आपल्यापकी अनेकांसाठी स्वत:च्या मालकीचे घर असणे हा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि अनेकदा आपल्या आयुष्यातील सर्व बचत आपण आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी खर्ची घालत असतो. त्यामुळे या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी एक गृहविमा खरेदी करून पावले उचलणे योग्य ठरते. त्यातून अत्यंत कमी किमतीत सर्वागीण सुरक्षाकवच आपल्याला मिळू शकते. गृहविमा सामान्यत: एका पॅकेजच्या स्वरूपात उपलब्ध होतो. तो केवळ नसíगक दुर्घटनांमध्ये किंवा अपघाताने नुकसान झालेल्या विमा उतरवलेल्या मालमत्तेचे नुकसान किंवा नादुरुस्ती यांचा समावेश करत नाही. त्याचबरोबर विविध प्रकारची सुरक्षाही तो देतो. सामान्यत: घरगुती विमा पॉलिसींमध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो.
१) इमारती, जोडण्या, वस्तूंचे नुकसान किंवा नादुरुस्ती, आग किंवा इतर गोष्टी जसे- भूकंप आणि पूर अशा गोष्टींमुळे घरांची दुरुस्ती. एक पर्याय म्हणून दहशतवादामुळे झालेले नुकसान किंवा नादुरुस्ती हेही कव्हर करण्यात येऊ शकेल.
२) घरातील साहित्य, मौल्यवान वस्तू, अप्लायन्सेस (टीव्ही, फ्रिज, वॉिशग मशीन, एअर कंडिशनर्स, लॅपटॉप इत्यादींचे) नुकसान किंवा इतर वस्तू जसे- प्लेट ग्लास आणि सॅनिटरी वेअर.. असे नुकसान किंवा नादुरुस्ती, आग किंवा इतर गोष्टींमुळे होऊ शकतात आणि चोरीमुळेही होऊ शकते.
३) अपघाती मृत्यू किंवा दुखापत झालेल्या व्यक्तीचे कायमस्वरूपी पूर्ण किंवा अंशत: अपंगत्व यांच्यासाठी नुकसानभरपाई देण्यासाठी वैयक्तिक अपघात कव्हरेज.
४) आग किंवा इतर घटना जसे- पूर किंवा भूकंप यांच्यासारख्या घटनांमुळे संपूर्ण घर किंवा त्याचा भाग राहण्यास अयोग्य होतो आणि त्यामुळे भाडय़ाचे नुकसान होते. काही विमा योजना पर्यायी निवासासाठी अतिरिक्त भाडय़ाच्या खर्चाच्या देयतेसाठीही तरतूद देतात.
ws07

गृहविमा खरेदी करत असताना खालील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे –
१) मालमत्ता आणि त्यातील वस्तूंचा योग्य रकमेचा विमा उतरवण्यात आला आहे याची काळजी घ्या. दावा करताना विमा कंपनीला विम्याच्या मूल्यापेक्षा मालमत्ता आणि त्यातील वस्तूंचे प्रत्यक्ष मूल्य जास्त आहे असे लक्षात आल्यास, दाव्याची रक्कम पूर्णपणे दिली जाणार नाही.
२) सर्व विमा योजनांप्रमाणेच गृहविमा योजनांमध्येही काही गोष्टी वगळण्यात येतात. विम्यामधून काही रक्कम वजा केली जाते. (एक नाममात्र रक्कम जी विमा काढलेल्या व्यक्तीने दाव्याच्या परिस्थितीत भरणे आवश्यक असते.) अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या विमा सल्लागाराचा सल्ला या दोन्ही घटकांबाबत घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.
(लेखक भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)