31 May 2020

News Flash

ऐतिहासिक वारसा लाभलेले तळेगाव घर गुंतवणुकीसाठी फायदेशीर

तळेगावात सर्व प्रकारचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांचे जाळे देखील विणले गेले आहे.

तळेगाव दाभाडे शहर हे सध्या सेकंड होमचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.

तळेगावात घर घेण्यासाठी उच्चभ्रूंची मागणी वाढते आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त तळेगाव दाभाडे शहर हे सध्या सेकंड होमचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
निर्सगाचा वरदहस्त व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळेगाव शहरात मागील दोन दशकांपासून अनेक गृह प्रकल्प सुरू आहेत. पोषक हवामान, दळणवळणासाठी रेल्वे आणि महामार्ग, दर्जेदार शिक्षण व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले दवाखाने आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणारी प्राथमिक नागरी सुविधांची सोय या कारणांमुळे सुमारे २५ वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे या निर्सगाच्या कुशीत वसलेल्या शहराकडे मुंबईकरांचे लक्ष वेधले गेल्याने ‘तळ्याचे गाव’ अशी ओळख असणारे तळेगाव आता खऱ्या अर्थाने डेस्टिनेशन तळेगाव झाले आहे.
तळेगाव दाभाडे शहरातील आल्हाददायीपणा, स्वच्छ व सुंदर हवा, सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक सुविधा या सर्व कारणांमुळे अगदी सुरुवातीच्या काळात निवृत्तिधारकांसाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण म्हणून तळेगाव स्टेशन परिसरातील यशवंतनगरचा विकास झाला. महाराष्ट्राची आíथक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे तर औद्योगिक राजधानी नाशिक या त्रिकुटाच्या मध्यांवर वसलेल्या तळेगाव शहरात अगदी सर्वसामान्यांना परवडेल या दरात सदनिका उपलब्ध असल्याने अनेकांनी हौसमौज म्हणूनही येथे त्या खरेदी केल्या. सुटीचे दिवस स्वछंदपणे निर्सगाच्या सान्निध्यात मजेत घालवण्यासाठीचा हा ट्रेण्ड कालांतराने गुंतवणूकदारांनी व्यापला. आज हा ट्रेंड सर्वदूर पसरला असून मुंबई व पुणेकरांनी घरांसाठी तळेगावला पहिली पसंती दिली आहे.
तळेगाव दाभाडे शहराच्या लगत मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिलेल्या तळेगाव औद्योगिक वसाहतीमुळेही या शहराच्या बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळाली. मुंबईकर बिल्डरांबरोबरच स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी येथे जम बसविण्यास सुरुवात केली. जसजशी घरांची मागणी सातत्याने वाढत गेली, तसतशी शहरातील गृहप्रकल्पांची चळवळ अजूनच बळकट झाली. अगदी धनिकांपासून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे गृहप्रकल्प उभे राहू लागल्याने तळेगाव शहर सर्वाना आपलेसे वाटते. वाढत्या नागरीकरणांमुळे सध्या प्राइम लोकेशनच्या जागांवर घरांची मागणी जोर धरून आहे. यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचे उपनगर म्हणून तळेगावची नवीन ओळख निर्माण झाली आहे. शहरात गृहनिर्माण चळवळीसोबत येथे येणाऱ्या नागरिकांच्या तसेच स्थानिक तळेगावकरांच्या व मावळाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्यासाठी तळेगावात सर्व प्रकारचे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांचे जाळे देखील विणले गेले आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी तळेगावात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, अध्यापक महाविद्यालय आणि इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू झाल्याने यामुळे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी देखील तळेगावची वेगळी ओळख आहे. आजमितीला तळेगावात छोटे मोठे मिळून सुमारे दीडशे बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या पाच वर्षांतील शहरातील सरासरी उलाढाल पाहिली तर ती एकूण दोन हजार कोटींच्या आसपास असल्याचे चित्र आहे. स्वस्त दरातील घराकडे लोकांचा कल असल्याचे दिसते. काही बडे बिल्डर्स सीमोल्लंघन करून ग्रामीण भागात टाऊनशिप उभारत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल या दरात वडगाव, वराळे, आंबी, साते, कान्हे आणि नाणे व आंदर मावळातही बिल्डरांनी प्रकल्प सुरू केले आहेत. तळेगाव दाभाडे शहरातील अनेक राजकीय मंडळींनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये यश संपादित केले असून स्वस्त दरात नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची कसरत करताना बांधकामांचा दर्जा उत्तम ठेवला असल्याने तळेगावात घर घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. येथे घरांच्या सोबत मुलांसाठी चिल्ड्रन पार्क, जिम, जाँगिग ट्रॅक, वाचनालय, विरंगुळा केंद्र, मंदिर अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सुमारे सव्वाशे वर्षांचा वारसा लाभलेल्या व ऐतिहासिक शहराची नगरपालिका अशी ख्याती असलेली तळेगाव नगरपालिका देखील या प्रकल्पांना सुविधा पुरविण्यात कोठेही कमी पडत नाही. वाढत्या नागरीकरणांमुळे नागरिकांना प्राथमिक व भौतिक सुविधा पुरविण्याचे शिवधनुष्य पेलत आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विकासाच्या राजकारणात खांद्याला खांदा लावून काम करण्याची परंपरा या शहरातील राजकारणात असल्याने तळेगावला मावळ तालुक्याचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जाते. द्रष्टय़ा नेत्यांमुळेच तळेगावाला हे वैभव प्राप्त झाले आहे. एमआयडीसीमुळे वाढती कारखानदारी व भविष्यात येऊ घातलेला आयटी हब प्रकल्प यामुळे तळेगावात घर घेण्यासाठी उच्चभ्रूंची मागणी वाढते आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त तळेगाव दाभाडे शहर हे सध्या सेकंड होमचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. या शहरात आपले हक्काचे किमान एक घर असावे, ही मनीषा सध्या सर्व स्थरातून प्रखरतेने प्रगल्भ होत आहे. पीएमआरडीएने हा सर्व परिसर त्यांच्या कार्यकक्षेत घेतल्यामुळे आगामी काळात खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातील ‘स्मार्ट नगरी म्हणून तळेगाव दाभाडे शहर’ नावलौकिकास येणार हे निश्चित!
तळेगाव दाभाडे शहरातील आल्हाददायीपणा, स्वच्छ व सुंदर हवा, सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक सुविधा या सर्व कारणांमुळे अगदी सुरुवातीच्या काळात निवृत्तिधारकांसाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 1:20 am

Web Title: profitable investment for home in historical heritage city talegaon
Next Stories
1 तळेगाव एमआयडीसीला बहुराष्ट्रीय कंपन्यांची पसंती
2 तळेगावात आयटी पार्क विचाराधीन
3 फ्लॅटचे कन्व्हेयन्स आणि फौजदारी गुन्हा
Just Now!
X