25 April 2019

News Flash

वास्तु-मार्गदर्शन

आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

मी ८३ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आणि विधवा असून, ठाणे येथील गौतम टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटीत २० वर्षे राहत आहे. संस्थेने नवीन शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी जुने शेअर सर्टिफिकेट मागून घेतले आणि या गोष्टीला आता आठ महिने झाले आहेत; अद्याप ते शेअर सर्टिफिकेट देत नाहीत, तसेच माझ्या विनंतीला-पत्राला ते दाद देत नाहीत. खरेदीच्या साखळी प्रक्रियेतील एक करारनामा नसल्यामुळे आम्ही नवीन शेअर सर्टिफिकेट देत नाही, असे सांगितले जाते. याबाबत उपनिबंधक यांच्यामार्फतही मी पत्रव्यवहार केला.

ही दोन पत्रे अध्यक्षांना पाठवली, पण त्याचीही दखल घेतली गेली नाही.

– इंदुमती कुलकर्णी, नौपाडा, ठाणे.

आपल्या प्रश्नावरून गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी कशी मनमानी करतात याचा एक दाखला मिळाला. खरे तर कोणत्याही कारणास्तव संस्थेचे पदाधिकारी कुणाचेही भाग प्रमाणपत्र अडकवून ठेवू शकत नाहीत अथवा भाग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करू शकत नाहीत. आपल्याजवळ जर उपनिबंधकांनी दिलेले (भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीचे) आदेश असतील तर आपण उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या सहीने भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधी विनंती करावी आणि त्यांनी सांगितलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. उपनिबंधक स्वत: संस्थेचे दप्तर ताब्यात घेऊन अशा प्रकारे शेअर सर्टिफिकेट देऊ शकतात.

हेही शक्य न झाल्यास संस्थेला एक कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याविरुद्ध सहकार न्यायालयात अथवा दिवाणी न्यायालयात दाद मागता येईल.

ghaisas2009@gmail.com

First Published on December 1, 2018 2:03 am

Web Title: article about architectural guidance