शहरांशी तुलना करायची झाली तर खेडय़ामधल्या त्या कौलारू घरात काहीच खास नसते. शहरातील उंच इमारतींचा खूप डौल असतो. चकचकाट असतो, भरपूर उजेड असतो, योजना असतात, अस्वच्छता नसते, पण तरीही माणसाला ते गावाकडचे घर कौलारू का आठवते? नोस्टॅलजिया किंवा स्मरण रंजनाचा भाग सोडला तरीही त्या कौलारू घरात असे काय असते, की प्रत्येकच सूज्ञ व्यक्तीच्या मनाच्या कोपऱ्यात ते घर ‘घर करून’ असते. का?

खेडय़ातल्या त्या घराला अंगण असते. अंगण म्हणजे  काय? असा प्रश्न मला एकदा बहीणीच्या नातीने विचारला होता. अंगण ते शेणाने सारवले असते. त्याला आजुबाजूने झाडी लावलेली असतात. मेंदीच्या झाडांचे कुंपण असते. मध्ये तुळशीवृंदावन असते, त्यात तुळशीचे रोप वाढलेले असते व मिणमिणता दिवा लावलेला असतो. आजी देवाची आरती म्हणते, आजोबा गोष्टी सांगतात. मुले सागरगोटे खेळतात, मुले विटीदांडू खेळतात. मधे गोपद्म व रांगोळी काढलेली असते. ‘गाईच्या शेणीचा वास व त्या गौऱ्या!

dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक

‘शी बुलशीट’ म्हणून नात पुन्हा कार्टुन बघू लागली. ‘काहीही’असे सून पुटपुटली. त्या घरातील जमीन खेडय़ातल्या घरात शेणाने सारवलेले असल्याने पावले दुखत नाहीत, टीव्ही नसल्याने कानावर अवास्तव फ्रीक्वेन्सीचे आवाज आदळत नाहीत, की नकोशी दृष्ये बघावी लागत नाहीत. त्या घरांना चामडय़ाचे कुलूप असते, चार वेळा लॅचकी लागत नाही. घरात पंखा नसला तरीही आजूबाजूच्या झाडांमुळे येणारा गारवा असतो. हिरव्या रंगाची मखमली सजावट असते. रस्त्यावर गाडय़ांचे आवाज व पेट्रोलच्या उत्सर्जीत वायूंची प्रदूषणकारी गर्दी नसते. देवघरात समई असते, अंगणात झोपाळा असतो. त्याच्या कडय़ा कुचूकुचू करतात, पण लोकलगाडीतील कडय़ांसारख्या टोचत नाहीत. तो झोका आकाशपाळण्यासारखा उंच जात नाही, की कॅनोपीसारखा सजवलेला नसतो. पण ती बंगाळी मंद असा दोहाळी, गुंगवणारा आनंद देते (गर्भातील भ्रूणासम) देवळात मंद असा मंत्रघोष ऐकू येतो. अंघोळीला तांब्यापितळ्याची चळचळीत भांडी व लिंबाची पाने टाकलेले ते तपेलीतील गरम पाणी मन शांत करते. अगदी स्पा किंवा हेल्थ सलूनचा फील नसला तरीही खेडय़ातील वातावरण ताजेतवाने करणारे असते.  किरणांचा शोध ओझोनच्या थरांपासून मेंदूतील सिरोटोनीनपर्यंतसुद्धा पोहोचू शकतो. संध्याकाळी पक्षी किलबीलतात. त्याबरोबर खूप मोठय़ा प्रमाणात डासही येतात. मग कडुलिंबाचा धूर करून छताला शेराच्या झाडाची फांदी चिकटवली जाते, तिला किडे व चिलटे चिकटतात. तेच पेस्ट कंट्रोल.  मी गावाकडच्या घराचे सद्गुण दामटले. सुनेला पटले नाही, ती म्हणाली, ‘धूप अगरबत्ती पेटवून गौरीच्या निखाऱ्यावर उद टाकून धूर करतात. चुलीच्या धुरामुळे वाळवी वाटेला फिरकत नाही. मात्र डोळे चुरचूरत राहतात. चहा व्हायला इतका वेळ लागतो की, मुंबईत आपला स्वयंपाक तेवढय़ा वेळात होईल.’

पण त्या चहाला खास चव असते. नागमोडी वाट चालून गावाबाहेर डोंगरमाथी गेल्यावर डोंगरावरून गाव देखणा दिसतो. ती रंगीबेरंगी जमिनीच्या तुकडय़ांची गोधडीमध्ये निळ्या तलावाचा मोठा तुकडा व छोटय़ा छोटय़ा कौलारू घरांमध्ये ओळखू न येणारे ते माझे घर!  ‘दुरून डोंगर साजरे’ म्हणतात तसे ‘डोंगरावरून गाव साजरे’ म्हणायला हरकत नाही. शहरी स्वच्छता व ग्रामीण आनंद व समाधान यांचा सुवर्णमध्य म्हणून सेकंड होम्स घेण्याची पद्धती सुरू झाली. ‘चार दिवस बदलाचे’ ‘चार दिवस गावाकडचे’ अशा त्या निर्मळ आनंदाचे क्षणभर विश्रांतीचे दिवस आता पुन्हा पुन्हा वाचण्यात येतात.. त्यात नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावरही गावाशी रेंगाळलेले बालपणीचे स्वप्न आठवणे ही भावना असावी. शहरात सर्व असताना व ग्रामीण जनता मुंबईकडे मोठय़ा संख्येने आकर्षित होत असताना गावाचे आकर्षण मनाला का वाटत असावे? प्रत्येकाचे कारण वेगळे असू शकते.

कदाचित त्या गावाशी माणसाची नाळ जोडली गेलेली असते किंवा आईच्या हातचा वरणभात त्याच गावी खाल्लेला असतो. कदाचित गावाकडची माती साद देत असते. शहरातील गडबड गोंधळाचा कंटाळा आलेला असतो. मोकळी शुद्ध हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटते. कारण काहीही असू दे, गावामधले घर कौलारू प्रत्येकच संवेदनक्षम माणसाला साद घालत राहते. सेकंड होम्स लोकप्रिय होण्याला तेच कारण असावे.

तुम्ही सेकंड होम खरेदी केले का? निदान करायची इच्छा आहे का?

हो, मला माहीत आहे, कबूल करा अथवा नका करू गावी घर बांधायचे दडलेले तुमचे स्वप्न जरूर आहे.

गावाच्या आठवणीने स्वप्ने होती सुरू खेडय़ामधले घर कौलारू

vasturang@expressindia.com