28 May 2020

News Flash

तळेगाव एमआयडीसीला बहुराष्ट्रीय कंपन्यांची पसंती

राज्य शासनाच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ला बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्य शासनाच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ला बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तळेगाव एमआयडीसीजवळ सुमारे १२०० एकरवर (४५४ हेक्टर) उभारण्यात येणाऱ्या नियोजित पंचतारांकित दर्जाच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे.
परकीय गुंतवणूकदारांना आकर्षति करण्यासाठी राज्य शासनाने उद्योग प्रकल्पांच्या परवानग्यांची प्रक्रिया
सुलभ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ला बहुराष्ट्रीय कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तळेगाव एमआयडीसीजवळ सुमारे १२०० एकरवर (४५४ हेक्टर) उभारण्यात येणाऱ्या नियोजित पंचतारांकित दर्जाच्या औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाचे काम प्रगतिपथावर आहे. एमआयडीसीने ऑक्टोबर अखेर सुमारे ५०० एकर जमीन संपादित केली आहे. उर्वरित ७०० एकर जमीन संपादनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अजित देशमुख आणि भूसंपादन उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी विशेष अभियान आयोजित
केले होते.

तळेगाव एमआयडीसीला पहिली पसंती
दुसऱ्या टप्प्यातील तळेगाव औद्योगिक वसाहतीवर डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील जपानची अग्रेसर कंपनी फॉक्सकॉनने ‘मेक इन इंडिया’ मिशनअंतर्गत आगामी पाच वर्षांत राज्यात ३५ हजार कोटी रूपयांची (पाच अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीच्या अध्यक्षांबरोबर सामंजस्य करार देखील केला आहे. जपानच्या इलेक्ट्राईट कंपनीने ऑटो रिक्षाच्या प्रकल्पासाठी, ए टू केअरने औषध निर्मितीसाठी आणि ए एस ब्रेन या आदरातिथ्य, पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तळेगाव एमआयडीसीला पसंती देत शासनास सहमती पत्रं दिली आहेत. जपानची डायकिन कंपनी वातानुकूलन यंत्र निर्मितीसाठी, कुबेटा कंपनी ट्रॅक्टर्स उत्पादनासाठी तर नायडेक कंपनीचा विद्युत मोटारीचा प्रकल्प, सॉफ्टबॅंक ग्रुपने इलेक्ट्रॉनिक व सौरऊर्जा यंत्रसामग्रीच्या प्रकल्पासाठी पुण्यास पसंती दिली आहे. पोराईट कॉर्पोरेशनने देखील तळेगाव येथे २०० कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या पावडर मेटॅलर्जी प्रकल्पासाठी स्वारस्य दाखविले आहे, कंपनीचे अध्यक्ष मासानोरी किकूची यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चच्रेत तळेगाव एमआयडीसीला पहिली पसंती दिली आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी शासकीय स्तरावर गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यासाठी लक्ष्यवेधी योजना आखल्या आहेत. त्यानुसार, उद्योग स्थापनेसाठीच्या सर्व परवानग्या जलदगतीने ३० दिवसांत देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या शक्तिप्रदान गटाची स्थापना केली आहे. १०० कोटीपेक्षा अधिक गुंतवणूकदारांसाठी मत्री वेबपोर्टलवरून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत. ६७ परवानग्यांची संख्या ३०ने कमी करून ती ३७ वर आणली आहे. जमीन वाटप पारदर्शक व्हावे म्हणून ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्याचेही शासनाने घोषित केले आहे.

जपानच्या इलेक्ट्राईट कंपनीने ऑटो रिक्षाच्या प्रकल्पासाठी, ए टू केअरने औषध निर्मितीसाठी आणि ए एस ब्रेन या आदरातिथ्य, पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तळेगाव एमआयडीसीला पसंती देत शासनास सहमती पत्रं दिली आहेत. जपानची डायकिन कंपनी वातानुकूलन यंत्र निर्मितीसाठी, कुबेटा कंपनी ट्रॅक्टर्स उत्पादनासाठी तर नायडेक कंपनीचा विद्युत मोटारीचा प्रकल्प, सॉफ्टबॅंक ग्रुपने इलेक्ट्रॉनिक व सौरऊर्जा यंत्रसामग्रीच्या प्रकल्पासाठी पुण्यास पसंती दिली आहे. पोराईट कॉर्पोरेशनने देखील तळेगाव येथे २०० कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या पावडर मेटॅलर्जी प्रकल्पासाठी स्वारस्य दाखविले आहे, कंपनीचे अध्यक्ष मासानोरी किकूची यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चच्रेत तळेगाव एमआयडीसीला पहिली पसंती दिली आहे.

दुसऱ्या टप्प्यासाठी जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात

तळेगाव रेल्वे स्टेशन पासून सुमारे १० ते १५ किमी अंतरावरील पट्ट्यात नवलाख उंब्रे, बधलवाडी आणि िमडेवाडी गावातील १२०० एकर जमिनीवर दुसऱ्या टप्प्यातील औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. तेथे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी गरजेनुसार विकसित भूखंड देण्याची प्रक्रियाही शासकीयस्तरावर सुरू आहे. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी ६२५ कोटी रूपयांची तरतूद राज्याच्या वित्त विभागाने केली आहे. त्यानुसार बधलवाडीतील जमीन मालकांना मोबदला देण्यासाठी ३३५ कोटी रूपये, मिडेवाडी २८१ कोटी, तर नवलाख उंब्रेसाठी सुमारे १० कोटी रूपयांचे वाटप गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. जमीन संपादनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यामुळे राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचे प्रकल्प उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे.
ws03r

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बसविलाय जम
मुंबई, पुणे व नाशिक या तीनही राजधानीच्या शहरांच्या मध्यावर तळेगाव ही औद्योगिक नगरी विकसित झाली आहे. या ठिकाणी दळणवळणाच्या सर्व सोयी हाकेच्या अंतरावर उपलब्ध असल्याने तळेगावच्या विकसित औद्योगिक वसाहतीच्या पहिल्या टप्प्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपापले बस्तान बसवले आहे. त्यात प्रामुख्याने इंग्लडची जेसीबी कंपनी आहे. ७० वर्षांपूर्वी इंग्लंडमधे सुरू झालेल्या जेसीबी कंपनीने जेसीबी इंडिया लिमिटेडचा भूउत्खनन सामग्री उत्पादनाचा प्रकल्प तळेगावात आठ वर्षांपूर्वी सुरू केला. आजमितीस जगभरात त्यांच्या जेसीबी ब्रॅंड मशिनरीस मोठी मागणी आहे. सुमारे साडेतीन हजारावर कामगार या प्रकल्पात काम करत असून उत्पादन जोमात सुरू असल्याची माहिती आहे. जनरल मोटार्स ही ऑटोमोबाईल मधील प्रख्यात अमेरिकन कंपनी. तळेगावातील ६५० एकर जागेवर जनरल मोटार्स इंडियाच्या कार उत्पादनाच्या प्रकल्पात सुमारे चार हजारावर कामगार आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चच्रेत कंपनीने हजारो कोटींचा विस्तारित प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे गुजरातमधील जनरल मोटर्सचा प्रकल्प हलवून तळेगाव एमआयडीसीतील प्रकल्पात तो विलीन करण्याचे कामही प्रगतिपथावर असल्याची माहिती आहे. वाहनांचे सुटे भाग बनवणारी मॅग्ना कॉस्मा कंपनी, लष्करी संरक्षण सामग्री आणि वाहनांचे सुटे भाग बनविणारी एल अ‍ॅण्ड टी कंपनी, इना बियिरग, वाहनांचे सुटे भाग तयार करणारी चीनची युएमडब्लू डॉगशिन कंपनी, लोखंडी धातूचे पत्रे बनवणारी पॉस्को इंडिया लिमिटेड आणि मल्टी एक्सल वाहनांच्या ट्रॉलिज् बनविणारी यॉर्क इंडिया आदी कंपन्यांनी आता तळेगावात चांगलाच जम बसविला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ यशस्वी करण्यासाठी कंपन्यांना जागेसोबत कुशल कामगार उपलब्ध करुन देण्यासाठी तळेगावात खासगी आयटीआय व कुशल कामगार घडविणारे कोर्स सुरु होत आहेत. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या कंपन्यांना कुशल कामगार ट्रेडनुसार उपलब्ध होणार आहेत. कारखानदारी सोबतच तळेगाव शहर व परिसरातील उजाड माळरानावर मोठ्या प्रमाणात ग्रीनपार्क उभे राहिले असून पाँलिहाऊसच्या माध्यमातून जगात सर्वत्र तळेगावचा गुलाब व अन्य फुले रुबाब गाजवत आहेत. सर्व सुविधांनी युक्त असलेल्या तळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देशी व विदेशी व्यावसायिक उत्सुक आहेत. अल्पावधीतच तळेगाव एमआयडीसी महाराष्ट्रातील स्टार एमआयडीसी म्हणून नावलौकिक प्राप्त करेल या दृष्टीने येथील वाटचाल सुरू आहे.

 

बी. यू. भंडारी- गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा
ws04rबी. यू. भंडारी लँडमार्क्‍स २६ वर्षांपूर्वी सुरू झाली. पूर्ण झालेल्या २५ आणि सुरू असलेल्या ९ प्रोजेक्ट्समध्ये १२ मिलियन चौ. फू. बिल्ट-अप एरिआचा समावेश आहे. नव्या प्रकल्पांमध्ये आणखीन ८ मिलियन चौ.फू. ची भर होईल. आजमितीस ४०००पेक्षा जास्त कुटुंबांना गृहसौख्य लाभले आहे.
कंपनीचा प्लॉटिंग प्रोजेक्ट पुणे येथील प्रतिष्ठित अभिमानश्री सोसायटीपासून सुरू झाला. आजपर्यंत कित्येक प्लॉटिंग प्रोजेक्ट्स यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत आणि सुरू असलेल्या प्लॉटिंग प्रोजेक्ट्समध्ये दक्षिण पुणे येथील शिरवाल येथील तरेरा नोव्हा व वारसा हायलँड्स तसेच पश्चिम पुण्यातील तळेगाव येथील बेल्लेझाचा समावेश आहे. बेल्लेझा पश्चिम घाटाच्या रमणीय निसर्गदृश्य असलेले तळेगावात वसलेले एनए बंगलो प्लॉट्स आहे. प्रस्तावित रींग रोड हिंजेवाडी आयटी पार्क, चाकण व तळेगाव एमआयडीसी सारख्या अन्य ठिकाणांना अगदी सहज जोडणरा रस्ता आहे. लोणावळा व मुंबईच्या जवळच्या सान्निध्यात येणारा बेल्लेझा चांगले गुंतवणुकीचे ठिकाण आहे. हा विकेंडकरीता एक सोईस्कर प्रोजेक्ट आहे तसेच येथे निसर्गाची मजा सुद्धा लुटता येईल.

सुंदर घरांद्वारे संपन्न जीवनशैलीकडे नेणारा ‘सारथी’!
ws05rअभिरुचीसंपन्न गृहनिर्मितीसाठी जनमानसात लोकप्रिय असणारं नाव म्हणजेच सारथी ग्रुप. प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर साकारत असतानाच सर्वोत्तम गुणवत्ताही जपणारी ही विश्वसनीय परंपरा. त्यामुळेच सारथी ग्रुपच्या प्रत्येक नव्या प्रकल्पाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतच असतो. वैविध्यपूर्ण गृहप्रकल्पांची निर्मिती करणाऱ्या या सारथीचा प्रत्येक प्रकल्प तितकाच वैशिष्टय़पूर्णही आहे. क्षेत्रफळात सारथी ग्रुपची वाटचाल मांडायची झाल्यास आज तीस लाख स्क्वे.फुटांपेक्षाही अधिक जागेत सारथीने आपली वास्तुकला सादर केली आहे. यामध्ये निवासी प्रकल्पांसोबतच व्यावसायिक प्रकल्प व ऑफिसेसचाही समावेश आहे. सारथीच्या प्रकल्पांमध्ये घर घेणाऱ्यांच्या आनंदी आयुष्यावरूनच सारथीच्या कार्यशैलीची अनुभूती येते. सिंहगड रोडवरील शिमर अँड शाईन तसेच बाणेरमधील सारथी सुव्हनिर हे दोन्ही अलीकडचे प्रकल्पही ग्राहकांच्या पसंतीची दाद मिळविणारे ठरले आहेत.
सारथीच्या या कार्यशैलीची दखल गृहनिर्माण क्षेत्रानेही घेतलेली आहे. सिलिकॉन इंडियाने पुणे रिअल इस्टेट अ‍ॅवॉर्डस् २०१४ मध्ये सारथी ग्रुपच्या ‘सारथी सिंक्लेअर’ या प्रकल्पाला ‘बेस्ट अ‍ॅफॉर्डेबल हाऊसिंग’ पुरस्काराने गौरविलं आहे. म्हाळुंगे येथे १२ एकर्सवर विस्तारलेल्या ‘सारथी स्कायबे’ या आलिशान प्रकल्पालाही ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात पसंती दर्शविली. १, २ व ३ बीएचके कॉस्मो अपार्टमेंटची ही संकल्पना ग्राहकांना अतिशय आवडली. एकूण सात टॉवर्समध्ये ९६३ अपार्टमेंटस् असलेलं हे स्कायबे उत्तम सुविधांनी व स्पेसिफिकेशन्सनी परिपूर्ण आहे. कनेक्टिव्हिटी, सोय आणि कॉस्मोपॉलिटन जीवनशैली याचं हे आदर्श उदाहरणच! त्यामुळेच लवकरच ‘सारथी स्कायबे’ हे पुण्यातलं ‘हॉट डेस्टिनेशन’ होणार हे निश्चित.
सारथीच्या याच देदीप्यमान वाटचालीतलं पुढचं शानदार पााऊल म्हणजे तळेगावजवळील कान्हेफाटा येथे साकारणारी ‘सारथी स्वदेश’ ही टाऊनशिप. तळेगावमधील या सर्वात मोठय़ा व सुविधासंपन्न टाऊनशिपला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बंगलो प्लॉट्स तसेच १ व २ बीएचके घरांच्या ५० एकरांवर साकारणाऱ्या या गेटेड कम्युनिटीला उत्तम कनेक्टिव्हिटीदेखील लाभली आहे. तळेगाव एमआयडीसी, चाकण, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला सहजपणे जोडणारी ही टाऊनशिप लोणावळा-खंडाळ्यापासून अवघ्या २५ किमी.वर आहे. या सर्व वैशिष्टय़ांसोबतच सर्वसामान्यांना परवडणारी अशी घरांची किंमत असल्यामुळे सर्वोत्तम घर वाजवी दरात घेण्याचा आनंद ग्राहकांना इथे मिळाला आहे. कोथरूड, कर्वे रोड, तसेच मॉडेल कॉलनी येथे सारथी ग्रुपचे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स सारथी ग्रुपचे वेगळेपण दर्शवितात तसेच जॉइंट व्हेंचरमध्ये लोणीकंद- वाघोली अ‍ॅनेक्स येथील ‘सबर्बिया इस्टेट’ हा गृहप्रकल्पही लक्षणीय प्रतिसाद मिळविणारा ठरला आहे. पुण्याच्या या नव्या उपनगरात १, २ व ३ बीएचके फ्लॅट्सचा हा परिपूर्ण गृहप्रकल्प या भागातील लँडमार्क होऊ पाहत आहे.
ग्राहकांची जीवनशैली उंचावत नेणाऱ्या सारथी ग्रुपची ही वाटचाल अशीच दिमाखात सुरू राहणार आहे. लवकरच पुनावळे व हिंजेवाडीमध्ये सारथीचे तीन नावीन्यपूर्ण गृहप्रकल्प निश्चितच लक्ष वेधून घेतील.

‘मेघस्वाना’ची आरामदायी घरे
ws06rलॅण्डस्केपला क्वालिटी होम्समध्ये रूपांतरित करीत २००१ पासून पुणे आणि तळेगाव या भागांमध्ये मेघस्वाप्ना ग्रुप आज आघाडीवर आहे. एकूण १५ वर्षे हा ग्रुप या क्षेत्रात आहे. या कालावधीत या ग्रुपने २ लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाची कामे पूर्ण करून जवळपास १००० पेक्षा अधिक कुटुंबांना अतिशय उत्तम वास्तू दिल्या आहेत. याशिवाय इतरत्रही ८ प्रोजेक्ट्स सुरू आहेत. संस्कृती जपत नावीन्यपूर्ण आणि आरामदायी घरे उभारण्यात हा ग्रुप आघाडीवर आहे.
मेघस्वाना ग्रुपची अ‍ॅड्रॉइट टीम ही सातत्याने लोकांना वाजवी किमतीत, पण खात्रीशीरपणे एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. यासाठी या ग्रुपच्या प्रोजेक्टच्या साइट्स या प्रामुख्याने मोक्याच्या ठिकाणी असतात आणि देऊ केलेल्या अद्ययावत सोयीसुविधा प्रत्येक कुटुंबाला भावतात. तांत्रिकदृष्टय़ा सक्षम असूनही तितक्याच प्रमाणात निसर्गाची काळजी घेतच कामे चालू असतात.
मेघस्वाना ग्रुपचे प्रोजेक्ट्स तळेगाव-दाभाडे रेल्वे स्टेशन किंवा एमआयडीसीला लागून आहेत आणि बहुतांशी लोकांना तळेगावसारख्या निसर्गाने नटलेल्या परिसरात राहायला आवडत असते. निसर्गसुंदर परिसर, दोन नैसर्गिक सरोवरे, शांत परिसर यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तळेगाव हे आवडते लोकेशन होत आहे. त्यातच या भागाशी मुंबई-पुणे या ठिकाणांहून अतिशय चांगली अशी रेल्वेसेवा, बसवाहतूक असल्यामुळेदेखील आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. या सगळ्या सुखसोयींमुळे मेघस्वाना ग्रुपचे सर्वाधिक ग्राहक आहेत ते ज्येष्ठ नागरीक. त्यांच्यासाठी हवापालट करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. अशा विविध प्रकारांनी निसर्गसमृद्ध, शांत, सुखसोयीयुक्त असलेल्या या प्रोजेक्टसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता काही जणांना रेन्टल सुविधाही देऊ केली आहे.
पुण्यातल्या चिंचवडमधल्या इंडियन कॉर्पोरेट बिल्डिंग, एसकेएफ इंडिया लि.यांच्याकरिता या ग्रुपला ‘एईएसए बेहेरे राठी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

व्हिटीपी ग्रुप-  दर्जेदार प्रकल्पांचे निर्माते
ws07rपुणे येथे मुख्य कार्यालय असलेल्या व्हिटीपी ग्रुपने तीन दशकापेक्षा जास्त काळ बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. ‘व्हिटीपी ग्रुप’ने निवासी आणि कार्यालयांची केवळ निर्मिती केली नसून, त्या निर्मितीमध्ये उत्तम दर्जाच्या कच्चामालाचा- सिमेंट व स्टिल, जो थेट कारखानदाराकडून मागविला जातो; देशात अग्रणी आणि महाराष्ट्रातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे सिमेंट वितरक असलेल्या देशातील अन्य अग्रेसर विकासकांबरोबर स्पर्धेत उतरला आहे. उत्तमात उत्तम दर्जाच्या इमारतींच्या बांधकामाबरोबरच ग्राहकांना पूर्ण समाधान मिळेल याकडे ‘व्हिटीपी’ चे लक्ष असते.
‘व्हिटीपी ग्रुप’ची मुख्य वैशिष्टय़े
१. ताबा दिल्यानंतचे सहाय्य- कामाच्या नियोजनार्थ चाव्या हाती सोपविल्यानंतरही ग्राहकांशी उत्तम सौख्य साधले जाते.
२. प्रत्येक साइटवर समर्पित कस्टमर केअर डेस्क- मालमत्तेची पुनर्विक्री आणि भाडेपट्टय़ाची सुविधा देणारी व्यावसायिक व्यवस्थापन टीम.
३. नोंदणी होईपर्यंत बुकिंग रद्द झाल्याबाबत कोणताही आकार नाही.
४. गुंतवणूकदारास अधिकाधिक परतावा मिळण्याकरिता अपार्टमेंट्सच्या पुनर्विक्रिवरील (ट्रान्सफर) हस्तांतरण शुल्क नाही.
व्हीटीपी ग्रुप पुण्यात मोक्याच्या ठिकाणी आपले गृहप्रकल्प उभारत आहे. त्यात खराडी, मगरपट्टा रोड, एनआयबीएम, तळेगाव यांचा समावेश असून, बाणेर, डांगे चौक येथेही ११ लाख ते ३.५ कोटींची घरे उभारली जाणार आहेत. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निलेश पालरेशा म्हणाले, ‘बांधकाम व्यवसायासाठी फ्रान्समधून मागविलेले अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाते. ही घरे सर्व सामान्यांना परवडतील अशीच आहेत. व्हीटीपी ग्रुपचे प्रकल्प म्हणजे पैशांचा पुरेपूर मोबदला असा ग्राहकांचा विश्वास आहे. ग्राहकांच्या समाधानाला नेहमी प्राधान्य दिले जाते. सवरेत्कृष्ट तेच ग्राहकांना मिळावे यासाठी दक्ष असलेल्या या ग्रुपने वाजवी दरात संपन्न जीवनशैली ग्राहकांना देता यावी याकडे कल असतो.’ अधिक माहितीसाठी पाहा-  www.vtpgroup.in

‘दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स’ची अत्याधुनिक घरे
ws08rपु. ना. गाडगीळ यांच्या १८३ हून अधिक वर्षांची सुवर्ण परंपरा असणाऱ्या दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स यांचा पुण्याजवळचा सोन्यासारखा गृहप्रकल्प म्हणजे तळेगावजवळ कान्हे फाटा येथील अनंतसृष्टी. कान्हे म्हणजे तळेगाव, कामशेत आणि लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळापासून हाकेच्या अंतरावर! िहजवडीपासून अध्र्या तर मुंबईपासून केवळ दीड तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. चाकण तळेगाव यांसारख्या भव्य औद्योगिक वसाहती आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे अशा दोन्ही उच्च आणि अद्ययावत गोष्टींना साजेसा असा हा भव्य गृहप्रकल्प. जिथे एकीकडे मर्सडिीज आणि फोक्सवॅगनसारख्या आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादक कंपन्या तर दुसरीकडे लोणावळ्यासारखे थंड हवेचे ठिकाण. यासारखा दुग्धशर्करा योग हाच! हिंजवडी आय टी पार्क, फ्लोरिकल्चर प्रकल्प आणि िपपरी चिंचवडच्या उत्पादनशील व्यवसायांच्या सान्निध्यात झपाटय़ाने उदयास आलेला १,२ आणि २.५ बीएचके अपार्टमेंट्स, बंगलो प्लॉट्स आणि रो हाऊसेसचा हा अद्वितीय गृहप्रकल्प अनंतसृष्टी!! ३५ एकरांवर वसविण्यात येत असलेल्या या अनंतसृष्टीत बंगलोज, रो हाऊसेस आणि साधारणत: ७०० हून अधिक अपार्टमेंट्सचे पर्याय उपलब्ध आहेत. २२.३७ लाखांपासून (सर्व समाविष्ट) सुरू होणाऱ्या किमतीच्या या प्रकल्पातील फेज १ मधील काही अपार्टमेंट्स आणि प्लॉट्सचा ताबा त्यांनी २०१३ मध्ये दिला आहे. आणि आता फेज ३ चे बुकिंग दणक्यात सुरू झाले आहे. या प्रकल्पाची वैशिष्टय़े म्हणजे प्रशस्त अंतर्गत रस्ते आणि पथदिवे. सुरक्षिततेला येथे अत्याधिक महत्त्व दिले गेले आहे आणि पाìकगसाठीही विपुल जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. आपली जीवनशैली अधिकाधिक उंचाविण्या-साठी क्लब हाऊस, अ‍ॅम्फिथिएटर, पार्टी लॉन मुलांसाठी वेगळी बाग, अद्ययावत जिम्नॅशियम अशा अनेकविध अत्याधुनिक सुविधाही येथे पुरविण्यात आल्या आहेत. बास्केट बॉल, टेनिस, बॅडिमटन, जलतरण यासारख्या खेळांचा आनंदही आपल्याला येथे घेता येईल. पुण्यापासून जवळ, परवडण्याजोगे दर, तपशीलवार नियोजन आणि अद्ययावत अत्याधुनिक सुविधा या सर्व गोष्टींमुळे आज अनंत सृष्टी म्हणजे चुकवू नये अशी सुवर्णसंधी म्हणून समजला जात आहे. हा संपूर्ण गृहप्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यांना सिलिकॉन इंडिया यांच्यातर्फे पुरस्कृत पुणे रिअल इस्टेट अ‍ॅवॉर्डसचा २०१४ मधील सर्वोत्कृष्ट निवासी गृहप्रकल्प-पश्चिम हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसे बंगलो प्लॉट्स, रो हाऊसेस आणि माफक आणि सर्वाना परवडणाऱ्या दरातील अपार्टमेंट्स ही या प्रकल्पाची खासियत.
प्रशस्त घरे, माफक दर आणि अत्याधुनिक सोयीसुविधा यांचा सुवर्ण संगम साधणारा भव्य गृहप्रकल्प म्हणजेच दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स यांचा कान्हे येथील अनंत सृष्टी!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 1:15 am

Web Title: multinational companies preferred talegaon midc
Next Stories
1 तळेगावात आयटी पार्क विचाराधीन
2 फ्लॅटचे कन्व्हेयन्स आणि फौजदारी गुन्हा
3 ब्रिक ब्याट कोबा व टेरेस वॉटरप्रुफींग
Just Now!
X