News Flash

घर खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे..

घर खरेदी करताना ग्राहकाने वर नमूद केलेले मुद्दे आणि खरेदीखतातील कलमे लक्षात घेतली पाहिजेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेकजण घरखरेदीचा मुहूर्त साधतील. परंतु घर खरेदी करताना काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

स्वत:चे हक्काचे घर असणे हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. कारण ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असते. घर ही संपूर्ण कुटुंबाची आणि येणाऱ्या पिढय़ांची एक स्थावर मालमत्ता असल्याने ही गुंतवणूक माणसासाठी कायमची स्मरणार राहील अशी असते. घर खरेदीत आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक असल्यामुळे, आपण योग्य ती मालमत्ता योग्य त्या प्रक्रियेद्वारे विकत घेणे आणि त्यातील कायदेशीर बाबींचा घोळ टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या दृष्टीने, मालमत्तेचा स्वामित्व हक्क त्याच्या विद्यमान मालकाला विक्री करण्याचा आणि भविष्यात व्यवहार करण्याचा अधिकार देतो. एखाद्या मालमत्तेचा स्वच्छ आणि विक्रीयोग्य स्वामित्व हक्क हा आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

खरेदीखतात / करारपत्रात, ज्याद्वारे मालमत्तेचे हक्क हस्तांतरित करण्याचे हक्क मिळतात, पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

संबंधित व्यक्तींची ओळख आणि अधिकार सिद्ध करणे : मालमत्तेचा व्यवहार हा सक्षम व्यक्तींमध्ये व्हायला हवा, ज्यांना त्याविषयीचे करारपत्र करण्याचा (स्वामित्व हक्क, मुखत्यारपत्र, इत्यादीद्वारे) अधिकार आहे. ओळखपत्र आणि केवायसी पुरावे हे मालमत्तेचा ग्राहक आणि विक्रेता यांची ओळख सिद्ध करण्यासाठी मदत करतात.

परिपूर्ण आणि विक्रीयोग्य स्वामित्व हक्क : खरेदी करायच्या मालमत्तेचा परिपूर्ण आणि विक्रीयोग्य स्वामित्व हक्क असल्याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचा कब्जा (आर्थिक/ कायदेशीर जबाबदारी) नसणे महत्त्वाचे आहे. आपण अशा प्रकारचे प्रमाणपत्र ज्या कार्यालयात या मालमत्तेची नोंदणी केली आहे, त्या उपनिबंधकाच्या कार्यालयातून मिळवू शकता. या प्रमाणपत्रावर विशिष्ट कालावधीत झालेल्या या मालमत्तेच्या सर्व व्यवहारांची नोंद असते.

एक विशिष्ट मसुद्यातील अर्ज भरून दिल्यानंतर हे प्रमाणपत्र मिळू शकते. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयात सादर करावा लागतो आणि त्यासोबत पुढील गोष्टी जोडाव्या लागतात :

अ.     शिधापत्रिका किंवा निवासाचा अन्य कुठलाही पुरावा.

ब.     मालमत्तेची जागा आणि सव्‍‌र्हे क्रमांक नमूद करावा.

क.     कालावधी, मालमत्तेचे संपूर्ण वर्णन, मापे आणि सीमारेषा नमूद कराव्यात.

अर्ज केल्यापासून साधारण १५ ते ३० दिवसांत मालमत्तेचे प्रमाणपत्र मिळते.

योग्य त्या परवानग्या असणे : घर खरेदी करताना ग्राहकाने पुढाकार घेऊन खालील परवानग्या आणि त्यांची कालमर्यादा तपासून घ्यावी, जेणेकरून मालमत्ता तांत्रिक आणि कायदेशीररीत्या विकत घेण्यायोग्य आहे याची खात्री करता येईल.

नुकसानभरपाई कलम : या कलमाद्वारे ग्राहकाचे मालमत्तेवरील कुठल्याही कायदेशीर वादापासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते. एकदा काळजी पूर्वक मसुदा तयार केला, सर्व शक्यता गृहीत धरल्या आणि त्याचा करारपत्रात अंतर्भाव केला, की या कलमामुळे मालमत्तेविषयी भविष्यात होणाऱ्या कुठल्याही कायदेशीर वादापासून ग्राहकाचे संरक्षण होते. या कलमानुसार, या कलामात नमूद केलेल्या कायदेशीर मुद्दय़ांमुळे जर ग्राहकाला तोटा झाला, तर विक्रेत्याला त्याची भरपाई करावी लागते.

पूर्वीच्या व्यवहारांची साखळी कागदपत्रे : ग्राहकाने मालमत्तेचे पूर्वी झालेले सर्व व्यवहार दाखवणारी साखळी कागदपत्रे मूळ स्वरूपात मागितली पाहिजेत आणि विक्रेत्याने उपलब्ध करून दिली पाहिजेत.

कायदेशीर मान्यताप्राप्त साधने : विक्रेत्याला ठरलेली किंमत ही कायद्याने मान्यताप्राप्त साधनाद्वारे अदा केली पाहिजे आणि तसे स्पष्टपणे खरेदीखतामध्ये नमूद केले पाहिजे. त्याच बरोबर ही रक्कम ग्राहकाने अदा केल्याची तारीख/ करण्याची तारीखसुद्धा नमूद केली पाहिजे.

खरेदीखताची नोंदणी करणे : शेवटी खरेदीखताची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क (हे सक्षम शासकीय अधिकाऱ्यांद्वारे निश्चित केले जाते आणि प्रत्येक राज्यानुसार बदलते) भरून करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या खरेदीखताच्या तुलनेत, न्यायालयात नोंदणी केलेले खरेदीखतच ग्रा धरले जाते. तसेच, खरेदीखताची नोंदणी केल्यानंतर त्याची नोंद मालमत्ता ताबा प्रमाणपत्रावर होते.

घर खरेदी करताना ग्राहकाने वर नमूद केलेले मुद्दे आणि खरेदीखतातील कलमे लक्षात घेतली पाहिजेत. ही कघर खरेदी करताना ग्राहकाने वर नमूद केलेले मुद्दे आणि खरेदीखतातील कलमे लक्षात घेतली पाहिजेत.रारपत्रे खूप मोठी असतात, पण आपल्या फायद्यासाठी त्यांचे सविस्तर वाचन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते पूर्ण समजायला मदत होते आणि भविष्यात मोठी समस्या उद्भवत नाही. मालमत्ताविषयक वकिलाची सेवा घेऊन खरेदीखताचा मसुदा बनवणे, त्यातील कलमे तपासणे, ती ग्राहकाच्या हिताची आहेत याची खात्री करणे, हे व्यवहारात फायद्याचे ठरते.

(लेखक ‘ए.एच.एफ.सी.एल.’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

मालमत्तेसंबंधित आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या बाबी..

  • महसूल खात्यातर्फे योग्य ती बिगर शेती परवानगी.
  • इमारतीचा नकाशा नगर विकास / पालिका अधिकाऱ्यांनी मंजूर केलेला असणे.
  • इमारतीचा बांधणी नकाशा रचना अभियंत्याने मंजूर केल्यानंतर नगर विकास / पालिका अधिकाऱ्यांकडे सादर करणे.
  •  नगर पर्यावरण, पीडब्लूडी, विमानतळ, पुरातत्त्व संरक्षण, राष्ट्रीय स्मारक, भूजल, रेल्वे आणि वन खात्याच्या अधिकााऱ्यांची मंजुरी.
  • मालमत्तेचे बांधकाम सुरू असल्यास सक्षम अधिकाऱ्याकडून बांधकामाच्या विविध पातळ्यांसाठी मिळालेले कार्यारंभ प्रमाणपत्र.
  • सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
  • सक्षम नागरी अधिकाऱ्यांकडून (पाणीपुरवठा, वीजपुरवठा, गॅस, रास्ते, वाहतूक, मलनि:सारण आणि अग्निशमन) मिळणारे ना हरकत प्रमाणपत्र.
  • सक्षम पालिका अधिकाऱ्यांकडून मिळणारे ताबा प्रमाणपत्र.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 6:17 am

Web Title: important document at the time of buying house
Next Stories
1 खेडय़ामधले घर कौलारू
2 वास्तु-प्रतिसाद : संस्मरणीय ‘कॉलनीची पन्नाशी’
3 कॉलनीची पन्नाशी!
Just Now!
X