News Flash

चोरांपासून घराचं संरक्षण कसं कराल?

चोरांना आणि घरफोडीला अटकाव घालता येऊ शकतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गुन्ह्य़ांवर अंकुश ठेवणे आणि नागरिकांना सर्वात आधी सुरक्षा पुरवणे ही पोलीस आणि प्राधिकरणाची जबाबदारी आहे. तरीही घराच्या सुरक्षेसंबंधीचे निर्णयही अगदी निष्काळजीपणे घेऊन चालणार नाही. केवळ हाय-फाय उपकरणं म्हणजे सुरक्षा नव्हे, हा एक सर्वसामान्यांपेक्षा वेगळा समज. यापेक्षा खूप सोपे उपाय आहेत, ज्यामुळे चोरांना आणि घरफोडीला अटकाव घालता येऊ शकतो.

  • तुमच्या दरवाजासाठी एकापेक्षा जास्त कुलपांचा वापर करा, यामुळे ती सगळी कुलपं फोडण्यासाठी त्याला नक्कीच जास्त वेळ लागेल.
  • तुम्हाला हे माहीत आहे का, की बहुतांश चोर हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजातूनच आत शिरायचा प्रयत्न करतात. यामुळेच मुख्य दाराला एखादं कुलूप लावणं पुरेसं नाहीये. यामुळे जेव्हा कुलूप लावलं जात असेल तेव्हा तज्ज्ञांशी सल्लामसलत करा, हा एक सल्ला आहे. बऱ्याचशा प्रमुख कंपन्या किल्ली बनवणाऱ्यांना आणि सुतारांना कुलूप व्यवस्थित कसं लावायचं याचं प्रशिक्षण देऊन प्रमाणित करतात. उदाहरणार्थ, तुम्हाला कुलूप बसवणाऱ्या सुताराला कुलूप दाराच्या आत खोल बसवण्यासाठी तीन इंचांपेक्षा मोठय़ा चार घट्टय़ांचा स्क्रू वापरण्याविषयी सांगायला हवं. बहुतांश सुतारांना हा महत्त्वाचा टप्पा माहीतच नसतो आणि ते लहान आणि कामचलाऊ स्क्रू वापरून कुलपं लावतात; हा तुमच्या सुरक्षेबाबत जोखीमच आहे.
  • खिडक्यांकडे दुर्लक्ष करू नका – अवास्तव किमती आणि जागेचा अभाव यांमुळे घरमालक सरकत्या काचेच्या तावदानांचा विचार करतात. सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने त्या फारच सुंदर दिसतात, पण या खिडक्या/ दरवाजे कुलपांनी नव्हे तर लॅचने बनलेले असतात, हे समजून घ्यायला हवं. त्या बाहेरून उघडणं हे असुरक्षित आहे कारण त्याची मूळची लॅचची यंत्रणा ही सदोष आहे. या सरकत्या खिडक्यांना आधीपासूनच आतून कुलूप असणं आणि त्याउपरही खिडक्यांना मजबूत लोखंडी जाळी असणं गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:53 am

Web Title: how to protect your home from thieves
Next Stories
1 होम थिएटर
2 भिंतीवरची खुंटी
3 सहकारी संस्थांची आता वार्षिक तपासणी
Just Now!
X