हौसिंग सोसायटीचा सेक्रेटरी हा त्या संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. संस्थेचा कारभार व्यवस्थितपणे करणे आणि संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे ही त्याची मुख्य जबाबदारी असते. त्याने कोणती कामे करावयाची असतात अशी एकंदर २३ कामे असतात. त्यांची सविस्तर माहिती उपविधी क्र. १४० मध्ये देण्यात आली आहे. त्यापकी २१ क्रमांकाचे काम पुढीलप्रमाणे आहे. सदस्यांकडून झालेल्या उपविधी भंगांची प्रकरणे आणि त्यामुळे त्यांना भरावयाच्या दंडाची प्रकरणे समितीच्या सूचनांप्रमाणे संबंधित सदस्यांच्या नजरेस आणणे (उपविधी क्रमांक १६५) अशी १४० क्रमांकाच्या उपविधीत तरतूद असताना खुद्द सेक्रेटरीनेच उपविधी भंग केला तर? येथे एक गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी की, सेक्रेटरीपद आकाशातून पडत नाही. निर्वाचित संस्थांमधूनच सेक्रेटरीची निवड होत असते. म्हणजे मुळात तो सभासदच असतो. म्हणून सेक्रेटरी असताना त्याने एखाद्या उपविधीचा जाणूनबुजून भंग केला तर उपविधी क्रमांक १६५ प्रमाणे तोदेखील दंड करण्यास पात्र होतो. ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे कल्याण येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या खुद्द सेक्रेटरीने आपल्या सदनिकेत, उपविधी क्रमांक ४६ (अ)(ब)(क) प्रमाणे संस्थेची पूर्वपरवानगी न घेता केलेल्या अनधिकृत बदलांची, त्या सोसायटीनेच ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनकडे केलेली तक्रार.

उपविधी क्र. ४६

गृहनिर्माण संस्थेच्या समितीचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांना दंडात्मक कारवाईची तरतूद सहकार कायद्यात नाही
संस्थाव्यवहार

हा उपविधी (अ) म्हणतो-कोणताही सदस्य त्याच्या सदनिकेमध्ये, समितीच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे जादा बांधकाम किंवा त्यात फेरबदल करणार नाही.

(ब) सदनिकेत जादा बांधकाम अगर बांधकामात फेरबदल करू इच्छिणारे सदस्य संस्थेच्या सचिवाकडे जरूर त्या तपशिलासह अर्ज करील. अशा अर्जावर संस्थेच्या सचिव व समिती यांजकडून उपविधी क्र. ६३ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.

(क) संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बांधकाम आराखडय़ात कोणताही बदल करता येणार नाही.

सचिवाकडून सदनिकेची पाहणी व दुरुस्तीबाबत अहवाल उपविधी क्र. ४७ हा सचिवाच्या पदाचे किती महत्त्व आहे, हे विशद करतो. हा उपविधी (अ) म्हणतो-समितीस उपविधी क्र. १५६ अन्वये नमूद केलेली आपली काय्रे पार पाडता यावीत म्हणून संस्थेच्या प्रत्येक सदस्याने, सचिव व समितीपकी कोणीही एक सदस्य यांना सदनिकेची स्थिती तपासून, त्यास काही दुरुस्तीची आवश्यकता आहे काय याची खात्री करून घेण्यासाठी संबंधित सदस्यास पूर्वसूचना दिल्यास, त्याने आपल्या सदनिकेत प्रवेश करू दिला पाहिजे. संस्थेचा सचिव समितीकडे या संबंधीचा आपला अभिप्राय सादर करील व त्यामध्ये कोणत्या दुरुस्त्या संस्थेने करावयास व कोणत्या दुरुस्त्या सभासदाने स्वखर्चाने करावयास हव्यात त्याचा तपशील नमूद करील. (याबाबतचा सविस्तर मार्गदर्शन उपविधी क्र. १५९ मध्ये आहे.)

(ब)अशा प्रकारे अहवाल प्राप्त झाल्यावर उपविधी क्र. १५९(अ) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे संस्थेला स्वखर्चाने कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा खर्च किती त्याची खातरजमा करील व समिती दुरुस्ती करण्यासंबंधी आपला इरादा असल्याबद्दल सदस्यास तिला योग्य वाटेल अशा मुदतीची नोटीस बजाविण्याचा विचार करील व त्यानंतर संबंधित सदस्य संस्थेकडून थेट किंवा वास्तुशास्त्रज्ञाकडून नेमण्यात आलेल्या कामगारांना दुरुस्तीचे काम पार पाडण्यासाठी सदनिकेत प्रवेश देईल. संबंधित सदस्याने जर वाजवी आणि पटतील अशी कारणे न देता आपल्या सदनिकेत प्रवेश करू दिला नाही, तर संस्थेच्या सचिवास सदनिकेत प्रवेश करण्याचा व समितीने त्या संबंधात प्राधिकृत केलेल्या सदस्याच्या किंवा संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञाच्या देखरेखीखाली काम पार पाडण्याचा अधिकार राहील.

(क) ज्या दुरुस्त्या सदस्याने स्वखर्चाने करावयाच्या आहेत त्याच्या बाबतीत समिती सदस्याला त्याच्या सदनिकेत आवश्यक असलेल्या दुरुस्त्यांचा तपशील नमूद करून एक नोटीस बजाविण्याची व्यवस्था करील व संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञाचे कोणताही असल्यास समाधान होईल, अशा रीतीने सदनिकेच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चाने समिती नेमून देईल त्या कालावधीत पूर्ण करण्याचे फर्मावील. नोटिशीत दिलेल्या बाबींची पूर्तता करण्यात सदस्याकडून कसूर झाल्यास सदस्याला योग्य ती नोटीस दिल्यानंतर त्या सदनिकेत प्रवेश करण्याच्या व दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेण्याचा अधिकार संस्थेच्या सचिवास अगर संस्थेने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञास राहील. संस्थेने अशा दुरुस्तीवर खर्च केलेली रक्कम संबंधित सदस्याकडून वसुलीयोग्य असेल.

उपविधी क्र. १५९ मधील दुरुस्त्यांचा तपशील संस्थेने स्वखर्चाने कोणत्या दुरुस्त्या करावयाच्या आणि कोणत्या दुरुस्त्या सदनिकाधारकाने करावयाच्या याचा तपशील उपविधी क्रमांक १५९ (अ) आणि (ब) मध्ये दिला आहे. १५९ (अ)-

(१) सर्व अंतर्गत रस्ते

(२) आवाराच्या िभती

(३) बाहेरील नळ मार्ग

(४) पाण्याचे पंप

(५) पाणी साठविण्याच्या टाक्या

(६) मलनिस्सारण वाहिन्या

(७) सेफ्टिक टँक्स

(८) जिने

(९) गच्ची आणि छपराच्या कडेची िभत

(१०) जिन्यावरील दिवे

(११) रस्त्यावरील दिवे

(१२) इमारत/इमारती

(१३) सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या, त्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप आणि मलनिस्सारण वाहिनीतून होणाऱ्या गळत्या यांचाही समावेश होतो

(१४) सदनिकेतील मेन स्विचपर्यंतच्या विद्युत वाहिन्या

(१५) उद्वाहने

(१६) पावसाच्या पाण्याची गळती झाल्यामुळे सर्वात वरील सदनिकेतील खराब झालेले छत व त्यावरील गिलावा

(१७) जनरेटर्स

(१८) सुरक्षा साधने (सीसीटीव्ही, इंटरकॉम, ग्रुप मोबाइल, अलार्म बेल)

(१९) रेन वॉटर हार्वेिस्टग

(२०) मलप्रणाल, पावसाचे पाणी वाहून जाणे आणि पाणी प्रक्रिया संयंत्र

(२१) खासकरून वाटप न केलेली सामायीक क्षेत्रे, तरणतलाव, जिम, सोनाबाथ

(२२) सामायिक वाहनतळ

(२३) कॉफी हाऊस, सौर आणि पर्यायी ऊर्जास्रोत

(२४) बगिचा

(२५) समाज हॉल

(२६) संस्थेची वायफाय संरचना.

सदस्यांनी करावयाची कामे

(ब) उपविधी क्र. १५९ (अ) मध्ये समाविष्ठ नसलेल्या सर्व दुरुस्त्या सदस्यांना स्वखर्चाने कराव्या लागतील. शौचालयामुळे, मोरीमुळे होणाऱ्या गळत्या संबंधित सदनिकाधारकाने स्वत:च्या खर्चाने, संस्थेची मान्यता घेऊन दुरुस्त केल्या पाहिजेत.

सेकट्ररीची कामे

सोसायटीच्या सेक्रेटरीने एकंदर २३ प्रकारची कामे करावयाची असतात त्यांचा तपशील उपविधी क्र. १४० मध्ये दिला आहे. त्यापकी काही कामे पुढीलप्रमाणे आहेत.

१) संस्थेच्या मालमत्तेची तपासणी करणे (उपविधी क्र. ४७(अ) (२) सदनिकांमध्ये करावयाच्या दुरुस्ती संदर्भात नोटीस पाठविणे (उपविधी क्र. ४७(ब) (३) संस्थेची देयके देण्याबाबत मागणी नोटीस, बिले तयार करणे व पाठविणे (उपविधी क्र. ६९) (४) समितीच्या निदर्शनास आलेली संस्थेची थकबाकीची प्रकरणे हाताळणे (उपविधी क्र. ७०) (५) सर्वसाधारण सभेच्या व सर्व सभांच्या नोटिसा पाठविणे (उपविधी क्र. ९८) (६) सर्व सभांच्या इतिवृत्ताची नोंद ठेवणे (७) समितीच्या सभांना उपस्थित राहणे आणि त्यांचे इतिवृत्त नोंदणे (उपविधी क्र. १३६) (८) सदस्यांकडून झालेल्या उपविधी भंगाची प्रकरणे आणि त्यामुळे त्यांना भरावयाच्या दंडाची प्रकरणे समितीच्या सूचनांप्रमाणे संबंधित सदस्यांच्या नजरेस आणणे (उपविधी क्र. १६५). ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही अशा सर्वसाधारण सभेच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ आणि उपविधीतील खालील जबाबदाऱ्या पार पाडणे.

वरील तपशिलावरून सेक्रेटरीची कामे किती महत्त्वाची आहेत असे दिसून येते. त्यामुळे सेक्रेटरीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने उपविधी क्रमांक ४६ चा उघड उघड भंग करावा, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. याबाबत संबंधित संस्था जागरूक आहे, ही समाधानाची बाब आहे. त्या संस्थेने आपल्या महापालिकेच्या आयुक्तांची समक्ष भेट घेऊन, त्या सेक्रेटरीची मनमानी उघड करावी आणि त्याने आपल्या सदनिकेत केलेल्या फेरबदलांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तपासणी करण्याची लेखी विनंती आयुक्तांस करावी तसेच उपविधी क्रमांक १६५ नुसार संस्थेने विशेष सर्वसाधारण सभेकडून उपविधी भंगाचा ठराव पारित करून तो सदनिधारक दोषी ठरला तर त्यास पाच हजार रुपयांचा दंड करावा; एवढेच नव्हे तर अशी व्यक्ती सेक्रेटरीपद भूषविण्यास लायक नाही असा ठराव पारित करून त्यावर अविश्वासाचा ठराव पारित करावा. एवढेच नव्हे तर त्याने संस्थेच्या स्थर्यास धोका उत्पन्न केल्याबद्दल त्याची संस्थेच्या सदस्य वर्गातून उपविधी क्र. ४९, नियम २८ आणि कलम ३५ खाली हकालपट्टी करावी. मात्र याबाबतीत संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या विभागाच्या उपनिबंधकांशी समक्ष चर्चा करून संबंधित सेक्रेटरी विरुद्ध पुढील कार्यवाही करावी. आवश्यक वाटल्यास संस्थेने वकिलाचा सल्ला घ्यावा आणि तो खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करावा. कोणत्याही परिस्थितीत संस्थेचा सामान्य सभासद असो किंवा सेक्रेटरीसारखा पदाधिकारी असो त्याची मनमानी चालू देऊ नये.

मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि.