कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच करणे अनेकांसाठी आव्हानात्मक असते. विशेषत: स्थावर मालमत्तेबाबत खरेदीत नवख्यांचा गोंधळ हमखास उडत असतो. तुम्ही व्यवहार करीत असलेल्या मालमत्तेसंबंधी इत्थंभूत तपशील तुमच्याकडे असल्यास व्यवहार सुकर होण्याबरोबरच तुम्हाला चांगले घरही मिळण्याची शक्यता उंचावते. सध्या घरांच्या किमतीत होत असलेले चढ-उतार पाहता एक खरेदीदार म्हणून चालू घडामोडींबाबत तुम्ही दक्ष असायलाच हवे.
तुमच्या पहिल्या घराच्या खरेदीची प्रक्रिया सुलभ बनविणाऱ्या व नवीन घरात सुखकर प्रवेशापूर्वी करावयाच्या गोष्टी या अशा-
तुमची नेमकी गरज लक्षात घ्या
पहिल्यांदाच घर खरेदी करीत असताना तुमच्या चार भिंतींबाबत नेमकी गरज काय हे निश्चित करणे खूपच महत्त्वाचे आहे. तुम्हाला नेमके कसे घर हवे आहे? तुमच्या विद्यमान कुटुंबासाठी हे घर पुरेसे ठरेल काय? घरासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार आहात? हे असे काही प्रश्न आहेत, ज्याचे उत्तर तुम्ही घराचा शोध सुरू करण्यापूर्वी पक्के करायला हवे.
ठिकाण निश्चित करणे
एकदा तुम्हाला नेमके किती मोठे घर हवे आहे, हे पक्के झाल्यावर ते कोणत्या ठिकाणी हवे हे तुम्ही ठरविले पाहिजे. घरासंबंधीचा व्यवहार हा बहुधा एकदाच केला जाणारा दीघरेद्देशी व्यवहार असल्याने तुम्ही व तुमचे संपूर्ण कुटुंब सुख-समाधानाने राहू शकेल अशाच ठिकाणी तुम्ही घर पाहणे स्वाभाविक आहे. ठिकाणासंबंधाने तुमच्या कुटुंबाच्या महत्त्वाच्या गरजा म्हणजे नजीकच्या परिसरात चांगली शाळा असणे, रुग्णालय आणि बाजारहाटीची व्यवस्था कशी आहे तसेच शेजारपाजार चांगला असणे या आहेत. शिवाय, तुमच्या कामाच्या ठिकाणापासून हे संभाव्य घर जवळ अथवा निदान प्रवासासाठी सोयीचे असायला हवे.
तुमचे बजेट ठरवून घ्या
घराच्या शोधापूर्वी लक्षात घ्यावयाची ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात, तुमचे बजेट किती यावरूनही तुमचा घराच्या शोधाला मर्यादा आपोआपच पडतील. तुमच्या कुवतीपल्याड घर घेतले जाणार नाही याची काळजी म्हणून आधीच तुम्ही घरासाठी किती खर्च पाहात आहात हे निश्चित करावे लागेल.
खरेदीसाठी अर्थसाहाय्याचा स्मार्ट बंदोबस्त
तुमच्या घर खरेदी व्यवहारातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वत:चे ऐसपैस घर हे तुमच्यासह तुमच्या कुटुंबाने जपलेले जीवनाचे स्वप्न आणि त्यासाठी कदाचित आयुष्यातून एकदाच व्यवहार तुम्ही करीत आहात. त्यामुळे या घर खरेदी व्यवहारासाठी अर्थसाहाय्य / गृहकर्ज योजना निवडताना स्मार्टपणा दाखविला नाहीत, पुढील किमान १०-१५ वर्षे तुमच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटल्याची व त्यापायी नाना तक्रारी, कटकटी सोसण्याची तुमच्यावर पाळी येईल. त्यामुळे तुमच्यापुढे असणाऱ्या पर्यायांची योग्य ती तुलनात्मक छाननी करून त्यापैकी एकाची निवड तुम्हाला करावी लागेल.
सल्लागाराची मदत घ्या
पहिल्यांदाच घर खरेदी म्हणजे अर्थातच यासंबंधीच्या व्यवहाराचा पूर्वानुभव तुमच्याकडे नसेल. त्यामुळे स्थावर मालमत्ता तज्ज्ञाची याकामी मदत मिळविणे नेहमीच शहाणपणाचे ठरेल. नियमित कामाचा मोठा व्याप मागे आहे आणि घराच्या निवडीची प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावयाची आहे, अशावेळी तर अशी मदत आवश्यकच ठरेल. एकदा तुम्हाला हवे असलेल्या आकारमानाचे आणि पसंतीचे ठिकाण (लोकेशन) निश्चित झाले की, पुढील सर्व कार्य तुम्ही या तज्ज्ञावर सोपवू शकाल. तो तुम्हाला सर्वोत्तम घर व अगदी किमतीबाबत सर्वोत्तम पर्याय तुम्हाला स्वत: फारशी मेहनत न घ्यावी लागता तुमच्यापुढे ठेवू शकेल. शिवाय सर्वोत्तम गृहकर्ज योजनांचीही माहिती तो तुम्हाला पुरवू शकेल.
पसंत केलेल्या घरासंबंधी छाननी
जर तुम्हाला एखादे घर पसंत पडले, तर थेट खरेदी करू नका. या घरासंबंधी छाननी पद्धतीची प्रक्रिया पूर्ण करणे केव्हाही उचित ठरेल. प्रत्यक्ष वास्तूच्या प्रत्येक कानाकोपऱ्याला चाचपून पाहायला हवे, कुठे काही बिघाड दिसत असेल तर तो भविष्यातील कटकट टाळण्यासाठी लक्षात घ्यायला हवा. शिवाय पाइप फिटिंग्ज, विजेच्या जोडण्या योग्य त्या ठिकाणी आहेत, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
किमतीबाबत वाटाघाटी आवश्यकच!
घर तर पसंत पडले, पण किमतीबाबत तो सर्वोत्तम पर्याय आहे काय? या संदर्भात किंचितशीही शंका असल्यास तर विक्रेत्याकडे ती उपस्थित करून शक्य तितक्या वाटाघाटीचा प्रयत्न सुरू ठेवावा. अर्थात विशिष्ट किमतीवर अडून बसणेही योग्य नाही. विक्रेताच तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही याची काळजी घेत, तुम्ही सांगत असलेली घराची किंमत कशी योग्य आहे, हे त्याला मुद्देसूद पटवून देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हवे तसे घर मिळाले आणि त्यासाठी ज्यादा किंमतही चुकती करावी लागली नाही, यापेक्षा दुसरे समाधान नसेल.
एकदा तुम्ही घराची पसंती व खरेदी निर्णय घेतल्यावर तुम्हाला त्यासाठी सुयोग्य गृहकर्जाची निवड करता येईल.

आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा
घराची खरेदी आणि त्यासाठी विनासायास गृहकर्ज मिळविताना काही दस्तऐवज तुम्ही आधीपासून तयार ठेवायला हवेत. म्हणजे गरजेच्या वेळी कागदपत्र मिळविताना वेळ वाया जाणार नाही. सर्व कायदेशीर बाबीही पूर्ण केल्या जातील याचीही काळजी घ्या. अर्थात घर खरेदीचे वैध करारपत्र तुम्ही मिळविले आहे याची काळजी घ्यायला हवी.
दीपक बगाती
(लेखक एसएमई फायनान्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
mumbai malad 14 year old girl dies first period stress How to maintain mental health of a girl during the first period What should be the role of parents doctor said
पहिल्या मासिक पाळीवेळी मुलीचं मानसिक आरोग्य कसं जपावं? पालकांची भूमिका कशी असावी? वाचा…
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा