नवीन घर घेतल्यावर किंवा जुन्याच घराला नवा लुक देण्यासाठी अनेक उपाय केले जातात. इंटिरिअर डिझायनरच्या साहाय्याने घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला छान लुक देता येतो. हॉल, फíनचर, बेडरूम फíनचर, किचन फíनचर, लाइट्स, रंग यांची योग्य पद्धतीने सांगड घातली जाऊ शकते. आता विचार करून बघा, कोणत्याही वास्तूत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आपली नजर जाते ती फ्लोअिरगवर. घराच्या कामाला सुरुवात करतानाच आपल्या इंटेरियर डिझायनरशी सल्लामसलत करून फ्लोिरग संबंधातील निर्णय घ्यावा. इंटिरिअर डिझायनरच्या मते, रूमच्या मेकओव्हरसाठी फ्लोिरग बदलणे हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग आज जाणून घेऊया, या फ्लोिरगच्या विविध पर्यायांबद्दल.
फ्लोिरग घरातलं असो किंवा ऑफिसमधलं, रिटेल आऊटलेटमधलं असो किंवा हॉटेलमधलं.. सगळीकडेच त्याचं तेवढंच महत्त्व असतं. पण वास्तूच्या प्रकारानुसार त्याचे प्रकार बदलतात. कारण प्रत्येक वास्तूचे तिच्या वापरानुसार ठरावीक ठोकताळे असतात आणि त्यानुरूप मग फ्लोिरगचे प्रकार आणि त्याची मटेरिअल्स बदलत जातात.
फ्लोिरग करण्यासाठी मार्केटमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. नसíगक दगड (मार्बल, ग्रॅनाइट, कोटा, तंदूर इ.इ.), कृत्रिम दगड (कम्पोझीट मार्बल), टाइल्स, वूडन फ्लोिरग, पी.व्ही.सी. फ्लोर आणि काप्रेट इ. वास्तूचा उपयोग, त्यानुसार जमिनीची अपेक्षित झीज, वास्तूतील वर्दळ, इ. नुसार फ्लोअिरगचा प्रकार ठरवला जातो. इण्डस्ट्रिअल किंवा सार्वजनिक वास्तूंसाठी जास्त जाडीचे (thickness) फ्लोिरग वापरावे. उदा. नसíगक दगड. यामुळे फ्लोरिंगचे आयुष्य वाढते. याला पुन:पुन्हा पॉलिश करणे शक्य असल्याने चकाकी राखता येते.
फ्लोिरगच्या प्रकारापकी मार्केटमध्ये नसíगक दगड : कोटा व मार्बल हे प्रकार ४० रुपयांपासून ८०० रुपये/चौ. फुट या किमतीत उपलब्ध आहेत. ज्याला परत पॉलिश करून त्याची चमक व निगा राखता येते. तर ग्रॅनाइट vr011हा १०० रुपयांपासून ते ५०० रुपये प्रति चौ. फुट. या किमतीत उपलब्ध आहे. याला मेंटेनन्सची गरज नाही. मार्बल अथवा ग्रेनाइट घेताना इन्टेरिअर डिझायनरच्या सल्ल्याने घ्यावा.
कृत्रिम फ्लोिरगमध्ये मुख्यत: व्हिट्रिफाइड टाइल्स येतात. ज्याची किमत अंदाजे ४०-३०० रुपये एवढी असते. या वेगवेगळ्या मापाच्या व जाडीच्या उपलब्ध आहेत. याला कोणत्याही प्रकारच्या मेण्टेनन्सची आवश्यकता नाही.
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विविध नावाने, विविध मापात, रंगात, डिझाइनमध्ये व विविध किमतीत या टाइल्स उपलब्ध आहेत. त्यामुळेच ही सगळ्यात जास्त विकली जाणारी टाइल आहे.
-काही वेळा कमी बजेट असेल तरीही काही पर्याय उपलब्ध असतात. अशा वेळी पोस्र्लानो अथवा स्पार्टेक्स टाइल्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या निसरडय़ा असल्याने वयस्कर माणसांसाठी धोकादायक ठरतात.
हे झाले नेहमीचे पारंपरिक पर्याय. यापेक्षा काही वेगळा लुक हवा असेल तर आहे त्याच फ्लोिरगवर लावता येण्याजोगे नवे पर्याय म्हणजे, वुडन फ्लोिरग आणि पी.व्ही.सी. फ्लोिरग.
वुडन फ्लोिरग हे लॅमिनेटेड फ्लोिरग असते. ते खऱ्या लाकडाचे नसते. ते शक्यतो मॅट फिनिश या प्रकारात घ्यावे.
पी.व्ही.सी. फ्लोिरग हे अंदाजे १ ते ३ मिमी एवढय़ा जाडीचे येते. जर घरातील एखाद्या खोलीत वर्दळ कमी असेल (बेडरूम) तर पी.व्ही.सी. फ्लोिरग हा एक उत्तम पर्याय आहे. हे फ्लोिरग स्वस्त व जलद गतीत लावून होणारे आहे. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये याचा जास्त वापर होताना दिसतो. यातील जास्त जाडीचे पर्याय अ‍ॅथलेटिक स्टेडीयमसाठी देखील वापरले जाते.
सध्या बाजारात फ्लोिरगचा लुक बदलण्यासाठी प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे खूप छान छान पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला आपलं बजेट ठरवायचं आणि इन्टेरिअर डिझायनरच्या सल्ल्याने घराचे फ्लोिरग त्यानुसार सुंदर व आकर्षक करायचं.
केतन निमकर – knassociates9@gmail.com
इंटिरियर डिझायनर
शब्दांकन – मानसी आकेरकर