|| कविता भालेराव

मुले लहान असो किंवा मोठी, त्यांची खोली डिझाइन करणं हे एक आव्हानच असतं. मुलांसाठी त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यानुसार आपण बनवू शकत नाही, पण नक्कीच काही अशा गोष्टींची रचना करू शकतो; जेणेकरून ती खोली त्यांना खूपच मजेदार आणि कल्पक वाटेल. काही गोष्टी या आपण काही काळानंतर बदलू शकतो तर काही कायम ठेवू शकतो. काही गोष्टी या खर्चीक असतात तर काही अगदीच परवडतील अशा असतात. आपल्यासाठी या दोघांचा मेळ घालून मुलांची खोली डिझाइन करता येऊ शकते.

specially abled father drop kids school on tricycle people will emotional after seeing this video
VIDEO : लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं! दिव्यांग वडिलांचा मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष; व्हीलचेअरवर बसून…
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

आकर्षक स्टोरेज

वॉर्डरोबव्यतिरिक्तही मुलांना बरेच स्टोरेज लागते. जसे ड्रॉवर्स, कंसोल युनिट. फíनचरचा पीस.. या गोष्टी निवडताना काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे. कारण त्या अनेक वष्रे वापरायच्या असतात. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांना बरंच स्टोरेज लागत असतं. त्यामुळे ते आपण खूप छान पद्धतीने डिझाइन करू शकतो.

शेल्फ, बॉक्सेस

बघायला गेलं तर याला आपण फळी म्हणतो. पण या फळ्यांचा योग्य वापर केला तर त्या खूपच आकर्षक दिसतात. आणि मग त्या फळ्यांच्या ऐवजी शेल्फ म्हणून ओळखल्या जातात. तसेच बॉक्सचे.. चौकोनी बॉक्स घेण्याच्या ऐवजी आपण कधी त्रिकोणी बॉक्स, कधी हनीकॉम्बच्या आकाराच्या बॉक्स तर कधी आपण चौकोन, आयताकृती, त्रिकोण यांचं कॉम्बिनेशन करून हे बॉक्स िभतीवर लावून घेऊ शकतो. या बॉक्सेसला वेगवेगळे रंग देऊ शकतो. त्यामुळे ते िभतीवर अगदी उठून दिसतात. पण बॉक्स आणि शेल्फ डिझाइन करताना एका गोष्टीची मात्र काळजी घ्यायला लागते- ती म्हणजे खोली. खूप खोल बॉक्स केले आणि थोडे खाली कमी उंचीवर लावले तर ते डोक्याला लागण्याची शक्यता असते आणि जर खूप उंच लावले तर मुलांचा हात पोहोचत नाही, त्यामुळे आपल्याला शेल्फ किंवा बॉक्स यांचे डिझाइन करताना त्यांची लांबी, रुंदी, उंची याचबरोबर आपण ते जमिनीपासून किती उंचीवर लावणार आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे.

फ्लोअिरग

जर का आपल्या घरामध्ये उत्तम दर्जाचे फ्लोिरग असेल तर मुलांच्या खोलीला वेगळे फ्लोिरग का? हा पहिला प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. फ्लोिरग म्हणजे लगेचच टाईल्स लावणे किंवा बदलणे हे नसते. आपण त्या खोलीत काप्रेट, रंग वापरू शकतो. आपण वॉल टू वॉल कारपेट लावू शकतो किंवा भौमितिक आकाराचे काप्रेटचे पीसही खोलीत ठेवू शकतो.

कारपेट निवडताना आपल्याला बरीच काळजी घ्यायला लागते. मुलांच्या खोलीत शक्यतो वूलन काप्रेट हे वॉल टू वॉल घेऊ नये. आकर्षक रंगाचे आणि पॅटर्नचे कारपेट बाजारात उपलब्ध आहेत आणि हे वेगवेगळ्या मटेरियलचे मिळतात. काही कारपेट स्वच्छ करणे सोपे असते तर काही व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छ करता येतात. मुले सतत जमिनीवर पसारा काढून खेळत असतात. बऱ्याच गोष्टी या जमिनीवर बसूनच करत असतात. त्यामुळे आपण आपल्या असलेल्या फरशीवर जर काप्रेट लावले तर उत्तमच.

वॉल डेकोरेशन

रूम सजावटीचे सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे वॉल डेकोरेशन. यात आपण विविध रंगांचा वापर करू शकतो. वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या पॅटर्नमध्येदेखील आपण िभतीवर वापरू शकतो. हे झाले रंगाविषयी.

जर का आपल्याला खूप ब्राइट कलर, वेगळे कलर वापरायचे नसतील तर िभतीवर चिकटवायला काही स्टिकर्स बाजारात मिळतात, त्यात खूप डिझाइन्स उपलब्ध आहेत. आपण यांचाही वापर भिंतीच्या सजावटीकरता करू शकतो.

आपण काही चित्रांचाही वापर वॉल सजावटीकरता करू शकतो उत्तम दर्जेदार  ुं२३१ूं३ पेंटिंग्स, स्र्स्र् आर्ट, ग्राफिटी फ्रेम्स, ब्लॅक अँड व्हाईट फोटोंच्या फ्रेम- ज्यात चार्ली चापलीनचे चित्र असतील किंवा काही शहरांविषयीची चित्रं असतील, काही अजून वेगळे आर्ट असतील असे खूप सुंदर चित्र किंवा फोटो हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये उपलब्ध आहेत. आपण अशा  कल्पकतेचा वापर करून आपण त्यांची अभिरुची उंचावण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

मजेदार वस्तू

मजेदार वस्तू किंवा गोष्टी म्हणजे तरी काय! खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टी असतात, पण या बघितल्यानंतर एक आनंद मिळतो. त्यांच्याकडे थोडा वेळ बघून आपले बरेच ताणतणाव विसरून जातो. मुलांनाही काही अशा इंटरेिस्टग गोष्टींची गरज असते; ज्यामुळे त्यांचा ताण हलका करू शकतील. नक्की कशा प्रकारच्या या वस्तू असतील याचे थोडक्यात तुम्हाला काही उदाहरणं देऊ शकते.

जसे काही सििलग हँिगग गोष्टी असतील, ज्या तुम्ही सििलगला लटकवू शकता. फॅन सुरू झाल्यावर त्या फिरत राहतात. त्याचे वेगवेगळे आकार बनतात. त्या रंगीबेरंगी असतात. त्या फिरायला लागल्या की तिचे रंग हे वेगवेगळे दिसतात, जे बघायला अतिशय छान वाटतं. मुलांच्या बेडच्या वर छतावर काही अक्षराची पेंटिंगज्, काही गमतीदार कार्टून काढणं किंवा त्यांना जे आवडतं त्याचे चित्र काढणे; जेणेकरून ते पलंगावर झोपताना त्यांना आनंदी वाटलं पाहिजे. कुठेतरी इंटरेिस्टग वॉलपेपरचा पॅटर्न तयार करणे किंवा खूपच छान आणि वेगळा असा वॉलपेपर लावणे अधिक पूर्ण रूमला लावायची काहीच गरज नाहीये. अगदी छोटय़ा भागात लावा, पण तो पाहून एकदम फ्रेश वाटलं पाहिजे.

प्रिंट, पॅटर्न आणि फíनिशग

रूममधील फíनिशग म्हणजेच खोलीचे पडदे उशांचे कवर बेडशीट. पडदे यांमध्येही आपण वेगवेगळ्या प्रिंटचा वापर करू शकतो. आपण या रूमसाठी जे सगळं फíनिशग करणार आहोत, त्यामध्ये ही थीम डिझाइन करून त्याचे प्रिंट घेऊन तसं उत्तमरीत्या वापर करून ही रूम कलरफुल आणि चीअर फुल असे दोन्ही बनवू शकतो.

लाईट

नैसर्गिक प्रकाशाबरोबरच कृत्रिम लाईटही फार महत्त्वाचा असतो. मुलांना संध्याकाळी अभ्यास करायला भरपूर लाईट आवश्यक आहे. आपण स्टडी टेबलला लाईटची व्यवस्था करतो. पण नुसता स्टडी टेबलचा लाईट देणं पुरेसं नाही. मुलांच्या खोलीत नाइटलाइट असणं अतिशय आवश्यक आहे. एक मंद आणि थोडा प्रकाश हा रात्रभर मुलांच्या खोलीत असला पाहिजे. मार्केटमध्ये अतिशय सुंदर नाइटलॅम्प वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. सििलगची उंची जर का बारा फूट अशी काही असेल तरच हँिगग लॅम्प लावणे उत्तम. साईड टेबलवर रीिडग लॅंप असणे गरजेचे आहे. सगळ्या रूम्सची सजावट ही लाईटवर अवलंबून असते.

प्रत्येकच वेळी रूम डिझाइन करताना सगळ्या गोष्टी या कायमच्या असल्या पाहिजेत असा विचार अजिबातच करू नका. मुलांच्या खोलीत आवश्यक असलेलेच फíनचर हे कायमच दर्जेदार असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच ते आपण दर्जेदार घेऊ शकतो आणि या बाकीच्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टी आहेत- जे त्या रूमला अतिशय रंजक बनवतात, सर्जक बनवतात त्या गोष्टी आपण सातत्याने बदलू शकतो. अशा गोष्टी या माफक दरात बनवून घेणे किंवा विकत घेणे हे सोयीचे असते.

मुलांना नेहमीच सतत बदल आवडत असतो; त्यामुळेच आपण काही गोष्टी या अशा बनवल्या की ज्याआपण त्या काही वर्षांनी बदलू शकतो आणि नवीन करू शकतो, तर ते मुलांना नक्कीच आवडू शकते.

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)