नसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून, आपापल्या परीने आपल्या राष्ट्राच्या प्रगतीला, प्रदूषणमुक्त जीवनाला व पर्यावरणाच्या संवर्धनाला हातभार लावण्याच्या हेतूने; नसर्गिक ऊर्जा स्रोताची, त्यांचा वापर करावयाच्या साधनांची थोडक्यात माहिती देणारी लेखमाला..
आपल्या सर्वाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या आणि आपल्या मूलभूत गरजा असणाऱ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. पण आता आधुनिक जगात अजून एका गोष्टीचा यात समावेश केला पाहिजे व ती म्हणजे ऊर्जा! येथे ऊर्जा म्हणजे वीज अथवा इंधन होय.
आपला देश सध्या अतिशय वेगाने प्रगती करतो आहे. निरनिराळे उत्पादक उद्योग जसे रसायन, खते, सिमेंट, वाहन, अभियांत्रिकी, कापड, अन्न इ. तसेच सेवा क्षेत्र जसे माहिती व तंत्रज्ञान, घर बांधणी, शेती, इ. त्याचप्रमाणे मोठे मोठे मॉल्स, व्यापारी संकुले, हॉटेल्स, सिनेमागृहे यांसारख्या सर्वच क्षेत्रात आपण अगदी जोमदार प्रगती करीत आहोत.
हे सर्व करत असताना सर्वाधिक गरज असते ती ऊर्जेची, पर्यायाने विजेची वा इंधनाची!
इंधन मग ते वाहनासाठी असो, कारखान्यांमध्ये उत्पादनांसाठी असो वा स्वयंपाक घरामध्ये अन्न शिजविण्यासाठी असो, सगळीकडे त्याची मोठय़ा प्रमाणात मागणी असल्याने एकतर त्याची कमतरता भासते किंवा त्याची किंमतही सतत वाढत जात असल्याने ती न परवडणारी असते.
त्याचप्रमाणे वीज- मग ती एखाद्या झोपडीमध्ये चमचमणारी असेल अथवा एखादा महाल उजळवून टाकणारी असेल. एखाद्या लहानशा दुकानाला पुरणारी असेल, नाही तर एखाद्या भव्य मॉलमध्ये डोळे दिपवून टाकणारी असेल- सर्वाना ती आवश्यकच!
जसजसे आपले राष्ट्र प्रगती करीत राहील व आपली आधुनिकतेकडे जास्तीत जास्त ओढ राहील तसतशी इंधनाची व विजेची मागणी ही वाढतच राहील आणि तिचा तुटवडादेखील वाढतच जाईल. आपल्या देशाचे व राज्याचे सरकार पुरेशी वीजनिर्मिती करण्यासाठी व नियमित वीजपुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेच, पण सततच्या वाढत्या मागणीमुळे व बदलत्या निसर्गचक्रामुळे त्यालाही काही मर्यादा पडतात. त्याबरोबरच, अशा बदलत्या निसर्गचक्रामुळे वा अन्य कारणांमुळे पुरेसा पाऊस, तोही वेळेत पडत नसल्यामुळे पाणीटंचाईचे संकटही आपणा सर्वावर कमी जास्त प्रमाणात घोंघावत असते. अशा परिस्थितीमध्ये सर्व गोष्टींचा हवाला सरकारवर ठेवून सरकारी यंत्रणेला दोष देत बसण्यापेक्षा अशा परिस्थितीवर व टंचाईवर मात करण्यासाठी आपण नागरिकांनी पुढे आले पाहिजे. वीज किंवा इंधन टंचाईवर मात म्हणजे केवळ वीज/इंधन बचत करणे नव्हे, तर वीज/इंधननिर्मितीचे नवनवीन मार्ग शोधणे व अंगीकारणे होय! अशा वीज/इंधननिर्मितीचा सर्वात सोपा व चांगला मार्ग म्हणजे नसर्गिक ऊर्जेचा वापर! तसेच पाणीटंचाईवर उपाय म्हणजे जलनिर्मिती शक्य नसली तरी पाण्याची योग्य प्रकारे साठवणूक, पाण्याचा पुनर्वापर इ. मार्गाचा अवलंब  करणे. सुदैवाने आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश, वारा, तसेच वेगवेगळ्या जैविक इंधनाची निसर्गदत्त व मानवनिर्मित देणगी लाभली आहे. या सर्वाचा वापर करून आपण सौरऊर्जा, वायूऊर्जा व जैविक इंधनावर चालणारी संयंत्रे वापरून आपणांस दैनंदिन लागणारी वीज व इंधन तयार करून वापरू शकतो व या टंचाईवर मात करण्यासाठी आपापल्या परीने हातभार लावू शकतो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे नसर्गिक ऊर्जास्रोत म्हणजेच सूर्य, वारा, जल, जैविक/सेंद्रिय पदार्थ इ. पासून मिळणारी ऊर्जा योग्य प्रकारे वापरण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करता येतो ते पाहू.
अ)    सूर्य अथवा सौरऊर्जा- आपल्या देशाच्या बहुतेक भागात वर्षांकाठी जवळपास १० ते ११ महिने स्वछ सूर्यप्रकाश मिळतो. ही सौरऊर्जा वापरण्याचे साधारणत: दोन प्रकार आहेत. पहिला थर्मल किंवा हिटिंग म्हणजे पाणी तापविणे, त्याची वाफ करून ती वापरात आणणे, अन्न शिजविणे  इ. व दुसरा फोटोव्होल्ताइक म्हणजे वीज निर्मिती करणे.
ब)     वायू- सतत वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. आपणा सर्वाना भल्याथोरल्या पवनचक्क्या माहिती असतीलच. पण अगदी लहान प्रमाणात घरगुती वापरासाठी वीजनिर्मिती करणाऱ्या पवनचक्क्यादेखील बाजारात उपलब्ध आहेत.
क)     सेंद्रिय पदार्थापासून मिळणारा जैविक वायू. हा फक्त शेणापासूनच मिळविता येतो असे नसून त्याची निर्मिती वेग वेगळ्या जैविक पदार्थापासून करून तो स्वयंपाकासाठी इंधन किंवा वीजनिर्मिती अथवा वाहनांसाठी इंधन म्हणूनही वापरता येतो.
ड)     जल- सुरुवातीस नमूद केल्याप्रमाणे, सध्याच्या पाणीटंचाईच्या, दुष्काळाच्या काळामध्ये पाण्यापासून वीज/इंधन निर्मितीपेक्षा त्याची जास्तीत जास्त बचत, साठवणूक व पुनर्वापर करण्यावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी रेन वाटर हार्वेिस्टग, वॉटर रिसायकिलग असे प्रकार उपलब्ध आहेत.
याशिवाय वीज बचतीस अत्यंत साहाय्यकारक पण त्याच वेळेस जास्त प्रकाश देणारे एलईडी दिवे वापरून आपण वीज बचत करू शकतोच, पण आपले वीज बिलदेखील कमी करू शकतो!

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर