श्रीनिवास घैसास, टॅक्स कन्सल्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २ ए विंग, तळमजला, चंदन सोसायटी, कीíतकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ ऑफ एल.बी.एस. रोड, ठाणे (प.) ४००६०१. दू. ०२२-२५४०३३२४ ghaisas2009@gmail.com

*एखाद्या गृहनिर्माण संस्थेमधील एखाद्या सदनिकेचा विक्री व्यवहार निश्चित झाला आहे, तसेच त्यासंबंधीचा करारनामादेखील नोंद केला आहे. परंतु काही अडचणींमुळे खरेदीदारांकडून मिळालेला नाही. तसेच सदनिका मालकाला पूर्ण मोबदला
मिळालेला नाही आणि तरीसुद्धा त्याने खरेदीदाराला सदर सदनिकेचा ताबा दिला व खरेदीदार त्या ठिकाणी राहू लागलाय. संस्थेकडे आवश्यक ती हस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रे सादर
केलेली नाहीत. अशा परिस्थितीत संस्था संबंधित खरेदीदाराला बिनभोगवटा शुल्क आकारू
शकते का?
– अंजली कर्वे, ठाणे.
*एखाद्या खरेदीदाराने आपला खरेदी व्यवहार निश्चित केला, त्यासंबंधीचा करारनामादेखील नोंद केला. व्यवहार पूर्ण व्हायच्या अगोदर जरी तो त्या ठिकाणी राहाण्यास आला तर संस्था त्याला बिनभोगवटा शुल्क (नॉन ऑक्युपन्सी चार्जेस) लावू शकत नाही. संस्थेने अशा प्रकारचे चार्जेसची आकारणी केल्यास संबंधित खरेदीदाराने ही वस्तुस्थिती संस्थेच्या लक्षात
आणून द्यावी. आवश्यक असेल तर संबंधित संस्थेला एक पत्र लिहून
सोबत नोंदणीकृत करारनाम्याची
एक प्रत व विकणाऱ्या सभासदाचे
ना हरकत प्रमाणपत्राची एक प्रत
द्यावी व आकारलेले शुल्क रद्द करण्यास भाग पाडावे. एवढे करूनही संस्थेने सदर शुल्क रद्द न केल्यास संबंधित उपनिबंधकाकडे दाद
मागता येईल.
*मी एका गृहनिर्माण संस्थेचा सदस्य असून माझ्या काही आर्थिक अडचणींमुळे संस्थेची काही रक्कम देणे बाकी आहे. याबाबतची सर्व वस्तुस्थिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्यादेखील कानावर घातली आहे. संस्थेने माझ्या थकबाकीच्या रकमेवर व्याज आकारणी केली आहे. ही व्याज आकारणी चक्रवाढ पद्धतीने केली आहे. संस्थेची ही कृती योग्य आहे का?
– अविनाश काणे, बदलापूर.
*संस्था सदस्याच्या थकबाकीवर व्याज आकारणी करू शकते. मात्र व्याज आकारणी करताना ती सरळ व्याजदर पद्धतीने करणे गरजेचे आहे. संस्था चक्रवाढ दराने व्याज आकारणी करू शकत नाही. एवढेच नव्हे, तर ज्या दराने व्याज आकारणी केली जाते तो व्याज दर संस्थेच्या सभेमध्ये मंजूर झालेला असणे आवश्यक आहे.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा