घरातील किंवा इमारतीमधील विद्युत अपघात टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
*वायरिंग किंवा विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्या. ते कायद्याने बंधनकारक आहे.
*वायरिंगचे काम करणाऱ्या कामगाराकडे शासनाचे तारतंत्री प्रमाणपत्र (परवाना) आहे का ते पहा. ते कायद्याने बंधनकारक आहे.
*वायरिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य (उदा., वायर्स, केबल्स, केसिंग, पी.व्ही.सी. पाइप, स्विचेस, सर्किट ब्रेकर्स इ.) दर्जेदार व आय.एस.आय. मार्कचे असावे.
*इलेक्ट्रिकल लोडनुसार योग्य क्षमतेचे फ्यूज, वायर्स, स्विचेस यांचा वापर करावा.
*विजेचे पंखे, फ्रीज, एअर कंडिशनर यांसारखी विद्युत उपकरणे स्टार रेटिंगची (थ्री स्टार, फोर स्टार, फाइव्ह स्टार) असावी. जास्त स्टार रेटिंग म्हणजे विजेचा वापर कमी व वीजबिलात बचत हे ध्यानात घ्या.
*वायरिंग करून घेताना धातूचे आवरण असणाऱ्या सर्व विद्युत उपकरणांना थ्री पीन प्लग सॉकेटद्वारेच जोडणी करावी. कमी उंचीवरील व लहान मुलांना हाताळता येणारे प्लग सॉकेट ‘शटर्ड’ पद्धतीचेच लावा.
*विजेचा शॉक बसून होणारे अपघात टाळण्यासाठी ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर’ (ई.एल.सी.बी.)चा वापर करा. २.५ कि.वॉट सिंगल फेज विद्युतभाराच्या वरील संच मांडणीसाठी ई.एल.सी.बी. बसवणे कायद्याने बंधनकारक आहे.
*एका उपकरणासाठी एकच प्लग सॉकेट व पीन टॉपचा वापर करा. मल्टी पीन टॉप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडू नका.
*तात्पुरते वायरिंग शक्यतो टाळा. जोड (जॉइंट) दिलेल्या व जुन्या वायर्स वापरू नका.
*ओल्या हाताने स्विचेस चालू-बंद करू नका. तसेच धातूचे आवरण असलेली विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. बाथरूममधील वॉटर हीटर्स, गीझर्स चालू-बंद करताना विशेष काळजी घ्या.
*विद्युत संच मांडणीत म्हणजेच वायरिंगमध्ये घरच्या घरी बदल करू नका. तारतंत्री (वायरमन) कडूनच अशी कामे करून घ्या. तसेच विद्युत उपकरणे ही घरी दुरुस्त न करता माहीतगाराकडूनच दुरुस्त करून घ्या.
*वरचे वर फ्यूज जाणे, सर्किट ब्रेकर ट्रीप होणे हे वायरिंग सदोष असल्याचे लक्षण असल्याने त्याची त्वरित तपासणी करून घ्या.
*मोठी घरे, बंगले, व्यावसायिक दुकाने, कार्यालये, कारखाने यांचे ‘एनर्जी ऑडिट’ करून घ्या. त्यातील सर्व सूचनांचे पालन करा.
*दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या वायरिंगची तपासणी करून घ्या. अशा तपासणीची कामे अनुज्ञाप्ती (लायसेन्स) धारक विद्युत ठेकेदारांकडून घ्यावी व त्या तपासणीचा अहवाल (टेस्ट रिपोर्ट) जरूर घ्यावा.
*कोणतेही विजेचे काम करताना सुरक्षा उपकरणे उदा., हँड ग्लोव्हज्, उंचीवर काम करताना सेफ्टी बेल्ट्स, डोळय़ांच्या सुरक्षेसाठी गॉगल्स, सेफ्टी बुट्स वगैरे वापरणे गरजेचे असते.
योग्य काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या अपघातानंतर अपघातग्रस्त व्यक्तीची काळजी कशी घ्यायची, त्याला प्रथमोपचार कसे करायचे याची माहिती आपण पुढील आठवडय़ात घेऊ.

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…