प्रत्येक सोसायटीमध्ये कर्तबगार, कार्यक्षम व निर्णयक्षमता असलेले सभासद असतात. व्यक्तिगत पातळीवर हेच सभासद त्यांच्या व्यवसाय किंवा नोकरीच्या आस्थापनामध्ये जबाबदारीची अनेक कामे कार्यक्षमतेने करीत असतात. पण स्वत:मधील ही कार्यकुशलता व निर्णयक्षमता ज्या सोसायटीमध्ये ते ‘कायदेशीर सभासद’ या नात्याने वावरतात तेथे दाखवायला मात्र नाखूश असतात. ही नाखुशी, अनास्था व दुर्लक्षितता मग संबंधित सोसायटीच्या ‘दुबळ्या’ व्यवस्थापनाला जन्म देते आणि मग पुढे एखाद्या ‘कुपोषित’ बालकाप्रमाणे संस्थेची वाटचाल सुरू होते. आज अनेक सोसायटय़ांचे व्यवस्थापन ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, त्याचं मूळ कारण इथेच दडलेलं आहे.

सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या गृहनिर्माण संस्थेला ‘कार्यक्षम’ व्यवस्थापन समिती लाभणे ही त्या सोसायटीची ‘भाग्यरेखा’ उजळल्याप्रमाणेच आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. कारण आज मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाची परिस्थितीच तशी आहे. अर्थात, याला कारणीभूत त्या त्या संस्थेचे अनुत्सुक सभासद आहेत हेही तितकंच खरं!
वास्तविक प्रत्येक सोसायटीमध्ये कर्तबगार, कार्यक्षम व निर्णयक्षमता असलेले सभासद असतात. व्यक्तिगत पातळीवर हेच सभासद त्यांच्या व्यवसाय किंवा नोकरीच्या आस्थापनामध्ये जबाबदारीची अनेक कामे कार्यक्षमतेने करीत असतात. पण स्वत:मधील ही कार्यकुशलता व निर्णयक्षमता ज्या सोसायटीमध्ये ते ‘कायदेशीर सभासद’ या नात्याने वावरतात तेथे दाखवायला मात्र नाखूश असतात. ही नाखुशी, अनास्था व दुर्लक्षितता मग संबंधित सोसायटीच्या ‘दुबळ्या’ व्यवस्थापनाला जन्म देते आणि मग पुढे एखाद्या ‘कुपोषित’ बालकाप्रमाणे संस्थेची वाटचाल सुरू होते. आज अनेक सोसायटय़ांचे व्यवस्थापन ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, त्याचं मूळ कारण इथेच दडलेलं आहे.
बहुसंख्य सोसायटय़ांच्या व्यवस्थापन समित्यांचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते? निवृत्त ज्येष्ठ नागरिक किंवा अनिच्छेने गळ्यात लादून घेतलेले अथवा स्वीकारावे लागलेले समिती सदस्यत्व याने संगठित झालेली व्यवस्थापन समिती! आनंदाने, स्वेच्छेने आणि सेवाभावी वृत्तीने पुढे येऊन कर्तव्यपालनासाठी व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी झालेले सभासद विरळाच.
इथे गमतीचा भाग म्हणजे व्यवस्थापन समितीमध्ये काम करण्यास नकार देताना जी कारणे सोसायटीच्या सभासदांकडून दिली जातात ती मजेशीर तर असतातचे, पण हास्यास्पदही असतात. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ज्या ठिकाणी सोसायटीचे सभासद कार्यरत असतात, तो अनुभव व कर्तबगारी ते व्यवस्थापन समितीच्या कामात सहभागी होऊन देण्यास तयार नसतात. सोसायटीचा मेन्टेनन्स दिला म्हणजे माझे काम संपले, त्या पलीकडे सोसायटीच्या अंतरंगाशी देणे-घेणे नाही आणि त्याबद्दल मला कोणी विचारू नये, माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच होईल असा कुठलाही आग्रह मला करू नये, अशी त्यांची वृत्ती असते. मग प्रश्न उरतो की सोसायटीचे व्यवस्थापन कुणी पाहायचे?
निरोगी व्यवस्थापनाची जबाबदारी कुणाची?
व्यवस्थापनात सक्रिय सहभागासाठी सभासद समाजातील कुठल्या वर्गातील आस्थापनामध्ये काम करतात हा भागही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. पोलीस दल, परिवहन सेवा, अग्निशमन दल, वैद्यकीय क्षेत्र, पत्रकार इत्यादी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे सभासद सोसायटीच्या कारभारात भाग घेण्यास असमर्थ असतात. तर ज्येष्ठ नागरिक शारीरिकदृष्टय़ा सक्षम नसतात. बँका, महानगरातील आस्थापने व अन्य व्यवहारांसाठी करावी लागणारी धावपळ त्यांना झेपत नाही आणि इंजिनीअिरग, मॅनेजमेंट व संगणक क्षेत्रात कार्यरत असलेली ‘तरुण व्यक्तिमत्त्वे’ व्यवस्थापन समितीला मदतीचा हात देण्यास विशेष उत्सुक नसतात. या सर्व चाळणींमधून मग जे मूठभर सभासद उरतात त्यांनाच सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर काम करण्यासाठी आग्रह होतो. परिणामी काही ठरावीक सभासदांचीच सोसायटीचा कारभार चालविण्याची जबाबदारी आहे असे चित्र तयार होते. सोसायटीचे काम पाहण्यास आम्हाला पुरेसा वेळ उपलब्ध नाही, अशी कारणे देणारे सभासद स्वत:ची व्यक्तिगत कामे, कौटुंबिक मनोरंजन, हॉटेलिंग, भ्रमंती व सहलींचे नियोजन मात्र अचूक करीत असतात. तिथे त्यांना ‘वेळे’ची अडचण येत नाही. ‘स्व’ आणि ‘सहकार’ची दिशा इथेच स्पष्ट होते. गृहनिर्माण संस्थेत प्रत्येक सभासदाने पाच वर्षांची एक टर्म तरी व्यवस्थापन समितीत पूर्ण केली पाहिजे, असे प्रचलित सहकार कायद्यात बंधन नाही. वैद्यकीय कारणांमुळे असमर्थ असणाऱ्या सभासदांचा प्रश्नच नाही. पण सक्षम आणि कार्यकुशल सभासद जेव्हा अंग काढून घेतात त्याला उत्तर कुणी द्यायचे?
वर उल्लेख केलेली परिस्थिती मध्यम वर्गात मोडणाऱ्या सोसायटय़ांच्या संदर्भात बहुतांशी लागू पडते. मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसेल तर ती स्वागतार्ह बाब आहे. सोसायटीचे व्यवस्थापन या विषयाचा एक अभ्यासक या नात्याने या विषयाची दुसरी बाजू जर कुणी मांडली तर विचारमंथनास वाव मिळेल.
अनेक सोसायटय़ांच्या व्यवस्थापनाबाबतच्या कहाण्या वेळोवेळी वृत्तपत्रातून वाचनात येत असतात. त्यात प्रामुख्याने ‘पदाधिकाऱ्यांची मनमानी’ हा विषय शिरोभागी असतो. पण ही मनमानी कुणामुळे चालते याचा विचार सभासद करतात का? सोसायटीच्या कारभाराकडे दुर्लक्ष करणे व अकार्यक्षम आणि दुबळ्या व्यक्तिमत्त्वाच्या सभासदाला प्राधान्य देणे ही वृत्तीच ‘मनमानी’ कारभाराला खतपाणी घालत असते, हे त्या त्या सोसायटीमधील ‘कार्यक्षम’ सभासद जाणीवपूर्वक व सोयीस्करपणे विसरत असतात. याचाच फायदा मनमानी वृत्ती फोफावण्यास होत असतो. इथे कुणी म्हणेल की ‘कार्यक्षम’ आहे म्हणून विशिष्ट व्यक्तींनीच कायमस्वरूपी सोसायटीचे व्यवस्थापन पाहायचे का? तर मुळीच नाही. याला उत्तर असे की सोसायटीमध्ये जे कार्यकुशल सभासद आहेत त्यांनी ‘चक्राकार’ (Rotation) पद्धतीने व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून मनमानी कारभाराला पायबंद बसून व्यवस्थापकीय कारभाराला किमान शिस्त लागेल. हा विचार ज्या प्रमाणात दृढ होत जाईल तसा त्याचा परिणाम व्यवस्थापनात दिसून येईल.
सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची मुदत संपून नवीन समिती अस्तित्वात येण्यासाठी जेव्हा ‘उमेदवारा’चा शोध सुरू होतो तेव्हाची परिस्थिती तर दयनीय असते. अनेक सोसायटय़ांमध्ये नवीन समितीत काम करण्यास कुणीच पुढे येत नाही. जुन्या कमिटी सदस्यांनाच पुन्हा कारभार पाहण्यासाठी सुचविले जाते. अशा वेळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सभेमध्ये तावातावाने बोलणारे, वाद घालणारे, प्रामाणिक पदाधिकाऱ्यांवर अनाठायी आरोप करणारे व सातत्याने विरोधी भूमिका घेणारे नकारात्मक वृत्तीचे ‘गोंधळी’ सभासद चिडीचूप असतात. नवीन समितीमध्ये काम करण्यास ते तयार होत नाहीत. त्यांचा उत्साह एकाएकी मावळतो. कारण त्यांना कामाची जबाबदारी घ्यायची नसते. स्वत: केलेल्या अनेक सूचनांची कार्यवाही करून दाखवायची इच्छा नसते. कारण त्यांना मनोमनी माहीत असते की केवळ गोंधळ घालण्यासाठी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात करणे अशक्य आहे. म्हणून हे ‘गोंधळी’ सभासद व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी होण्यास तयार नसतात. विहिरीच्या काठावर उभे राहून तुडुंब भरलेल्या विहिरीत काम करणाऱ्या माणसांना केवळ सूचना देण्याचीच यांची कुवत असते. प्रत्यक्ष विहिरीत उतरून काम करण्याचं धैर्य त्यांच्यात नसते. या वृत्तीच्या सभासदांना आवर घालण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘क्षमताधिष्ठित’ सभासदांनी जागृत होऊन स्वत:चा सहभाग व्यवस्थापन समितीमध्ये नोंदवून ती बळकट करणे.
शेवटी आपल्या सोसायटीचा कारभार आपणच चालवायचा आहे. बाहेरील व्यक्ती तो चालवायला येणार नाही. आपल्या सोसायटीबद्दल आपणच आपल्यात ओढ निर्माण करायला हवी. हा विचार जेव्हा दृढ होईल तोच दिवस सोसायटीच्या ‘सशक्तीकरणा’च्या शुभारंभाची नांदी असेल.

Alienation behavior from executive members IOA President PT Usha regret
कार्यकारी सदस्यांकडून परकेपणाची वागणूक! ‘आयओए’ अध्यक्ष पी. टी. उषाची खंत
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Shares of Crystal Integrated closed lower on the first day
क्रिस्टल इंटिग्रेटेडचे समभाग पहिल्या दिवशी घसरणीसह बंद
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर

सोसायटीचे काम पाहण्यास आम्हाला पुरेसा वेळ उपलब्ध नाही, अशी कारणे देणारे सभासद स्वत:ची व्यक्तिगत कामे, कौटुंबिक मनोरंजन, हॉटेलिंग, भ्रमंती व सहलींचे नियोजन मात्र अचूक करीत असतात. तिथे त्यांना ‘वेळे’ची अडचण येत नाही. ‘स्व’ आणि ‘सहकार’ची दिशा इथेच स्पष्ट होते. गृहनिर्माण संस्थेत प्रत्येक सभासदाने पाच वर्षांची एक टर्म तरी व्यवस्थापन समितीत पूर्ण केली पाहिजे, असे प्रचलित सहकार कायद्यात बंधन नाही.

बहुसंख्य सोसायटय़ांच्या व्यवस्थापन समित्यांचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते? निवृत्त ज्येष्ठ नागरिक किंवा अनिच्छेने गळ्यात लादून घेतलेले अथवा स्वीकारावे लागलेले समिती सदस्यत्व याने संगठित झालेली व्यवस्थापन समिती! आनंदाने, स्वेच्छेने आणि सेवाभावी वृत्तीने पुढे येऊन कर्तव्यपालनासाठी व्यवस्थापन समितीमध्ये सहभागी झालेले सभासद विरळाच.