लहानपणीचा काळ म्हणजे मोठे होण्याचा आणि शिकण्याचा काळ. अतिशय उत्सुकतेने लहान लहान पावले टाकत ही लहानगी मंडळी आपल्याला जिथे पोहोचणे शक्य असेल तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. वस्तू हाताळून पाहत असतात. त्यांच्या या छोटय़ा-छोटय़ा साहसांमध्ये फíनचरच्या धारदार कडा, इलेक्ट्रिकल वायर्स आणि सॉकेट्स, भिंतीवरचा विषारी रंग, पिण्याकरिता अजिबात नसलेली स्वच्छताविषयक आणि इतर विषारी उत्पादने ठेवण्याकरिता बनवलेल्या, पण कमी उंचीवर असलेल्या कॅबिनेट्स अशा गोष्टी धोके निर्माण करतात.
पण तुम्हाला घर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने थोडेथोडकेच फíनचर आणि फिटिंग्ज् असलेल्या घरात राहायला नक्कीच आवडणार नाही. त्याचा सुवर्णमध्य म्हणजे सर्व गोष्टींचा योग्य तो ताळमेळ लावून आपल्या लहान मुलाला सुरक्षितपणे वावरता येईल आणि सुरक्षितपणे मोठे होता येईल अशी घराची मांडणी करणे.
नुकतेच पावले टाकायला शिकणाऱ्या लहान मुलांना टेकण्याकरिता स्थिर आणि योग्य फíनचर असणे, बाल्कनीमध्ये ग्रिल बसवणे, टँपर- प्रूफ सॉकेट्स असणे, कमी उंचीचे  किंवा अ‍ॅडजस्टेबल किचन काऊण्टर असणे या गोष्टींनी फरक पडतो. डिझाइनविषयक या कल्पनांनी तुमची प्रौढ घरं अतिशय सहजपणे लहान मुलांच्या राज्यामध्ये बदलता येतील.
घरात मनाला येईल तसे हिंडू-फिरू शकणारे मूल अधिक सतर्क, आत्मनिर्भर होते. आणि एकटे खेळायला लागले तरी समाधानी असते. नवे घर बांधणाऱ्या किंवा जुन्या घराची  पुनर्रचना करणाऱ्या व्यक्ती नव्या डिझाइनचा अंगीकार करून आपले घर मुलाकरिता अधिक आदर्श बनवू  शकतात. ज्या व्यक्ती नवे घर घेऊ शकत नाहीत, पण आपल्या घराची पुर्नरचना करणार आहेत, त्या व्यक्ती आपल्या घराच्या डिझाइनमध्ये काही बदल करू शकतील. त्यामुळे त्यांचे घर कुटुंबातील सर्वात लहान मुलांकरिता सुरक्षित आणि आरामदायी बनून लहान मुलाकरिता आदर्श घर तयार करू शकतील. अशांसाठी ग्राहकांसाठी काही सूचना
फरशा:  तुमच्या घरातील फरशांवरून चालताना, धावताना किंवा घरात  फिरताना मूल घसरू नये इतकी पकड फरशांमध्ये असावी. अ‍ॅँटी-स्किड टाइल्सचा वापर केल्याने मुलांचे घसरणे व पडणे आणि होणारी संभाव्य दुखापत टळते.
शॉकप्रूफ स्विचेस: अत्याधुनिक सॉकेट्समध्ये मुलांनी आपली बोटे किंवा इतर वस्तू घालू नयेत याकरिता बिल्ट-इन ऑटोमेटिक शटर्स असतात. शॉकप्रूफ स्विचेस आणि सॉकेट्स वापरल्याने लहान मूल घरात असताना त्यांना विजेपासून दुखापत होण्याचा धोका कमी  असतो.
अ‍ॅडजस्टेबल बेसिन्स : लहान मुलांच्या उंचीला साजेशी अ‍ॅडजस्टेबल बेसिन्स आणि सिंक्स वापरल्याने त्यांना हात किंवा तोंड धुवायला किंवा त्यांची ताटे धुण्याकरिता सिंकमध्ये ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी पालकाची आवश्यकता भासणार नाही.
लहान मुलाला साजेशी फिटिंग्ज : बाथरूममध्ये लहान मुलाला स्वत:च्या गोष्टी स्वत:हून करता याव्यात याकरिता लहान मुलांच्या हातात मावतील अशी छोटी फिक्स्चर्स बसवावीत. बाथ, सिंक आणि टॉयलेट हे त्यांच्या उंचीचे, त्यांना हाताळण्यास सोपे असे असावे. तुमचे मूल खूपच लहान असेल तर त्याला किटी पॉटी घेऊन द्या किंवा इतर ठिकाणी सीट अटॅचमेण्ट लावून द्या. अशावेळी धारदार कडा टाळा. गोलाकार कोपऱ्यांमुळे लहान मूल घरात फिरत असले की त्याला धारदार कडांपासून दुखापत होण्याचा धोका असतो. लहान मुलाला वावरण्यास आदर्श असे घर बनवताना अशा कडांवर रबर बंपर्स लावावेत किंवा कोपरे गोलाकार करून घ्यावेत. त्यामुळे अशा दुखापती टळू शकतील.
आपले घर कसे असते आणि कसे वाटते हे ठरवण्यात आपल्या घराच्या रंगाचा खूप मोठा वाटा असतो. बुरशीविरोधी पेण्टचा वापर केल्याने रंगाचे आयुष्य वाढू शकेल, पण अशा रंगामध्ये विषारी संयुगे असतात हे लक्षात घ्या. तुमचे घर तुमच्या मुलाकरिता सुरक्षित बनवायचे असेल तर अशा रंगांचा वापर टाळावा. विषारी द्रव्ये नसलेल्या आणि व्होलेटाईल ऑरगॅनिक इमिशन (व्हीओसी) कमी असलेल्या एखाद्या चांगल्या रंगाची निवड करा. त्यामुळे घरातील हवेच्या दर्जातही सुधारणा होईल.
बेबी-प्रूफ किचन हा कोणत्याही घराचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग असतो. त्यामुळे या भागाचे डिझाइन करताना तुम्ही काळजी बाळगणे अत्यावश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांना किचनमधील सुरक्षेचे आणि धोक्यांचे धडे दिले पाहिजेत, तसेच स्मोक अलार्म चालू आहे की नाही हे नियमितपणे तपासले पाहिजे. घरात अग्निशामक उपकरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारी द्रव्ये ठेवण्याकरिता हाय स्टोरेज कॅबिनेट्सचा वापर करा. सर्व उपकरणे मुलांना सापडणार नाहीत याची दक्षता घ्या. धारदार साधने मुलांपासून दूरच ठेवा. हे सर्व जमिनीवर किमान ४५ इंचाच्या उंचीवर असावे असे सुचवण्यात येते.
तुमच्या मुलाला खेळण्याकरिता सुरक्षित जागा द्या. मुलांना खुल्या वातावरणात खेळायला आवडते. पण हल्ली खेळाच्या मदानांचे रूपांतर पाìकगच्या जागांमध्ये होऊ लागल्याने पोडियमच्या पातळीचा एखादा भाग राखून तो रहदारीविरहित आहे असे घोषित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सायकिलग करणे असो वा गल्ली क्रिकेट खेळणे असो, मुलांना खेळण्याकरिता आणि त्यांना मजा लुटता येईल अशा गोष्टी करण्याकरिता जागा मिळते.
मुलांसाठी सोसायटीत हल्ली क्रिकेट पिच, टेनिस कोर्ट्स, मोठे चेसबोर्डसही डिझाइन केले जातात. खेळाची मदाने विचारपूर्वक बनवली गेलेली असावीत, त्यामध्ये मऊ जमीन असावी, पाळण्यांवरून घसरणार नाही असा पृष्ठभाग असावा, जंगल जिम असावे, सी-सॉ इत्यादी खेळ असावेत. तुमच्या लहान मुलाच्या वाढीच्या आणि सर्वात महत्त्वाच्या असलेल्या वर्षांमध्ये तुमच्या घराला आणि सभोवतालच्या परिसरात वावरताना त्यांचं जगणं सुरक्षित करण्याकरिता या काही गोष्टींचा अंगीकार करावा.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता