मित्रांनो, ‘विद्युत-सुरक्षा’ या सदरामध्ये आतापर्यंत आपण विजेशी संबंधित विविध कायदे व नियमांचा आढावा घेतला. एवढे नियम व Norms  पाळूनही अपघात घडलाच, तर त्याचे मानवी शरीरावर तात्कालिक व दूरगामी होणारे परिणाम व त्यावरील उपायाचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत. आजकालच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात खेडय़ापाडय़ापासून तर शहर व महानगरांपर्यंत रोजच्या जीवनात विजेचा वापर ही आवश्यक बाब आहे. शहरी जीवनात वेळ आणि व्याप वाचावेत यासाठी तसेच इतर सुखसोयींसाठी व मनोरंजनाकरिता सर्वसाधारणपणे गिझर, मिक्सर, ग्राइंडर, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, वॉटर पंप, इस्त्री, टी.व्ही., ओव्हन, पंखे, संगणक इत्यादी विजेवर चालणारी उपकरणे वापरली जातात. ग्रामीण विभागात मुख्यत: शेतीपंप, इमर्शन वॉटर हीटर, इस्त्री, पंखे ही वीज उपकरणे वापरली जातात. अनेक वेळा ही उपकरणे Non-ISI  असून स्टँडर्ड नसतात; व ते वापरताना असुरक्षित तात्पुरत्या वायरिंगचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकांना विजेचे शॉक बसलेले आढळले आहे. काही विजेचे शॉक तर प्राणघातकही असतात, तर काही शॉकचा उर्वरित आयुष्यावर कायमचा अनिष्ट परिणाम होतो.
विजेचा धक्का म्हणजे शरीराच्या अवयवांतून वीज प्रवाह गेल्यामुळे अचानक पेशी व स्नायू उत्तेजित होणे. शॉक लागण्यासाठी शरीराच्या एका भागातून वीजप्रवाह येऊन तो शरीराच्या दुसऱ्या भागातून जमिनीत जातो व सर्किट पूर्ण होऊन माणसाला शॉक लागतो. आपण रस्त्याने जात असताना कित्येक वेळा विद्युत तारांवर निरनिराळ्या प्रकारच्या पाखरांचे थवे बसलेले पाहतो व अशा वेळी सामान्यपणे एक प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो, की त्यांना वीज तारांवर बसल्यावरसुद्धा शॉक का बसत नाही? मंडळी, त्याचे कारण हे आहे की त्यांचे दोन्ही पाय तारांवरच असतात व शरीराचा दुसरा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श करीत नाही. त्यामुळे सर्किट अपूर्ण राहून पक्षी शॉकपासून सुरक्षित राहतो.
एखाद्या सदोष विद्युत उपकरणामुळे अथवा अन्य काही कारणांमुळे बसलेल्या शॉकची तीव्रता खालील गोष्टींवर अवलंबून असते –
१) शरीरातून वाहणाऱ्या वीजप्रवाहाचे प्रमाण (मिली अ‍ॅम्पीयर).
२) शरीरातील वीजप्रवाहाचे मार्ग.
३) वीजप्रवाह मानवी शरीरातून जाण्याचा कालावधी.
४) वीजप्रवाहाची  तरंगलांबी (Frequency).
५) हृदयाच्या ठोक्याची स्थिती.
६) मनुष्याची मानसिक अवस्था.
शॉकचे खालील चार प्रकार आहेत –
१) चिकटणे : जेव्हा १० मिली अ‍ॅम्पीयरच्या वर विजप्रवाह शरीरातून जातो तेव्हा विविध स्नायू त्यामुळे प्रभावित होतात व स्नायू आकुंचन पावतात. १० सेकंद किंवा अधिक वेळ वीजप्रवाह शरीरातून गेल्यास या स्नायूंच्या आकुंचनामुळे त्या व्यक्तीच्या हाताची पकड वीजभारित उपकरण अथवा वायरवर अधिक घट्ट होते व यालाच चिकटणे म्हणतात. असे अपघात सर्वात भयानक आहेत. कारण यामध्ये शरीरातून सतत वीजपुरवठा वाहत राहतो व त्यामुळे रक्ताभिसरणही बंद पडू शकते.
२) हृदयाची असंबद्ध स्थिती : शरीरातून जाणारा वीजप्रवाह जेव्हा ५० मिली अ‍ॅम्पपेक्षा जास्त व २०० मिली सेकंदपेक्षा जास्त वेळ राहिल्यास हृदयाची क्रिया असंबद्ध होते.
३) बेशुद्ध होणे : वर उल्लेख केल्याप्रमाणे वीज प्रवाह व प्रवाहाची वेळ वर दर्शविल्यापेक्षा जास्त असेल तर मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो व हृदयाचे स्पंदनही बंद पडू शकते.
४) विजेचे शरीरावर होणारे परिणाम : या बाबतीत १४५ शॉक बसलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला, त्यामध्ये खालीलप्रमाणे विविध परिणाम झालेले आढळले.
ws04याशिवाय शरीर थरथर कापणे, उभे राहता न येणे, अस्वस्थ वाटणे, शॉक लागलेली जागा कडक होणे वा काळी पडणे, डोके दुखणे, शॉक लागलेला हात जड पडणे, श्वासाचा त्रास होणे, शरीरातील चपळता कमी होणे इत्यादी लक्षणेसुद्धा काही व्यक्तींमध्ये आढळून येतात. वीज प्रवाहाचा शरीरावर होणारा परिणाम खालीलप्रमाणे :
ws05विद्युतदाबाची (Voltage) शरीरावर परिणाम होण्याची मर्यादा खालीलप्रमाणे आहे-
ws06शॉक लागण्यासाठी मनुष्याच्या शरीरातून वीज प्रवाह वाहणे आवश्यक आहे. वीज प्रवाह (करंट) एका अवयवातून प्रवेश करतो व जमिनीशी संपर्क असलेल्या अवयवातून जातो. अशा वेळी शरीराची रोधकता (Resistance)) व टच व्होल्टेज IS-४३७ प्रमाणे खालीलप्रमाणे असते.
टच व्होल्टेज (विद्युत दाब)    शरीराची रोधकता
२५                                          २५०० ओहम
२५०                                         १००० ओहम
टच व्होल्टेज म्हणजे एखाद्या दोष निर्माण झालेल्या उपकरणाच्या बाहेरील भागाला जो विजेचा दाब निर्माण होतो ते व्होल्टेज.
वरील विवेचनावरून असे दिसून येते की, शरीराच्या निरनिराळ्या अवयवांवर वीज प्रवाहाचा परिणाम होतो. करंट, व्होल्टेज व रेसिस्टन्स (रोधकता) यांचा शरीरावर होणारा परिणाम या बाबींचा नेहमी विचार करावा. वीज जशी लाभदायिनी आहे, तसेच वरील विवेचनात सांगितल्याप्रमाणे तिच्यात राक्षसी वृत्तीही आहे. त्या धोकादायक वृत्तीपासून मुक्ती मिळवून विजेचा उपभोग घेताना तिच्यातल्या चांगल्या गुणांचा मानवाच्या उन्नती, सोय आणि समृद्धीसाठी चांगला उपयोग करता येईल.
Electricity is a good servant but a bad master.
विजेचा शॉक लागल्यानंतर घ्यावयाची काळजी :
वरील सर्व उपाय केल्यावरही एखाद्या व्यक्तीस शॉक लागलाच तर संबंधित वीजपुरवठा ताबडतोब बंद करावा. ते शक्य होत नसेल तर त्या माणसाला दूर करण्याअगोदर स्वत:ला वीजविरोधक बनवून घ्यावे- म्हणजे एखाद्या लाकडी वस्तूवर किंवा कोरडा लोकरी कपडा, रबरी मॅट म्हणजेच कोणत्याही वीजरोधक वस्तूवर उभे राहावे आणि लाकडी दांडा किंवा तत्सम वस्तूचा वापर करून त्या माणसाला विजेच्या स्पर्शापासून दूर करावे. अन्यथा, तुमच्याही शरीरातून वीज प्रवाह वाहून तुम्हालाही शॉक लागू शकेल; असे न केल्यामुळे एकास वाचविताना सोडवणाऱ्याला अनेक वेळा शॉक बसले आहेत. हे झाल्यानंतर अपघातग्रस्ताला सरळ निजवून त्याच्या तोंडात आणि घशात बोटे घालून तंबाखू, नकली दात किंवा इतर वस्तू असल्यास त्या काढून टाकाव्यात. त्या व्यक्तीच्या हृदयाचे स्पंदन बंद पडल्यास अथवा कमी झाल्यास त्यास खालीलप्रमाणे कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची व्यवस्था करावी. हे सर्व शॉक लागल्यापासून २.५ मिनिटांच्या आत करणे आवश्यक आहे.
कृत्रिम श्वासोच्छवासाच्या पद्धती : विद्युत अधिनियम २०१० च्या नियम क्र. २८ प्रमाणे प्रत्येक रिसिविंग स्टेशन, कारखाने इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या व्यक्तीस प्रथमोपचार देण्यासाठी शॉक ट्रिटमेंट चार्ट लावणे, हे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये खालील उपचारपद्धती देण्यात आल्या आहेत.
१) शेफर पद्धती २) सिल्वेस्टर पद्धती ३) तोंडातून तोंडाद्वारे (माऊथ टू माऊथ) श्वसन क्रिया पद्धती ४) श्वसन क्रियेचा कृत्रिम फुगा.
विजेच्या शॉकमुळे शक्य तो मृत्यू ताबडतोब येत नाही. हृदयाची स्पंदने बंद झाल्यानंतर साधारण अडीज मिनिटांपर्यंत मेंदू कार्यरत असतो. तेवढय़ा वेळात कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे हृदयाचे स्पंदन करणे अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे आहे.  
प्रकाश कुलकर्णी -plkul@rediffmail.com
विद्युत सल्लागार आणि सदस्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषद,

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण