प्राची पाठक

घरातल्या दारं, खिडक्यांचा समाचार आपण मागील भागात घेतला. त्यांना लटकवून ठेवलेले सामान, कपडे, कानाकोपऱ्यात अडकवलेल्या शोभेच्या वस्तू, माळा, खुपसून ठेवलेल्या गोष्टी अशा सर्व गोष्टींचा आढावा घेतला. घरातल्या सर्व दारं, खिडक्यांना मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर त्यांची नेमकी देखभाल करणे आवश्यक आहे. दारं, खिडक्या नीट लागण्यासाठी, त्यांचं आयुष्य वाढण्यासाठी, लहान-मोठय़ा कुरबुरी वेळच्या वेळी दुरुस्त करण्यासाठी हे सर्व अतिशय महत्त्वाचं आहे. दारांचे आकार-प्रकार आणि खिडक्यांचे

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

आकार-प्रकार यात प्रचंड वैविध्य आहे. तरीही घरातले प्रत्येक दार आणि प्रत्येक खिडकी गरजेचा असा आडोसा आणि सुरक्षा आपल्याला देत असते.

दारांच्या आणि खिडक्यांच्या कडय़ांची तपासणी आपण वरचेवर केली पाहिजे. हवामानानुसार त्यांच्यात जरासा फरक पडतो. काही दारं, खिडक्या फुगतात. त्यांना फार कापताही येत नाही. कारण तसं केलं तर ती छोटी पडू शकतात. उभ्या फळ्या असलेल्या आणि त्यांना आधार देण्यासाठी तिरप्या पट्ट्या ठोकलेल्या काही दारामंध्ये रंग देणारे कारागीर चक्क लांबी भरत असतात. इतरही दारांच्या लहान-मोठय़ा फटी भरायला लांबीचा, पुट्टीचा, भुश्याचा वापर लोक करतात. कालांतराने हे निखळून जाते. ती फट परत दिसायला लागते. त्यात लोक काहीतरी कागद वगरे कोंबून ठेवतात. हळूहळू त्या फटीचा वापर सामान टांगायला, वस्तू कोंबायला व्हायला लागतो. फटी वाढत जातात. त्यातून पाली, झुरळं, डास, कोळी, भुंगे, मुंग्या, मधमाश्या ये-जा करू लागतात. हे झालं लो कॉस्ट दारांचं. अशी दारं आजही वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक गटात मोठय़ा संख्येने दिसतात.

भक्कम दारांमध्ये विशिष्ट चौकट बनवून त्याच्या आत वेगवेगळे डिझाइन्स केलेले किंवा विविधरंगी लॅमिनेट लावलेले प्रकार आहेत. या डिझाइन्समध्ये भरपूर कचरा साठतो. तो ठरवून असा स्वच्छ केला जात नाही. दारांच्या मटेरियलमध्ये प्लॅस्टिकची दारं आहेत. तात्पुरते पार्टशिन्स आहेत. धातूची चौकट असलेले स्लायिडग दारं आहेत आणि काचेची दारंसुद्धा आहेत. दारं, खिडक्यांसाठी त्यांची चौकट अतिशय महत्त्वाची असते. अनेकदा त्यावरच लोक खिळे ठोकत असतात. सिमेंटच्या चौकटींमध्ये दाराची कडी लावायची जी खाच असते, त्यात धातूची कडी जाऊन जाऊन ती खाच मोठी झाली, अथवा सिमेंटचा टवका उडून गेला, तर त्या खाचेत फार दुरुस्त्या करता येत नाहीत. त्यांच्या बिजागऱ्या खिळखिळ्या झाल्या, तरी ती चौकट कुचकामी ठरते. अशी दारं विचारपूर्वक बसवावी लागतात आणि नीट हाताळावी लागतात. आतल्या बाजूची दारं त्यांचा उपयोग नेमका काय होणार आहे, यानुसार किती भक्कम असावी ते ठरवता येते. ती दारं मोस्टली आडोशासाठी असतात. त्याव्यतिरिक्त सतत पाण्याच्या संपर्कात येणारे दरवाजे, ऊन-वाऱ्याचा सामना करणारे दरवाजे आणि खिडक्या यांचाही वेगवेगळा विचार करावा लागतो. त्यानुसार त्यांची देखभाल बदलत जाते. काही दारांना पॉलिश करता येते. तर काही दारांना लॅमिनेट लावलेले असल्याने त्यांची स्वच्छता किंचित ओलसर अशा फडक्याने पुसूनही होऊन जाते. काचेच्या दारांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे ऑप्शन्स बाजारात मिळतात. घरातलं एक्सपायरी उडालेलं व्हिनेगर असेल, तरी त्यात थोडे पाणी टाकून त्याचा उपयोग दारं-खिडक्यांवरचे डाग पुसून काढायला करता येतो. मऊ कापडाचे लहान लहान तुकडे करून काचांसाठी खासकरून वापरता येतात.

स्लायिडग दारं, खिडक्यांमध्ये अडकणारी धूळ काढण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बाजारात मिळतात. त्यात व्हॅक्युम क्लिनरपासून ते विविध ब्रशेसपर्यंत विविधता आहे. तेही नको असेल तर साधा टूथब्रश, एखादा इअर स्वॉब, चित्रकलेचे खराब ब्रश घेऊनसुद्धा त्यातला कचरा साफ करता येतो. दारं, खिडक्यांच्या स्लायिडग पार्ट्सला थेट असे ऑइिलग करता येते. ते केल्यावर जास्तीचे ओघळ आठवणीने पुसून टाकले की इतर कचरा तिथे चिकटत नाही. रंगकामातलं उरलेलं थिनर वापरून अल्कोहोल बेस असलेलं कोणतंही हॅन्ड वॉश वापरूनसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचे डाग पुसून काढता येतात. घरातली जाळी-जळमटी काढताना आपण दारांच्या, खिडक्यांच्या चौकटी झाडत नाही विशेष. ते पुढून मागून नीट पुसत नाही.

केवळ ही सवय लावून घेतली तर दारं-खिडक्यांच्या अनेक लहानसहान कुरबुरी आपल्याला जिथल्या तिथे कळतील आणि त्या लवकर दुरुस्त होतील. एखादी कडी पूर्ण तुटायची, खिळखिळी व्हायची वाट पाहण्यापेक्षा, एखादे दार जमिनीला खूप जास्त घासलं

जायची वाट पाहण्यापेक्षा आधीच या दुरुस्त्या प्लॅन केल्या तर दारं-खिडक्यांचं आरोग्य चांगलं राहतं. जमिनीला किंचित घासणाऱ्या दाराला फरशीचा प्रकार बघून खालच्या बाजूने थोडेसे मेण घासले तरी त्या दाराची खरखर कमी होते. घरातले अनेक जॅम झालेले लाकडी ड्रॉवर्स असेच सहज आत जातील असे दुरुस्त करता येतात. अनेक क्लुप्त्या स्वत:लादेखील सुचत जातात- आपल्या गरजेनुसार आणि उपलब्ध सामानात.

थोडा वेळ तर काढा.. असेही एक रिलॅक्सेशन आणि लìनग होऊ शकते!