भगवान मंडलिक

केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१६ रोजी देशातील ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट असलेल्या शहरांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील ठाणे</span>, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कल्याण</span>डोंबिवली शहरांचा समावेश होता. शहरांचे नागरीकरण मोठय़ा संख्येने होत आहे. नोकरी, उद्योग, व्यवसायांमुळे ग्रामीण तरुणकुटुंबे अधिक संख्येने शहरी भागांत येत आहेत. या शहरांचे नियंत्रक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मात्र अपेक्षित महसुलाची साधने नसल्याने वाढत्या लोकवस्तीला पायाभूत सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. या शहरांना विकासासाठी आर्थिक साहाय्य करून त्यांना सक्षम करावे. एकदा ही शहरे विकास, नागरी सुविधांमध्ये सक्षम झाली की तेथे रोजगाराच्या संधी येतील.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

कल्याणडोंबिवली मुंबईच्या वेशीवरील शहरे. ९० वर्षांपूर्वी गावाच्या रूपात ही दोन्ही शहरे होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथे कारभार चालत होता. नोकरी, व्यवसाय वाढत गेला, तसा गावाकडून आलेला चाकरमानी मुंबईपासून जवळचे, प्रवासाला येजा करण्यासाठी सुखरूप असलेले शहर म्हणून या दोन्ही शहरांचा कायमचा निवासी झाला. लोकसंख्या वाढली तशी या गावांच्यात ५० वर्षांपूर्वी नगरपालिकेचा कारभार सुरू झाला. नगरपालिकेच्या काळात या दोन्ही शहरांच्यात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या पुरेशा नव्हत्या. ऑक्टोबर १९९५ पासून कल्याणडोंबिवलीत महानगरपालिकेच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. २०१० पर्यंत १० लाख लोकसंख्या असलेली कल्याण, डोंबिवली शहरे २०१८ पर्यंत १५ ते १६ लाख लोकसंख्येच्या घरात पोहोचली आहेत. या शहरांची लोकवस्ती ज्या वेगाने वाढते, त्या वेगाने नागरी सुविधा देताना पालिकेची दमछाक होत आहे. पालिकेचे महसुलाचे स्रोत कमी आणि नागरी सुविधांचा खर्च दुप्पट अशी परिस्थिती असल्याने विकासाचा ताळमेळ या शहरात कधी बसला नाही. त्यामुळे मुंबईच्या वेशीवरील ही शहरे विकासाच्या वाटेवर नेहमीच चाचपडत राहिली. वेळोवेळी या शहरांवर घाणेरडे, अस्वच्छ शहरे म्हणून आरोप झाले. ही प्रतिमा पुसण्याची संधी केंद्र, राज्य शासनाच्या आर्थिक सहकार्याने कल्याणडोंबिवली पालिकेला मिळाली आहे. एक हजार कोटींचा निधी या उपक्रमातून पालिकेला मिळणार आहे. केवळ निधी आला. निविदा काढल्या. टक्केवारी मिळाली आणि कामे रेंगाळली असा प्रकार होऊ नये म्हणून प्रत्येकाचे दायित्व या विकासकामांत ठेवण्यात आले आहे. केंद्र, राज्य आणि पालिकेने आपले हिस्से या निधीत ठेवले आहेत. कामे मार्गी लागण्यासाठी केंद्र सरकारचा राज्य सरकारवर, राज्याचा पालिकेवर थेट अंकुश अशी व्यवस्था आहे. कामांच्या गतीसाठी ‘एमएमआरडीए’ आयुक्तांचे पालिकेवर नियंत्रण आहे. पालिकेत अनेक वर्षे निरपेक्ष भावनेतून, सरळ मार्गाने काम केलेले कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा हे सक्षम अधिकारी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अभियंता म्हणून काम पाहत आहेत. ही कामे योग्य रीतीने मार्गी लागण्यासाठी ‘विशेष वहन परियोजन’ (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन करण्यात आली आहे. या एकमेकांवरील दबाव तंत्र पद्धतीमुळे येत्या पाच ते सहा वर्षांत कल्याणडोंबिवलीत विविध विकासकामे पूर्ण होतील. विकासाचा नवीन चेहरा या शहरांना प्राप्त होईल.

स्मार्ट सिटी प्रकल्प  कल्याणडोंबिवली ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पालिकेने १४४१ कोटींचे २५ प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. ३०० कोटींचा निधी शासनाकडून मिळाला आहे. शहर विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे, अस्तित्वात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, शहरे हरित पट्टय़ात आणण्यासाठी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प राबविणे, अशा तीन टप्प्यांत विकासाचे नियोजन आहे.

दरवर्षी २०० कोटीप्रमाणे येत्या पाच वर्षांत एक हजार कोटींचा निधी शासनाकडून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांर्गत मिळणार आहे. रहिवाशांना अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन राहणीमानाचा दर्जा उंचावणे, हा स्मार्ट सिटीचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांसाठी पालिकेला स्वनिधीतून ४४० कोटींचा निधी उभारायचा आहे.

तीन तारांकित शहरे नगररचना विभागातर्फे ‘स्मार्ट सिटी’चा भाग म्हणून ‘नगर परियोजनेंतर्गत (टाऊन प्लॅनिंग स्कीम) कल्याण पश्चिमेत उल्हास खाडी किनारी उंबर्डे, वाडेघर गावातील २५० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन शहर वसविण्याचा आराखडा तयार केला आहे. कोरियन कंपनीने हे शहर वसविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयटी पार्क, सिटी पार्क, मनोरंजन नगरी, उद्याने, बगीचे सुविधा या नवनगरात पाहण्यास मिळणार आहेत. २७ गावांच्या पंचक्रोशीत ‘सुंदर नगरी’ वसविण्याचे नियोजन कल्याणडोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने केले आहे. दावडी, सोनारपाडा, माणगाव, उंबार्ली आणि हेदुटणे या गावांच्या हद्दीतील ४०० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सुविधांचे शहर वसविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेती बंदर खाडी किनारी २०० हेक्टर परिसरात अत्याधुनिक पद्धतीचे आखीवरेखीव ‘नवीन डोंबिवली’ शहर वसविण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाने तयार केला आहे. माहितीतंत्रज्ञानयुक्त आणि तारांकित संकुले हे या शहराचे वैशिष्टय़ आहे. खाडी किनारी भागाचे सुशोभीकरण करून नवीन शहराच्या सौंदर्यात भर घालण्यात येणार आहे.

तारांगण कल्याणडोंबिवलीत चांगले रस्ते, वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि मनोरंजन, पर्यटन स्थळाची साधने उपलब्ध व्हावीत या विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारातून कल्याणडोंबिवली पालिका हद्दीतील विकासकामांसाठी सुमारे ८० कोटींची कामे मंजूर केली. शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक येथे भुयारी मार्ग बांधणे. नेहरू तारांगणाच्या धर्तीवर कल्याणडोंबिवलीत अद्ययावत तारांगण उभारण्यासाठी पाच कोटी मंजूर केले आहेत.

हरित क्षेत्र हरित क्षेत्र विकासात एक हजार ११० चौरस मीटर क्षेत्रात गवताने आच्छादित केलेली मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. या कामासाठी ७ लाख ६८ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. १ हजार ४६० चौरस मीटर क्षेत्रात झुडपी झाडांची लागवड केली जाणार आहे. या कामासाठी नऊ लाख ५१ हजारांचा निधी, १२३ चौरस मीटर क्षेत्रात मैदान विकास करण्यात येणार आहे. या कामासाठी ९० लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मैदानांच्या सपाटीकरण व सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ४४ लाख २८ हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून डोंबिवलीतील एकतानगर, आयरे एस. आर. आणि कल्याण पूर्वेतील अ‍ॅरोमॅटिक प्लॅन्ट येथील पालिकेच्या आरक्षित भूखंडांवरील उद्यानांचा विकास आणि सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. हरित क्षेत्र विकास प्रकल्पामुळे पालिका हद्दीतील हरित पट्टय़ामध्ये चार टक्के वाढ होणार आहे.

आवास योजनेत घरे शहरी गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहा हजार घरे बांधून पूर्ण आहेत. या योजनेतील तीन हजार घरे ‘पंतप्रधान आवास’ योजनेसाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्याची मागणी पालिका प्रशासनाने शासनाकडे केली आहे. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आर्थिक दुर्बल घटकांना आवास योजनेतील घरे उपलब्ध करून देणारी कल्याणडोंबिवली पालिका ही प्रथम क्रमांकाची पालिका असणार आहे. पंतप्रधान आवास योजनेत तीन हजार घरे दुर्बल घटकांना विकल्यानंतर पालिकेला ४५० कोटींचा एकरकमी महसूल मिळणार आहे.

रेल्वे स्थानक विकास कल्याण मध्य रेल्वेचे जंक्शन आहे. एक हजारांहून अधिक लांब पल्ल्याच्या लोकल गाडय़ा या रेल्वे स्थानकातून दररोज धावतात. या रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा रेल्वेने तयार केला आहे. विविध प्रवासी सुविधा या माध्यमातून देण्यात येणार आहेत. मुंबईतील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ठाकुर्लीत लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी अप्पर रेल्वे टर्मिनस बांधण्यात येणार आहे. कल्याण परिसरातील उत्तर, दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईत दादर, कुर्ला किंवा ‘सीएसएमटी’ येथे जाण्याची गरज लागणार नाही.

मेट्रो मार्ग ठाणेभिवंडीकल्याण २१ किमी लांबीचा २२०० कोटींचा मेट्रो मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. कल्याणमधील मेट्रोचा शेवटचा थांबा पत्रीपुलाजवळ आहे. कल्याणमधील मेट्रो मार्ग दुर्गाडी, लालचौकी, सहजानंद चौक ते रेल्वे स्थानक आहे. हा मार्ग खडकपाडय़ापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. कल्याणचा मेट्रो मार्ग डोंबिवली ते तळोजापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.

बदलापूरअंबरनाथमधील घर

किफायशीर दरात पायाभूत सविधांची हमी

काही नगरांना निसर्ग भरभरून देतो, बदलापूरअंबरनाथ हे त्यापैकी एक आहे. बदलापूरचा विचार करता विस्तीर्ण चौपदरी रस्त्यांनी बदलापूर पुणे, नाशिक, विरार आणि पनवेल या शहरांना जोडले जात आहे. काटईकर्जत मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. कल्याणबदलापूर रस्ता रुंदीकरण प्रकल्पही मार्गी लागला आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने बदलापूरहून मुंबईला एका तासात पोहोचणे आता शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व रस्ते टोल फ्री आहेत. पीकअवरमध्ये सरासरी दर दहापंधरा मिनिटांनी उपनगरी रेल्वे सेवा आहे. पुन्हा ठाणेकर्जत मार्गावर काही गाडय़ा सोडण्यात आल्याने रेल्वे प्रवास सुकर झाला आहे. वीज वितरणाचा अत्याधुनिक प्रकल्प बदलापूरसाठी मंजूर झाला आहे. डोंबिवलीप्रमाणेच एक सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे. येथील सांस्कृतिक उपक्रमांना व्यासपीठ मिळावे म्हणून शासनाने नाटय़गृहाच्या कामास मंजुरी देऊन निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लवकरच बदलापूरमध्ये नाटय़गृह साकार होईल. महानगरी सुविधा आणि निसर्ग सान्निध्य याचा सुरेख संगम बदलापूरमध्ये पहायला मिळतो. शहरापासून कोणत्याही दिशेने थोडे दूर गेले की निसगा्रचा आस्वाद घेता येतो. बदलापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर श्रीमलंग गड डोंगर रांगांच्या कुशीत एक चांगले जंगल आहे. दुसरीकडे मुरबाडच्या हद्दीवर बारवी धरण परिसरातही जंगल आहे. त्यामुळे गरज अथवा गुंतवणूक दोन्ही दृष्टीने कल्याणच्या परिघात घर शोधत असाल तर सध्या बदलापूर हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

श्रीमलंग गडाच्या कुशीतील चिखलोली आणि काकोळे या जलाशयांमुळे अंबरनाथची भूमी सुजलाम सुफलाम आहे. सुदैवाने हे दोन्ही जलाशय अद्याप शाबूत आहेत. दहा वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाकडून चिखलोली धरण विकत घेऊन पालिकेने अंबरनाथ शहराला स्वत:चा जलस्रोत उपलब्ध करून दिला. अंबरनाथव्यतिरिक्त महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही नगरपालिकेच्या मालकीचे धरण नाही. आता लवकरच शेजारचे बदलापूर त्या पंक्तीत येऊन बसेल. कारण भोज धरण बदलापूरला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात स्वत:च्या मालकीचे जलस्रोत असणे किती महत्त्वाचे आहे, ते वेगळे सांगायला नकोच. श्रीमलंग गड परिसरातील प्रस्तावित कुशवली धरण प्रकल्पातून भविष्यात अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

अंबरनाथचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथील समृद्ध औद्योगिक विभाग. स्वातंत्र्यपूर्व काळापासून धरमसी मोरारजी, विम्को, गॅरलिक, के. टी. स्टील, स्वास्तिक, वुलन मिल, केंद्र शासनाचा आयुध निर्माणी कारखाना आदी मोठे कारखाने अंबरनाथमध्ये होते. त्यापैकी बहुतेक कारखाने आता बंद झाले असले तरी अतिरिक्त अंबरनाथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आनंदनगर औद्य्ोगिक वसाहतीतील गोदरेज, महिंद्रा, सीएट आदी मोठया कारखान्यांनी ती परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

नियोजनबद्ध विकास

कल्याण, डोंबिवली शहरे ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होत आहेत. या शहरांचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रस्तावित प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

गोविंद बोडके, आयुक्त

स्मार्ट सिटी’मुळे सोयीसुविधा

कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून रस्ते, उड्डाण पूल, भुयारी मार्ग, खाडी किनारा विकास, ‘सिटी पार्क’ माध्यमातून पर्यटन स्थळ, रिंगरुट, रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प प्रशासनाने हाती घेतलेत. नवी मुंबई विमानतळ या शहरापासून जवळ आहे. भविष्यात येथे अधिक उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. परिणामी शहरातील गृहप्रकल्पांना ऊर्जितावस्था येणार आहे. शहरातील घरांच्या किमती वाढणार आहेत. मराठी वस्तीचे जुने शहर म्हणून कल्याणडोंबिवलीची ओळख आहे. विकासाच्या वाटेवरील या शहरात सर्व समाजघटकांना रास्त दरात घर उपलब्ध व्हावे, या उद्देशातून कल्याणमध्ये ‘एमसीएचआय’ने भव्य गृहप्रदर्शन आयोजित केले आहे. ठाण्यात सदनिकेचा सध्याचा दर १२ हजार रुपये चौरस फूट आहे. तोच दर कल्याणमध्ये सध्या चार ते सात हजार रुपये आहे. घर खरेदीदारांना रास्त दरात सदनिका खरेदीची संधी एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. विविध विकासकांच्या अनेक गृह प्रकल्पातील घरे एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध व्हावीत, हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. पालिकेने विकासकांना ‘मुक्त जमीन करात’ सवलत दिल्याने विकासकांना या माध्यमातून होणारा नफा ग्राहकांना देण्यात येणार आहे. ‘एमसीएचआय’ने यापूर्वी तसे जाहीर केले होते. त्यामुळे ‘एमसीएचआय’च्या कल्याणमधील गृहप्रदर्शनात विकासकांकडून घर खरेदी ग्राहकांना अनेक सवलती देण्यात येणार आहेत. या सुवर्ण संधीचा अधिकाधिक घर खरेदी ग्राहकांनी लाभ घ्यावा.

रवी पाटील, अध्यक्ष ‘एमसीएचआय’ कल्याण शाखा

रास्त दरात घरे

मुंबईठाण्याच्या तुलनेत कल्याण डोंबिवली आजही रास्त दरात घर मिळते, असा संदेश ‘एमसीएचआय’च्या ‘एक्स्पो’ या गृहप्रदर्शनातून आम्ही जनतेला देणार आहोत. कल्याणडोंबिवलीमध्ये विकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या विकासकामांमुळे भविष्यात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

मिलिंद चव्हाण, ‘एक्स्पो’ गृहप्रदर्शनाचे अध्यक्ष

घरासाठी पहिली पसंती

सध्या मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय लोकांची घर घेण्यासाठी पहिली पसंती कल्याण शिळफाटा रोड या परिसराला आहे. या भागात मध्य रेल्वे, कल्याणशिळफाटा रोड आणि एनएच १६० द्वारे मुंबईशी अधिक जवळ आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिंग रूटचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न तर सुटणार आहेच, शिवाय एमएमआरडीएच्या पुढाकाराने कल्याणडोंबिवलीत बीकेसीप्रमाणे व्यावसायिक व निवासी संकुल उभारण्यात येणार आहे.

निमेश सेजपाल, प्रमोटरआशापुरा ग्लोबल प्रोजेक्ट्स, डोंबिवली.

निसर्गाच्या सान्निध्यातलं घर

बदलापूर हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक तसेच क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे शहर आहे. बदलापूरची काही ठळक वशिष्ट्ये म्हणजे, हे शहर मुंबईशी रस्ता आणि रेल्वेमार्गे जोडले गेले आहे. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे प्रदूषण नाही. शहरात उत्तम रस्ते, बाजारपेठे आहे. त्यामुळे बदलापूर हे राहण्यासाठी योग्य शहर आहे.

किरण विसपुते, सीईओ, शाश्वत ग्रुप

सोयीसुविधांनी युक्त शहरे

अनेक जण मुंबई, ठाण्यानंतर कल्याणडोंबिवलीतील घराला अधिक पसंती देतात, असे निदर्शनास आले आहे. या दोन्ही शहरांचं राहणीमान दिवसेंदिवस उंचावत आहे. सामाजिकआर्थिक स्तरावरही या शहरांमध्ये सुधारणा होत आहे. स्टार्टअपमुळे येथे नोकरीच्या संधीही उपलब्ध होत आहेत, परिणामी अनेक जण येथे घर घेण्याला प्राधान्य देत आहेत. भविष्यातील मट्रो प्रकल्पामुळे मुंबईत जाणे अधिकच सोयीचे ठरेल. शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण, परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प यामुळेही कल्याणडोंबिवलीत घर घेणे अधिकच सोयीचे ठरणार आहे.

महेशजी अगरवाल, सीएमडी, रिजन्सी ग्रुप