्रोव्हेवच्या वापरामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो आणि या प्रक्रियेत विजेच्या बिलांची रक्कमही घटते. स्टोव्हवरील स्वयंपाकाच्या तुलनेत मायक्रोव्हेवमधील स्वयंपाक अतिशय जलद होतो आणि उन्हाळ्यात किचनमध्येही तासन्तास घालवायची गरज उरत नाही.

अनेक लोक त्यांचा मायक्रोव्हेव देखभालीशिवाय वापरत राहतात आणि यामुळेच नुकसान होते. दुर्दैवाने तुम्ही मायक्रोव्हेव जसा वापरता किंवा त्याची काळजी घेता यावरच मायक्रोव्हेवचा टिकाऊपणा अवलंबून आहे.

खाली दिलेल्या टिप्समुळे तुम्ही एअर कंडिशनर आणि मायक्रोव्हेवचे आयुष्य जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मदत करतील.

एअर कंडिशनर

फिल्टर्स नियमितपणे बदलणे : बॅक्टेरिया आणि धूळ अडवण्यात फिल्टर्सची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे खोलीत योग्य प्रमाणात हवा खेळवली जाते. परंतु धूळकणांमुळे यात काही काळानंतर अडथळा येऊ  शकतो, यामुळेच नियमितपणे फिल्टर्स स्वच्छ करणे गरजेचे असते.

देखभाल : उन्हाळ्यात एसी सगळ्यात जास्त वापरले जातात; यामुळेच त्यापूर्वीच एसीची देखभाल (वेट/ड्राय) करणे गरजेचे असते. यामुळे एसी उत्तमरीत्या काम करतो आणि तुम्हाला चांगला थंडावा देतो.

योग्य प्रक्रियांसाठी सेटिंग : ग्राहकांनी एसी अधिक चांगला चालावा म्हणून सेटिंग करणे, गरजेचे आहे, एसीच्या प्रक्रिया योग्य प्रकारे चालतील आणि कमी ऊर्जा वापरली जाईल (२४ डिग्री हे योग्य परिमाण आहे) याची खात्री करणे गरजेचे असते.

मायक्रोव्हेव ओव्हन :

एमडब्ल्यूओची सातत्याने स्वच्छता करून, तो योग्य प्रकारे कार्य करेल याची खात्री करावी.

रोलर रिंग आणि ओव्हनचा खालचा भाग जास्तीचा आवाज टाळण्यासाठी नियमितपणे स्वच्छ करावा आणि फिरत्या चकतीवरील खरखरीत आवाजही यामुळे टाळता येईल.

कंट्रोल पॅनेल अजिबात ओले होऊ  देऊ  नये. ओलसर फडक्याने हलक्या हातांनी ते पुसून घ्यावे. स्वच्छ करताना ओव्हनचे दार उघडे ठेवावे, यामुळे चुकून ओव्हन चालू होण्याची शक्यता उरत नाही.

काचेच्या आणि सिरॅमिक डिश वापराव्यात. या गोष्टी ओव्हनमध्ये वापरण्यासाठी अगदी योग्य आहेत आणि स्वयंपाकासाठी लागणारे तापमान राखतात.

रवी भट्ट नॅशनल सव्‍‌र्हिस हेड, गोदरेज अप्लायन्सेस

First Published on May 6, 2017 3:40 am

Web Title: how to take care of home appliances in the summer