केंद्र सरकारने पारित केलेला रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट अर्थात रेरा कायद्यात  सर्व रियल इस्टेटची खरेदी-विक्री कारपेट एरियावर करण्याचा उल्लेख केला आहे.  परंतु शासनाने याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे.  या पाश्र्वभूमीवर शसनाला केलेल्या काही सूचना..

केंद्र सरकारने पारित केलेला रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट सर्व राज्यांना आवश्यक असल्यास त्यात काही फेरफार करून पारित करण्यास सांगितले आहे. सर्व रियल इस्टेटची खरेदी-विक्री कारपेट एरियावर करायची आहे. कारपेट एरिया मोजण्याचे, कुठल्या खोल्याचे क्षेत्र गृहीत धरायचे, कुठल्या खोल्यांचे नाही याबद्दल विस्तृत खुलासा/मार्गदर्शन शासनाने करावयास हवे. या पाश्र्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने यात सुसूत्रता आणावी या अपेक्षेने काही सूचना करणे आवश्यक वाटते आहे.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

नुकत्याच केंद्र सरकारने पारित केलेल्या रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये व आपण सदनिका/दुकाने वगरेची विक्री-खरेदी कारपेट एरिया आधारभूत धरून करावी असे मान्य केलेले आहे. या संबंधात कारपेट क्षेत्र मोजण्यामध्ये/मोजण्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद, अनिश्चितपणा व भांडण विकासक व खरेदीदार यांच्यात असू नये म्हणून खालील मुद्यांबाबतीत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.

१)     कारपेट क्षेत्र कसे मोजावे?

अ) कारपेट क्षेत्र स्टील टेपने मोजावे.

ब) प्रत्येक खोलीत प्लास्टर केलेल्या िभतीपासून प्लास्टर केलेल्या िभतीपर्यंत जमिनीवर टेप धरून मोजावे.

क) मोजण्यासाठीची टेप चांगली असावी.

ड) खूप लहान क्षेत्रासाठी १० फुटी स्टील टेप वापरावी.

२) सदनिकांचा कुठला भाग मोजावा व कारपेट क्षेत्रात समाविष्ट करावा.

अ) दिवाणखाना

ब) झोपण्याची खोली / खोल्या

क) स्वयंपाकघर

ड) स्टोअर रूम

इ) अभ्यासाची खोली

ई) व्ही. डी. ओ. खोली

फ) शौचालय, बाथरूम त्यापुढील लॉबी, पॅसेज

ग) बंदिस्त बाल्कनी (मंजूर असली तर) खुली बाल्कनी ५० टक्के क्षेत्र

भ) बंदिस्त ओटला (मंजूर असेल तर)

म) डय़ुप्लेक्स सदनिकामध्ये अंतर्गत जीना एकाच मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर त्याची वजावट असावी

च) कपाट जर ८ फूट उंची मिळत असेल तर व खोली १’-६’’ असेल तर.

३) सदनिकांचा कुठला भाग मोजू नये, कारपेट क्षेत्रात समाविष्ट करू नये.

अ) फ्लॉवर बेड

ब) ड्राय बाल्कनी

क) उंबरठा प्रत्येक खोलीचा

ड) बाहेरील बाजूस अधांतरी कपाट ८ फूट उंचीपेक्षा कमी उंच

इ) लॉफ्ट

ई) सामाईक जीना

फ) सामाईक पॅसेज, लॉबी

ग) लिफ्ट

भ) खुला ओटला

म) भिंतीत बाहेर आलेले खांब, किंवा मधले खांब १ चौ. फुटापेक्षा मोठे.

४) दुकाने किंवा कार्यालये समाविष्ट करण्याचे क्षेत्र

अ) निव्वल बंदिस्त क्षेत्र

ब) टॉयलेट

क) कँटीन, किचन

ड) वरील (२) फ, भ, म, च प्रमाणे

५) कुठला भाग समाविष्ट नसावा. वरील (३) प्रमाणे

६) वाहनतळ, पाìकग क्षेत्र विकू नये. स्टील्ट, तळघर किंवा खुले क्षेत्र कुठलेही पार्किंग क्षेत्र विकू नये.

७) वरील मोजणीप्रमाणे प्रत्यक्ष कारपेट क्षेत्र जे असेल तेच किंमत ठरवताना ग्रा धरावे. त्याच्यावर कुठलेही लोडिंग, कितीही लोडिंग करू नये. (विकासक २०. पासून ८०. लोडिंग धरून कारपेट क्षेत्र वाढवतात. तो गुन्हा समजावा व शिक्षा करावी)

८) जरी मजल्याची उंची जास्त असली तरी कारपेट क्षेत्राची लोडिंग मिळवून वाढ करू नये. जर १० फुटापेक्षा मजल्याची उंची जास्त असेल तर विक्रीचा दर वाढवावा, परंतु अनधिकृत लोडिंग मिळवून कारपेट क्षेत्राची गरपणे वाढ करू नये. हा गुन्हा समजावा व शिक्षा करावी.

वरील सूचनांचा विचार करून कारपेट क्षेत्र वाढवून जी गिऱ्हाईकांची लूटमार केली जाते ती होणार नाही याची काळजी घ्यावी. या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे शासनाने रेडी रेकनरचे दर कारपेट क्षेत्रावरच आधारित ठेवावेत. कुठल्याही बाबतीत बिल्टअप क्षेत्राचा उल्लेख असू नये. बिल्टअप क्षेत्र आधारभूत धरू नये. वरील सूचना सुशासन करण्यास मदत करतील.
लक्ष्मण पाध्ये – आर्किटेक्ट