गच्चीचे वॉटरप्रुफींग हे संपूर्ण इमारतीच्या रखरखावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वाच्या माहितीची व मुंबई परिसरात प्रचलीत असलेली टेरस वॉटरप्रुफींगची पद्धत म्हणजे ब्रिक ब्याट कोबा सिस्टम. ही पद्धत साधारणपणे ७० ते ८० वर्षांपूर्वी वापरात आली व ती उत्तर भारतातील धाब्याच्या घरांवरती असलेल्या ‘सुर्खी’ या प्रकाराची सुधारीत अवृत्ती होती.

इमारतीच्या ढाच्यामध्ये सर्वात वरती असलेले आवरण म्हणजे छप्पर. हे त्या संपूर्ण बांधकामाचे ऊन व पाऊस यापासून सक्षमरित्या संरक्षण करणारे असावे लागते. पूर्वी ते उतरत्या स्वरुपात होते व त्याचे बरेच काही फायदे होते. आता त्याचे स्वरूप बदलून ते पसरट झाले आहे व त्यास गच्ची असे संबोधले जाते.
गच्चीचे वॉटरप्रुफींग हे संपूर्ण इमारतीच्या रखरखावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वाच्या माहितीची व मुंबई परिसरात प्रचलीत असलेली टेरस वॉटरप्रुफींगची पद्धत म्हणजे ब्रिक ब्याट कोबा सिस्टम. ही पद्धत साधारणपणे ७० ते ८० वर्षांपूर्वी वापरात आली व ती उत्तर भारतातील धाब्याच्या घरांवरती असलेल्या ‘सुर्खी’ या प्रकाराची सुधारीत अवृत्ती होती.
ब्रिक ब्याट कोबा प्रकारच्या वॉटरप्रुफींग पद्धतीत विटांचे तुकडे सिमेंटच्या मालामध्ये उतरंडीवर लावले जातात. व त्यावर चायना मोझाईक अथवा सिमेंट घुटाई (सिमेंटचा गुळगुळीत थर)चे फिनीशिंग केले जाते. या पद्धतीचे फायदे असे की, पाण्यासाठी उतार सहजरित्या साधला जातो. थरांच्या जाडीमुळे खालच्या मजल्यावरील घरामध्ये गरमी जाणवत नाही. या पद्धतीचे काम करण्यास खास कौशल्याची गरज नसल्यामुळे मनुष्यबळ व लागणारी साधनसामुग्री सहजरित्या उपलब्ध होते. कामांमध्ये काही उणीवा राहिल्यास त्या नजरेत येण्यास ६ ते १० वर्षांचा काळ जातो. मुंबईतील जागेच्या टंचाईमध्ये काही हजार फुटांची मोकळी अधिक जागा उपलब्ध होते, वगैरे. बहुधा या व अशाच कारणांमुळे ब्रिक ब्याट कोबा पद्धती फार सहजपणे प्रचलीत झाली. इतकी की, तिची चिकीत्सा करावयास किंवा दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यास कोणी तयार नाही.
ब्रिक ब्याट कोबा पद्धतीची संपूर्ण उपयुक्तता जाणून घेण्यापूर्वी काही किमान गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. त्या अशा-
सिमेंट कधीच वॉटरप्रुफ नसते, काँक्रीटला विशिष्ट पदार्थ घालून वॉटरप्रुफ बनवावे लागते व त्याला काही मर्यादा असतात. काँक्रीट मुलता असंख्य बारीक पोकळी असलेला पदार्थ असून तो एकसंघ (सॉलीड मास) स्वरुपाचा नसतो. वॉटरप्रुफींग थरांमध्ये घुसलेले पाणी नष्ट होत नाही, तर ते जमा होऊन बाहेर येण्यासाठी मार्ग तयार करते. पाण्याला दाब असतो व तो सर्व दिनाशी सारखाच प्रसारीत होत असतो पाणी सतत प्रवाही असते.
या पद्धतीला मुख्यता सिमेंट, रेती, विटांचे तुकडे व काही पावडरी, सिंमेटची रोधक क्षमता निर्माण करण्यासाठी वापरले जातात. सिमेंट मोरटार (माल) व विटांचे तुकडे पाण्याला विरोध करीत नाहीत तर पाणी धरून ठेवतात. हे साठलेले पाणी प्रवाही होते व निरनिराळे रस्ते बाहेर येण्यासाठी निर्माण करते. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रचंड गरमी असते. त्यामुळे गच्चीचा पृष्ठभाग तापतो व आत गेलेले पाणी प्रचंड दाबाखाली बाहेर येण्याचा प्रयत्न करते. त्यातून फटी निर्माण होतात. प्रत्येक येणाऱ्या मौसममध्ये या फटी व झिरपणारे पाणी यांचे प्रमाण काही पटीत वाढत असते. निर्माण झालेल्या फटी रूंद होत असतात. या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात पाणी गुरुत्वाकर्षणाने खाली जाते व स्लॅबमध्ये उतरते. हे पाणी खालच्या दिशेने रस्ता करून जेव्हा खालील घराच्या सिलिंगवर प्रकट होते तेव्हा लिकेज सुरू झाली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात लिकेजची प्रक्रिया फार अगोदर सुरू झालेली असते व त्याची जाणीव होईपर्यंत कॉलम, बिन, स्लॅब वगैरे काँक्रीटच्या भागांची भरपूर नुकसानी झालेली असते.
आपल्या सभोवतालच्या नित्य वापरातील वस्तुंची योग्यता जाणण्यासाठी रॉकेट सायन्सची जरूरी नसते. प्रत्येक माणसाला स्वत:ची बुद्धी असते, उलट सुलट विचार करण्याची क्षमता असते. अनुभवाने तो योग्य अयोग्य वस्तु पडताळून पुढील मार्गिका साकारत असतो. यालाच सामान्यज्ञान म्हणत असावेत.
ब्रिक ब्याट कोबाच्या बाबतीत काही प्रश्न विचारात घ्यावेत, ते असे की- जर ही पाणी रोधक व्यवस्था आहे तर मग सिलिंग व इतर ठिकाणी काही वर्षांनी पाणी का येते? बिम, कॉलम, स्लॅब यांच्या सळ्या गंजून प्रचंड नुकसान का होते? जगामध्ये ही पद्धत कुठे कुठे वापरात आहे? परदेशात ब्रिक ब्याट कोबा न वापरता त्यांचे वॉटरप्रुफींग ४०/४५ वर्षे का टिकते? त्यांच्या इमारती शेकडो वर्षे उभ्या असताना आपल्या इमारती ३०/३५ वर्षांतच धोकादायक स्थितीला हा पोहचतात? ब्रिक ब्याट कोबा सिस्टममध्ये असा कोणता पदार्थ आहे की जो ताकदीने झिरपणाऱ्या पाण्याला रोखून पाण्याचे थरांमध्ये शोषण थांबवतो? काय ब्रिक ब्याट कोबा ही १००% वॉटरप्रुफींग पद्धत आहे, जेणे करून इमारतीच्या ढाच्यामध्ये पाणी जाण्याची क्रिया थांबवण्याची शक्ती आहे? काय टेरस वॉटरप्रुफींगला दुसरे पर्याय आहेत?
पूर्वीपेक्षा आताच्या काँक्रीटची प्रत अतिशय उत्तम आहे. इमारतीचे डिझाईन व लेआऊट यामध्ये कमालीचे चांगले बदल झाले आहेत. कधी नव्हते एवढे चांगले बांधकाम साहित्य उपलब्ध आहे. हे सर्व वापरून आपण ब्रिक ब्याट कोबा वापरणार असू तर मग येत्या ३० वर्षांनंतर आपले वारस पुनर्विकासाच्या तयारीत असले तर आश्चर्य वाटायला नको. बरोबर आपण अनुभवातून काहीच शिकलो नाही हे ही सिद्ध करायला तयार असू!
शैलेश कुडतरकर – shaileshkudtarkar81@gmail.com

Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?