|| अनघा नाईक

आधुनिक काळातील ग्लोबल वॉìमगमुळे, पर्यावरण जतनीकरणाची व नसíगक स्रोतांचे संवर्धन करण्याची मोहीम सर्वत्र सुरू आहे. नसíगक मूलभूत स्रोतांपकी ‘पाणी’ हे समस्त जीवसृष्टीला अत्यावश्यक असलेले व संवर्धनाची अनिवार्य गरज असणारे आहे. आज अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या उद्भवते. अशा वेळेस रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचा वापर करून आपण या समस्यांवर तोडगा काढीत आहोत. पण ‘सुजलाम्सुफलाम् असलेल्या भारत देशाला कला व तंत्रज्ञान यांची सर्वोत्तम सांगत घातलेल्या प्राचीन स्थापत्य कलेचा वारसा मिळाला आहे. अशा शास्त्रांचा उलगडा करताना आपल्याला हे आढळून येते की काळाच्या पुढे जाऊन निसर्गाला सोबत घेऊन पर्यावरण जतनीकरणाकरिता अनेक क्लृप्त्या वापरल्या गेल्या होत्या. चालू घडीतील ‘रुल्स आणि रेग्युलेशन्स’च्या सापळ्यात अडकलेल्या नागर रचनेत नसíगक घटक बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. याविरुद्ध प्राचीन वास्तुकलेत नसíगक स्रोतांना महत्त्व देऊन त्यांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या सभोवार वास्तुरचनेची मांडणी केली जायची. त्या काळात सर्वतोपरी उपयोगी असलेल्या पाण्याची गरज समजून भविष्यात त्याची टंचाई भासू नये म्हणून केवळ तळी, ओढे, नदी, नाले अशा नसíगक स्रोतांवर अवलंबून न राहता विहिरी, कूप, बावडी / वाव, कुंड अशी मानवनिर्मित जलाशये बांधण्यात आली. वैशिष्टय़ म्हणजे, ही जलाशये केवळ पाण्याचा स्रोत म्हणून न ठेवता, त्याच्या सभोवार जागेचा वापर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या परीने करण्यात आल्यामुळे जलाशयांना त्या त्या वापरानुसार एक आकार व अस्तित्व प्राप्त होत असे. यातूनच ‘जलस्थापत्य शास्त्र’ या नवीन संकल्पनेचा उगम झाला. काळाच्या ओघात अंधूक झालेले अथवा दुर्लक्षित झालेले असे प्राचीन जलस्थापत्य शास्त्र हे सध्याच्या तांत्रिक युगातही सहजरीत्या आत्मसात होण्यासारखे आहे. अशा सुसंपन्न शास्त्राचा उलगडा करणारा हा लेख.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

भारतीय जलस्थापत्य शास्त्राचा उल्लेख ‘मायामता’, ‘वास्तुकर्मा’, ‘समरांगण सूत्रधार’, ‘ऋग्वेद’, ‘भृगुसंहिता’ अशा अनेक प्राचीन ग्रंथात झालेला दिसतो. शेतीचे तंत्र मानवाला अवगत झाले असता, त्याने आपली वस्ती नदीकिनारी अथवा जिथे पाण्याचा साठा असेल तिथे वसवली. त्यानंतर नदी, तळी असे नसíगक जलसाठे हे (सोशल गॅदिरग स्पेस) सामाजिक जमावाच्या जागा बनत गेले. त्यातूनच नदीकिनारी ‘घाट’ बांधणे सुरू झाले. हळूहळू सांस्कृतिक व सामाजिक विकास झाल्यावर, अशा घाटांजवळ तीर्थक्षेत्रे बांधण्यात आली, ज्यामुळे नदी व तिच्या समांतर रचलेल्या ‘घाटांना’ धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. भारतातील प्रमुख नद्यांपकी गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा या नद्यांच्या किनारी बांधलेले ‘घाट’ हे आजही धार्मिक केंद्रिबदू म्हणून कार्यरत आहेत. माणसाला शिल्पशास्त्र अवगत झाल्यावर विहिरी, बावडी, कुंड, कूप, पुष्करणी, वापी, ताड्.गा, हौद असे अनेक कृत्रिम जलसाठे निर्माण करण्यात आले.

प्राचीन काळातील हडप्पा व मोहनजोदडो अशा पुरातन नगरांचा अभ्यास करता आपल्याला आढळून येईल, की त्या नागर रचनेतही ‘ग्रेट बाथ’ या संकल्पनेत पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. मानवनिर्मित या जलाशयात सामूहिक स्नानाची संकल्पना ही त्या वेळच्या दूरदृष्टिकोनाचे अजरामर प्रतीक आहे. पुढे वेदिक काळात विकसित झालेल्या नागर रचनेतही भूगर्भशास्त्राचा व जलस्रोतांचा अभ्यास करून शहरांचे विविध प्रकारचे आराखडे केले जायचे. सर्वतोभद्र, नंद्यावर्त, पद्मक, दंडक, अशा नागर रचनांत दिशांचा व भूगर्भशास्त्राचा विचार करून प्रत्येक खंडात एक अशा प्रकारे विहिरी अथवा कुपा केल्या जायच्या. मुंबईतील कान्हेरी गुंफा, औरंगाबाद येथील अजिंठा, एलोरा गुंफा अशा गुंफांमध्ये अशा लहान कुपा आढळून येतात.

विहिरी अथवा कुपांची पुढची विकसित पायरी म्हणजे ‘बावडी’ (स्टेप वेल). यामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी पाहून तिथपासून जमिनीच्या पातळीपर्यंत पायऱ्या बांधण्यात यायच्या. पाण्याच्या सभोवार, जमिनीच्या खाली इमारत बांधली जायची. पाण्याला चारही बाजूंनी वेढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण अतिशय कमी व्हायचे. जमिनींतर्गत व पाण्याच्या सभोवार असल्यामुळे तेथील हवा थंड राहायची, ज्यामुळे अशा इमारतींमध्ये गारवा निर्माण व्हायचा. आधुनिक काळामध्ये जागतिक तापमान वाढीला पर्याय म्हणून ‘थर्मल कूलिंग’सारखे उपाय हे भारतात अशा प्रकारे कित्येकर्वष आधीच झालेले आपल्याला दिसतात. गुजरात, राजस्थान यांसारख्या अतिउष्ण व वाळवंटी प्रदेशात अशा ‘बावडी’ / ‘वाव’ बऱ्याच ठिकाणी बांधल्या गेल्या होत्या. अशा जागा केवळ पाण्याचा स्रोत म्हणून न राहता, त्या जागा सामाजिक व सांस्कृतिक सामूहिकीकरणासाठी वापरल्या जायच्या. बाहेरील वातावरणात कितीही उष्णता असली तरी आजही त्या ‘बावडीतील’ पायऱ्यांनी खाली उतरताना अनुभवायला मिळणारा गारवा अवर्णनीय असतो. ‘राणी की वाव’ हे त्या वेळेच्या स्थापत्य शास्त्राचे व शिल्पकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

त्या वेळेस नसíगक स्रोतांबरोबर काही मानवनिर्मित जलाशये अतुलनीय होती. ‘कुंड’ ही अशाच मानवनिर्मित जलाशयापकी एक सर्जनशील संकल्पना. भारतात धार्मिक व सांस्कृतिक विकास होत असताना अनेक मंदिरे बांधण्यात आली. या मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या आधी अशी तळी बांधून त्यातील पाणी स्नानासाठी अथवा तीर्थ म्हणून पिण्यासाठी वापरले जायचे. चौरसाकृती वा क्वचित आयताकृती असलेल्या कुंडाच्या चारी बाजूंनी पायऱ्यांची वैशिष्टय़पूर्ण रचना केली होती. हवनकुंडाप्रमाणे आकार असलेले हे कुंड पाण्याचा साठा म्हणून तर होतेच, पण त्याचबरोबर सभोवार असलेल्या पायऱ्यांची आकर्षक संरचना आणि मंदिराचे पाण्यामध्ये पडत असलेले प्रतििबब हे त्या वेळेच्या सर्जनशील वास्तुकलेचे प्रतीक आहे. तंत्रज्ञान व कलात्मकतेचे सर्वोत्तम उदाहरण असलेले मोदेरा येथील सूर्यमंदिर हे तेथील ‘कुंडांमुळेच’ जगप्रसिद्ध आहे. आताच्या चालुघडीतील ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे प्रतिबिंब भारतात पाचव्या-सहाव्या शतकातच ‘कुंडांच्या’ स्वरूपात पडले होते.

‘पुष्करणी’ हेही मानवनिर्मित तळ्यांचा एक प्रकार आहे. ‘पुष्करणी’चा उल्लेख अनेक वेदकालीन वाङ्मयातही झालेला दिसतो. आकाराने अत्यंत मोठे असलेले हे तळे व त्याचा परिसर हा विविधरंगी फुलांनी आच्छादला जायचा. विस्तृत तळ्यांमध्ये फुललेली कमळे, त्याच्या किनारी नाना रंगी फुलांनी बहरलेली झाडे, तळ्यात शुभ्र हंस, बगळे, बदके असे ‘पुष्करणी’चे वर्णन वेदकालीन साहित्यात आढळते. मानवनिर्मित तळ्यांचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘तड्.गा’. याचा आकार शक्यतो वर्तुळाकार वा अंडाकृती असतो. तळ्याच्या सभोवार पायऱ्या असतात. प्रत्येक पायरीनंतर थोडी जागा सोडलेली असते. ही जागा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अथवा सामूहिकीकरणासाठी वापरली जाते.

‘मुघल’ वास्तुकलेतही पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. फतेपूर सिक्रीमध्ये निर्माण केलेल्या तळ्यात मधोमध चौथरा बांधलेला आहे. पाण्याने वेढलेला चौथरा व त्याला जोडण्यासाठी चारही बाजूंनी असलेले पूल हे त्या वेळेची कलात्मकता दर्शवितात. जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’च्या समोर यमुना नदीचे पाणी वापरून कृत्रिमरीत्या बनवलेल्या आयताकृती तळ्यात ठिकठिकाणी कारंजे लावलेली आहेत. आग्रामधील रणरणत्या उन्हात अशा कारंज्यांमुळे सभोवतालच्या वातावरणात गारवा निर्माण होतो. त्याचबरोबर तळ्यांमध्ये पडलेले वास्तूचे प्रतिबिंब नेत्रदीपक ठरते. औरंगाबाद येथील ‘पाणचक्की’ म्हणजे तर तंत्रज्ञान व स्थापत्य कलेची अद्भुत सांगड आहे. सध्या नवीन वाटणारी ‘टेरेस पाँिडग’ची संकल्पना भारतात चौदाव्या शतकातच आत्मसात झाली होती. ‘पाणचक्की’ म्हणजे पाण्याच्या दाबाने चालवली जाणारी चक्की. या वास्तूत खालच्या पातळीवर त्या वेळेस सभामहल होता. या महालावर त्याच्या छपरावर हौद बांधले होते. तसेच तांत्रिक रचना अशी केली होती की ज्यामुळे त्या हौदातील पाणी त्याच्या शेजारी बांधलेल्या चक्कीच्या चाकावर पडत होते. पाण्याच्या सततच्या दबावामुळे संलग्न असलेले जाते सहजरीत्या फिरले जायचे व चक्की पाण्याच्या दाबामुळे कार्यरत व्हायची. असे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान चालू घडीतील ‘वॉटर टर्बाइन्स’ वा तत्सम संकल्पनेच्या तोडीस तोड आहे.

समृद्ध असलेल्या आपल्या प्राचीन शास्त्रातील या सर्जनशील व नावीन्यपूर्ण क्लृप्त्या इतक्या सहज व सोप्या आहेत की त्याचा आधार घेऊन व त्याला आधुनिकीकरणाची जोड लावून, आपण निसर्गाला सोबत घेऊन प्रगती करू शकतो. आपल्या प्राचीन शास्त्रांचा गíभतार्थ शोधून निसर्गाची मत्री करणे ही आता काळाची गरज आहे. या शास्त्राचा उलगडा समाजाला अधिकाधिक व्हावा यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. चला तर मग, मत्रीच्या या मोहिमेवर आपण सगळे एकत्रितपणे कार्यरत होऊ.

vastu5anagha@gmail.com