News Flash

apartment ADDA : हाऊसिंग सोसायटी व्यवस्थापन पोर्टल

एका क्लिकवर तुमची कामं चुटकीसरशी होऊ लागली आहेत. जसं- लाइट बिल, टॅक्स, मोबाइल बिल वगैरे.. तुम्हाला सोसायटीची कामेही ऑनलाइन पद्धतीने करता

| May 24, 2014 01:02 am

एका क्लिकवर तुमची कामं चुटकीसरशी होऊ लागली आहेत. जसं- लाइट बिल, टॅक्स, मोबाइल बिल वगैरे.. तुम्हाला सोसायटीची कामेही ऑनलाइन पद्धतीने करता आली तर? अपार्टमेंटअड्डा (apartment ADDA) या पोर्टलवर तुम्ही तुमच्या सोसायटीशी संबंधित कामं करू शकता, पाहू शकता. जसे की- सोसायटीचा देखभाल खर्च (मेंटेनन्स) ऑनलाइन भरू शकता. तसेच एसएमएस व मेलच्या माध्यमातून सोसायटी नोटीस प्राप्त करू शकता.
शहरात मोठय़ा प्रमाणात टॉवर उभे राहात आहेत. त्यातील अपार्टमेंटच्या मालकांचे सरासरी वय २१-३० वष्रे इतके आहे. या पाश्र्वभूमीवर अपार्टमेंटअड्डा (apartment ADDA) या पोर्टलची आखणी केली आहे.
अपार्टमेंटअड्डाडॉटकॉम (apartment ADDA.com ) एक अत्यंत सोयीस्कर व सुरक्षित सोसायटी मेन्टेनन्स सॉफ्टवेअर आहे, जे व्यवस्थापनाशी संबंधित कामे कोणत्याही वेळी आणि कुठूनही स्मार्ट पद्धतीने करण्यामध्ये तुमची मदत करते. तुम्ही केवळ आपला स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून तात्काळ तुमची कामे करू शकता.
तुम्ही कुठूनही आणि कधीही ऑनलाइन बिले भरू शकता. तसेच आपले शेजारी व सोसायटीशी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक प्राप्त करू शकता. ‘अपार्टमेंटअड्डा’द्वारे खासकरून सदस्यांकरिता एक ‘मेंबर्स-एक्सक्लुझिव्ह’ हे एक व्हच्र्युअल फोरम आहे, जेथे तुम्ही आपल्या इमारतीतील अन्य रहिवाशांसह सोसायटीसंबंधित किंवा इतर स्थानिक मुद्दय़ांवर चर्चा करू शकता. त्याचबरोबर आपली तक्रार करू शकता- जसे की लिफ्ट बंद पडली आहे? कचरा उचलला जात नाही? अशा प्रकारच्या आपल्या सर्व तक्रारी आता तुम्ही तुमच्या फोटोसह आपल्या हेल्पलाइन हेल्पडेस्कवर पोस्ट करू शकता.
तुम्ही तुमच्या सोसायटीकडून सर्व महत्त्वाचे संपर्क आणि नोटीस एसएमएस/ई-मेल अलर्टस्द्वारे प्राप्त करू शकता.
इतकेच काय, तुम्ही घरी नसताना तेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या सुरक्षेकरिता  इमारतीमधील सिक्युरिटी सिस्टिीमवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या गरहजेरीमध्ये इमारतीत, पर्यायाने घरी येणारी मंडळी, नोकर यांचे फोटो, बायो-मेट्रिक ओळख तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाइलवर दिसेल.
‘अपार्टमेंटअड्डा’ द्वारे गृहिणी घरबसल्या केवळ एका क्लिकने आजूबाजूच्या परिसरातील उपलब्ध सेवा, दुकानदार यांची माहिती मिळवू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:02 am

Web Title: housing society management portal
टॅग : Housing Society
Next Stories
1 अन् कर्म नेते
2 अमेरिकेत घर पहावे बांधताना!
3 घर घडवताना.. आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने
Just Now!
X