|| कविता भालेराव

आजकाल स्वयंपाकघराची संकल्पनाच बदललेली आहे. आता पूर्वीसारखं अंधारलेलं, छोटीशी खिडकी, थोडं चिकट असं स्वयंपाकघराचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येत नाही; तर एक फ्रेश, सुटसुटीत पण सुबक स्वयंपाकघराचं चित्र डोळ्यांसमोर येतं. अनेकजण आपल्या किचनविषयी अतिशय जागरूक असतात. ते वापरायला सोपं आणि उपयुक्त कसं असेल याची काळजी घेत असतात. उपयुक्ततेबरोबरच स्वयंपाकघर हे आकर्षक असणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच स्वयंपाकघर बनवताना त्याच्या फर्निचरच्या रंगसंगतीबद्दलही विचार होणं फार आवश्यक असतं.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

सुंदर आणि फ्रेश रंगसंगती असलेल्या स्वयंपाकघरात काम करायला प्रसन्न वाटतं. आजकाल बाजारात खूप नवीन प्रकारची मटेरियल्स आली आहेत- जी मॉडय़ुलर किचनमध्ये वापरली जातात. या सगळ्या मटेरियल्समध्ये वेगवेगळे रंगदेखील उपलब्ध आहेत. आता पूर्वीसारखे ठरलेलेच रंग वापरायची गरज उरलेली नाही. आपण आपल्याला आवडतील अशा टाइल्स बरोबर कोणती रंगसंगती सुरेख दिसेल याचा नीट अभ्यास केला तर आपले स्वयंपाकघर हे अतिशय सुंदर दिसेल.

आता प्रश्न पडतो की, स्वयंपाकघरात कशा पद्धतीची रंगसंगती वापरायची? खूप रंग आवडतात म्हणून खूप जास्त रंग एकत्र करूनही स्वयंपाकघर बनवू नये. थोडक्यात, योग्य रंगसंगतीचा वापर करणे महत्त्वाचे.

  • एकाच रंगाच्या विविध छटा वापरून फर्निचर बनवू शकतो.
  • जर का स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रकाश छान असेल तर आपण गडद रंग वापरू शकतो.
  • स्वयंपाकघर छोटं असेल तर थोडय़ा फिकट रंगाचा वापर करून ते मोठं वाटेल अशा पद्धतीचं डिझाइन करू शकतो.
  • फर्निचरचा रंग हा आपण कोणत्या रंगाच्या टाइल्स वापरणार आहोत, कोणत्या रंगाचा किचन ओटा आहे यावर ठरवावा लागतो.
  • याशिवाय आपण मॉडय़ुलर किचनसाठी कोणतं मटेरियल वापरतो आहोत, त्या मटेरियलच्या फिनिशिंगवरही रंगसंगती अवलंबून असते.
  • दोन वेगवेगळी मटेरियल्स जर का आपण वापरणार असू, तर त्या मटेरियल्सचंफिनिशिंग लक्षात घेऊन मगच रंगाची निवड करावी.
  • रंग निवडताना आपण स्वयंपाकघर किती स्वच्छ ठेवतो त्यावर त्याची रंगछटा अवलंबून असावी.
  • जर का आपलं फिनिशिंग मटेरियल हे टेक्श्चर फिनिशिंगमध्ये असेल तर मात्र रंग निवडताना आपल्याला निश्चितच काळजी घ्यायला हवी.
  • ओपन पद्धतीच्या किचनमध्ये आपल्याला किचनबरोबरच लिव्हिंग रूमच्या रंगसंगतीचा विचार करणं आवश्यक आहे.
  • कोणताही रंग हा मॅट आणि ग्लॉसी या फिनीशमध्ये वेगळा दिसतो.

किचन फर्निचरसाठी वापर करू शकतो अशा जरा वेगवेगळ्या रंगसंगती जाणून घेऊ –

  • सफेद रंग- सफेद रंग हा किचनला छानच दिसतो. या रंगामुळे किचन मोठं दिसतं, पण हा रंग वापरताना जरा जपून, कारण अशा वेळी सतत स्वच्छता ठेवावी लागते, कारण यावर थोडा जरी डाग राहिला तरी आपलं किचन खराब दिसू शकतं. किचन प्लॅटफॉर्म जरी ब्लॅक असेल तरी सफेद रंगाचं फर्निचर शोभून दिसतं.
  • राखाडी आणि पिवळा- राखाडी आणि पिवळा ही रंगसंगती फारच छान दिसते. एक थोडी डल शेड आणि एक ब्राइट शेड त्यामुळे या रंगसंगतीचा विचार जरूर करावा.
  • नेव्ही ब्लू आणि ऑरेंज- ही रंगसंगती आपण फर्निचरसाठी नक्कीच वापरू शकतो. याशिवाय आपण ऑरेंज रंग टाइल्ससाठीआणि नेव्ही ब्लू हा फर्निचरसाठी अशा प्रकारेही आपण वापरू शकतो.
  • फिकट निळा आणि सफेद- मनाला अगदीच शांत वाटणारी अशी ही रंगसंगती लहान स्वयंपाकघरात तर अतिशय सुरेख दिसते आणि या लाइट कलर्समुळे किचन मोठं आणि प्रशस्त वाटतं.
  • पांढरा आणि लाल/ पिवळा/ नारंगी- एकदमच फ्रेश रंगसंगती. पांढऱ्या रंगासोबत तसे वेगवेगळे रंग छान दिसतात, पण हे तीन रंग वापरले तर स्वयंपाकघर एकदम टवटवीत, प्रसन्न दिसतं आणि काम करायलाही छान वाटतं.
  • प्लेन कलर आणि वूड कलर- संपूर्णपणे वूड फिनिश किचन हा ट्रेंड आता नाहीये. आपण लाल, पिवळा, पांढरा, निळा, राखाडी अशा प्लेन रांगाबरोबर वूड कलरची रंगसंगती करू शकतो. या रंगसंगतीने बनविलेलं किचन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतं.
  • दोन वेगवेगळे रंग वापरण्याऐवजी एकाच रंगाच्या विविध छटा आपण वापरू शकतो. संपूर्ण राखाडी, तपकिरी, काळ्या रंगाचं किचन हेसुद्धा खूप सुबक दिसतं.
  • आपण पांढऱ्या रंगाची फार पटकन निवड करीत नाही. संपूर्ण काळ्या रंगाचं किचन हे फारच आकर्षक दिसतं. काळ्या रंगाबरोबर जर का आपण ब्रासचाही वापर केला तर त्या किचनला रॉयल लुकच येतो.

स्वयंपाकघरासाठी या रंगसंगतीशिवायही आपण खूप वेगवेगळी रंगसंगती वापरू शकतो. रंगाची निवड करताना जरा जपूनच करणं. किचनमधील नैसर्गिक प्रकाश, कृत्रिम प्रकाश, किचन प्लॅटफॉर्मचं मटेरियल आणि त्यांचा रंग याचा अभ्यास व्यवस्थित करणं योग्य. आजकाल वापरल्या जातात किंवा त्यांचा ट्रेण्ड आहे म्हणून कोणत्याही रंगाची निवड करू नका. ती रंगसंगती खरंच आपल्या घराला शोभेल का? आपण त्याची नीट काळजी घेऊ शकतो का, अशा प्रत्येक बारीसारीक बाबींचा नीट अभ्यास करूनच आपलं किचन बनविणं.

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)