‘वास्तुरंग’मधली ‘घराभोवतालची हिरवाई’ हा प्राजक्ता म्हात्रे यांचा लेख खूप आवडला.  लेखामध्ये फुलांच्या जंत्रीत प्राजक्ताचे नाव ऐकताच बत्तीस वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवली. मुलाला शाळेची सुट्टी असल्याने आम्ही तिघे काही दिवस सासरी माहीमला राहायला होतो. एका सकाळी माझ्या सासूबाईंनी ‘देवपूजेसाठी फुले घेऊन ये,’ असे सांगून उठविले. मी फुले आणण्यासाठी सोसायटीच्या बागेत गेले असता, बागेच्या मधोमध असलेल्या प्राजक्ताच्या झाडासभोवार फुलांचा सडा पडलेला मी पाहिला. फुले वेचण्यासाठी वाकले, माझ्या कानात कुणीतरी बोलतंय असा मला भास झाला.  मला आलेल्या त्या दिव्य अनुभूतीवर मला कविता स्फुरली. फुले वेचून परत येईपर्यंतच्या काळातच ती पूर्ण झाली. माझ्या सासूबाईंना ती कविता म्हणून दाखविली. आज त्या हयात नाहीत. ते विशिष्ट झाड पावसात पडले. परंतु त्याची फांदी कडेला लावल्याने पुनश्च बहरले.

शिकवूनी गेला मला, हा प्राजक्ताचा सडा

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

चिंतन करता खोलवरी ओलेत्या हो कडा

जीवन आमुचे क्षणभंगूर परी,

चिंता करतो कधी न उद्याची सामर्थ्यवान हो, तुम्ही आम्हाहूनी चिंता करता फुका कशाची?

मोरपिसासम हलकी होऊनी

प्रसन्नचित्ते आले सदनी

आत्मबल वाढता हो आमुचे

झंझावाताही पुरू उरूनी

या अंकातलाच ‘जादूई माजघर’ हा हेमा वेलणकर यांचा लेख मनाला भावला. ‘बांधकामाचे गणित’ या लेखात डॉ. अभय खानदेशे यांनी अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल अशा रीतीने विषयाची मांडणी केली आहे. यात पिलरला धक्का लागल्यास इमारतीचे आयुर्मान कमी होते, हा महत्त्वाचा इशारा त्यांनी दिला आहे.

– स्मिता दत्तात्रय पाटील, बोरिवली

स्नानगृहातील अपघात प्रतिबंध

स्नानगृहात वृद्ध व्यक्ती पडून हाड मोडल्याच्या घटना बऱ्याचदा ऐकिवात येतात. अशक्तपणा, गरगरल्यासारखे वाटणे, अचानक पाल किंवा झुरळ आल्याने तोल जाणे.. अशी बरीच कारणे असू शकतात. शिवाय लादी जरा जास्तीच गुळगुळीत असणे, लादीवर पाणी आणि चिखल असणे, प्रकाशयोजना नीट नसणे अशा कारणांनी तरुणसुद्धा पडू शकतात. हे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजले पाहिजेत. एक तर लादी निवडताना ती फार गुळगुम्ळीत नसेल याची काळजी घ्यावी. लादी ओली असेल तर जुना टॉवेल किंवा दुसरे काही खरखरीत कापड अंथरून त्यावर वावर असावा. बोहऱ्याच्या अर्थात हार्डवेअरच्या दुकानात लांब काठीचे वायपर्स मिळतात, तसा एक वायपर पाणी ढकलण्यासाठी आवश्यक वापरावा. प्रकाश योग्य प्रमाणात असावा. आतून शक्यतो कडी लावू नये. आत कोणी असल्याची अन्य काही खूण असावी. जसे बाहेर लाल दिवा व आत कोणी असल्याची सूचना देणारी कोणतीही युक्ती योजावी. या उपाययोजनांमुळे स्नानगृहातील अपघातांना प्रतिबंध बसेल.

रत्नाकर यादव धर्माधिकारी, कल्याण</strong>

अग्निसुरक्षा

अलीकडे वारंवार आपण इमारत, हॉटेल्स, दुकाने यांना लागलेल्या आगीच्या बातम्या आपण वाचतो. त्यात नाहक बळी जातात, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. त्यासाठी सर्वानी काटेकोरपणे नियमांचे पालन करून जागृत राहणे अत्यावश्यक आहे. बहुतेक वेळा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, गॅस सिलेंडर, केरोसिन, डिझेल अशा ज्वालाग्राही वस्तू व पदार्थाचा साठा योग्य त्या ठिकाणी केलेला नसतो. तसेच त्याचा वापर कोणतीही काळजी न घेता, सुरक्षित साधनांचा वापर न करता आपण निष्काळजीपणाने आपण आपले व्यवहार पार पाडत असतो. अशानेच दुर्घटनांना सामोरे जावे लागते. म्हणूनच फायर मार्शल तयार करण्यासाठी अग्निक्षमन दलाची प्रशिक्षणाची नवी योजना सुरू झाली असून, अग्निशमन दलाचे जवान सोसायटीत जाऊन योग्य ते प्रशिक्षण देणार आहेत. अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितींना तोंड देण्यासाठी कसे सज्ज राहावे, सोसायटीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा कशी वापरावी, फायर पंप कसा वापरावा, अलार्मची ओळख, कोणाती आग कशी विझवायाची यांसारख्या प्रकारचे आवश्यक ते प्रशिक्षण या फायर मार्शलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. इमारती किंवा लहान दुकानांतून आत-बाहेर प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग क्रमिका असल्यामुळे जास्त सतर्क राहण्याची गरज असते. जेव्हा आपण अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा खालील सुरक्षा साधने जवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. १) स्मोक अलार्म- सिस्टीम, २) फायर हायड्रट सिस्टीम, ३) सॅंड बकेट. ४) पाण्याचा होस पाइप, ५) मीटर बॉक्सची सुरक्षित जागा, इ. सर्व साधने योग्य त्या ठिकाणी ठेवून या सर्व वस्तूंची देखभाल व व्यवस्थापन दर तीन माहिन्यांनी करून घेणे गरजेचे असते. आज जर आपण सरासरी लोकांकडे पाहिले तर बहुतेकांकडे विद्युत उपकरणे असून, त्याचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही उपयुक्त साधने बसविणे बंधनकारक आहे. ही साधने केवळ बसवून चालत नाहीत तर अग्निशामक दलाच्या फायर फायटिंग अधिकारी किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीकडून इमारतीमधील रहिवासी, दुकानातील कर्मचारी किंवा कारखान्यातील कामगार यांना योग्य ते प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देणेसुद्धा बंधनकारक आहे. इमारती वा सोसायटी येथे जेव्हा वर्षांतून ३/४ वेळा सभा होतात, त्याच वेळेला अशा प्रशिक्षणाचे आयोजन करणे अधिक उपयुक्त होऊन त्यामधील साक्षरता अधिक व्यापक होईल. सेफ्टी फर्स्ट या भूमिकेतून सर्वानीच यासंबंधीची माहिती व प्रशिक्षण घेतले तर त्यांना दैनंदिन जीवनात व व्यवहारात त्याचा फायदा होऊन आपण अधिक सतर्क व जागृत राहून काम करू शकतो. तसेच कोणत्या उपकरणाचा केव्हा वापर करावयाचा यासंबंधीसुद्धा काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्याबद्दलसुद्धा माहिती घेऊन प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासंबंधीचे नियम, निकष यांचेसुद्धा काटेकोरपणे पालन होणे महत्त्वाचे आहे. हीच वस्तुस्थिती औद्योगिक क्षेत्रात असून, तेथे रासायनिक पदार्थ हा एक घटक असतो- जो अतिज्वालाग्रही असून अत्यंत धोकादायक असतो.  इतकेच काय, पण त्याचा पर्यावरणावरतीसुद्धा परिणाम होतो. त्यासाठी फार कडक नियम व निकष आहेत, पण त्याचे पालन न केल्यामुळे अलीकडेच डोंबिवली एमआयडीसी येथे झालेले दोन भीषण स्फोट- ज्याचे सावट आजही आहे. तसेच परळ येथील इमारतीला बाराव्या मजल्यावर लागलेली आग.. इमारत, हॉटेल्स, दुकाने, कारखाने येथील अग्निसुरक्षेसंबंधी कोणतीही तडजोड असू नये. अथवा कोणताही शॉर्टकट असता कामा नये. आज सुरक्षेसंबंधी आपण जागृत आहोत, पण सतर्क नाही. साधने आहेत, पण वापरत नाही. साधने असतील तर देखभाल व्यवस्थापन नाही आणि सर्व साधने असतील तर योग्य माहिती प्रशिक्षण नाही. म्हणूनच दुर्दैवाने दुर्घटना घडतात. अपघात हा अपघात असतो, पण आपण सतर्क, जागृत व प्रशिक्षित असलो तर अपघातावर मात करू शकतो, पण त्यासाठी योग्य त्या प्रशिक्षणाची व व्यापक जन-जागृतीची गरज आहे.

– पुरुषोत्तम आठलेकर