23 November 2017

News Flash

वास्तु-प्रतिसाद : जुन्या आठवणींना उजाळा

मी ६० साली माझ्या भावाकडे राहात होतो. दोन्ही मोठय़ा भावांची लग्ने होती.

Updated: February 11, 2017 2:38 AM

‘वास्तुरंग’मधील ‘निळे आणि पांढरे बूच हा’ लेख वाचला. लेख आवडला तो वाचताना खूप पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी ६० साली माझ्या भावाकडे राहात होतो. दोन्ही मोठय़ा भावांची लग्ने होती. त्यामुळे दूध सेंटरवर जाऊन दूध आणण्याचे काम माझे असायचे ते मला आवडायचे. कित्येक वर्षे मी ते ईमानेइतबारे करायचो. मग थंडी असो की पाऊस, पण त्यातदेखील मजा असायची. माझे लग्न होऊन माझे घर झाल्यावर आरेच्या दुधाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर माझे चुलत सासरे मदतीला आले व त्यांनी त्यांच्या ओळखीने त्यावेळी दुर्मीळ असलेले दुधाचे कार्ड मिळवून दिले. ही व अशा अनेक आठवणी या लेखामुळे जागविल्याबद्दल आभार. तसेच ‘माळ्याच्या माळ्यामंदी’ हा सुचित्रा साठे  यांचा लेख वाचला. या लेखात आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. घरच्या माळ्यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची उंची इतकी जेमतेम असते की सामान काढताना त्याच वेळी उंदराचे पिल्लू किंवा पाल वावरली तर आपला कपाळमोक्ष झालाच म्हणून समजा, काय खरं की नाही?

शामकांत वाघ, गोरेगाव, मुंबई.

उत्तम लेख

‘वास्तुरंग’मधील ‘निळे आणि पांढरे बूच हा’ मोहन गद्रे यांचा लेख वाचला. या लेखामुळे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. लेख उत्तम वठला आहे आणि मांडणीही सुरेख आहे.

-राजेश दिवेकर, डोंबिवली.

First Published on February 11, 2017 2:38 am

Web Title: letters from vasturang readers