|| प्राची पाठक

साधारण २०-३० वर्षांपूर्वीपर्यंत मध्यमवर्गातील बहुतांश घरांमध्ये जुन्याच पद्धतीचे संडासाचे भांडे बसवलेले असायचे. परदेशी जाऊन तिथले कमोड वापरून, पाहून आलेले लोक त्यावर बसून कसे ‘प्रेशर’ येत नाही, कशी गरसोय होते घाईच्या वेळी, अशा चर्चा हिरिरीने करत असत. अजूनही अशा चर्चा सुरूच असतात, कारण भारतात बदलांचा प्रवाह हळूहळू झिरपतो. बदल चांगले की वाईट, तो वेगळा मुद्दा. पण मुद्दाम उठून एखादी सवय बदलून, त्यासाठी घरातली आधीची गोष्ट तोडून, फोडून काढून, पसे खर्चून होणारा बदल असल्याने याचा वेग आणखीनच कमी होता. त्यात कमोडला पाश्चिमात्य म्हणून झोडपायची सोय होती. मग नसíगकरीत्या शौचाला बसणे कसे श्रेष्ठ आहे, आपली भारतीय पद्धत कशी योग्य आहे, याचा प्रचार-प्रसार करणारे लोक उफाळून आले. एखाद्या गृहीतकात काही अंशी सत्य असू शकते. पण तेच म्हणजे पूर्ण सत्य नसते, हे भावनाप्रधान, अस्मिताप्रधान देशात सहज शक्य असते. त्यातच कुठेतरी संडासात बसून पुस्तकं वाचता येतील, रोजचे वर्तमानपत्र चाळता येईल, हा ट्रेंड आला. मग संडासात काहीही नेणे कसे घाण आणि कसे ती पुस्तके खराब करणे आहे, यावर चर्चा होऊ लागल्या. संडासात वापरलेल्या पुस्तकांना, वर्तमानपत्रांना घरातल्या इतर सदस्यांना वापरायला नकोसे वाटू लागले. संडासात वर्तमानपत्र नेणारे, संडासाच्या पाइप्सला आणि कोणत्याही खाचाखोचांमध्ये ते अडकवून ठेवणारे घरातले सदस्य आणि हे काहीही न आवडणारे घरातले सदस्य अशी फूट अनेक घरी पडली. हळूहळू संडासात आरामदायी सोयी असाव्यात, म्युझिक सिस्टीम असावी, गाणी असावीत ऐकायला, वाचायला पुस्तके असावीत, गालिचे अंथरलेले असावेत, चहा-कॉफी मेकर्स असावेत, हे ट्रेंड्स येऊ लागले.

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

हे ट्रेंड्स येत असतानाच सार्वजनिक जागी कमोडचे भांडे वरचेवर दिसू लागले. कमोड कसे वापरावे, त्याची स्वच्छता कशी राखावी, याचे मूलभूत प्रशिक्षण/ माहिती न मिळताच हे भांडे सार्वजनिक स्वछतागृहांमध्ये येऊ लागले. त्यामुळे कमोडचा तिरस्कार करणाऱ्यांना भरपूर नवीन मुद्दे मिळाले. कमोड नीट फ्लश न करणे, त्याच्या कडांवर घाण असणे, त्याची रिंग न टाकता कमोड वापरणे, कमी दर्जाचे कमोड बसविणे, त्यात होणारी पाण्याची नासाडी, त्यातून पसरू शकणारे रोग, त्याची स्वच्छता ठेवायला कमी पडणे, काही ठिकाणी लोक चक्क त्याच्यावरच उभे राहणे आणि कार्यभाग साधणे असे वेगवेगळे ‘अनोखे’ प्रकार आजूबाजूला घडताना दिसू लागले. या सर्व मुद्यांमध्ये तथ्य होतेच. पण त्यांना माहितीच्या अभावाची जोडदेखील होतीच. एक सवय पूर्णत: बदलणे सोपे नसतेच. त्यामुळे, कमोडच्या या सार्वजनिक ठिकाणच्या वाढत्या वापराने कमोडविषयी लोकांच्या मनात किळस निर्माण झाली. जिथे भारतीय पद्धतीचे, नेहमीच्या सवयीचे संडासदेखील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ राहत नाहीत, तिथे सवयीचे नसलेले कमोड स्वच्छ ठेवणे आव्हानात्मकच असते! काहींना त्यावर बसल्यावर प्रेशर येत नाही. त्यामुळे, असे कमोड हॉटेलांमध्ये, ऑफिसला असतील तर गरसोयीचे वाटते, असे अनुभव वरचेवर दिसत होते. अजूनही हे मुद्दे पुढील काही वर्षे वैध राहतीलच, कारण कमोड कसे वापरावे, त्यात पाणी वाचू शकते, आपली सोय साधता येऊ शकते, स्वच्छ आणि कोरडे असे संडास असू शकतात, ही माहिती आपल्याला नाही. स्वच्छ, कोरडे, प्रसन्न, हवेशीर, पुरेसा प्रकाश असलेले आणि तरीही स्वस्त असे संडास बघायची सवयदेखील आपल्या डोळ्यांना नाही!

सार्वजनिक जागी कमोडचा शिरकाव होत असतानाच आणि त्याबद्दल खुसपूस मोठय़ा प्रमाणात होत असतानाच वयस्क लोकांसाठी कमोड कसा सोयीचा आहे, खाली बसायला त्रास होणाऱ्या स्त्रियांसाठी कमोड कसा फायदेशीर ठरू शकतो, हे दबक्या आवाजात कुठे कुठे बोलले जाऊ लागले. हळूहळू कमोडची ही बरी बाजू आणि मुळात सोय, समाजातल्या एका टप्प्यातल्या लोकांना स्वत: वापरातून पटू लागली. पाण्याची नासाडी कमी करूनसुद्धा कमोड उत्तम वापरता येतात, हे समजू लागले. मलमूत्र विसर्जनाच्या कृतीसाठीसुद्धा काही बरी सोय असू शकते आणि ती हवी तशी सुधारून घेता येते, हे लक्षात येऊ लागले. मग काही घरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय पद्धतीचे जुने संडासाचे भांडे उखडून काढून तिथे कमोड विराजमान होऊ लागले. ज्या घरांमध्ये दोन संडासाची सोय आणि जागा आहे, ते प्रौढीने सांगू लागले की, ‘‘आमच्या घरात कमोड आणि भारतीय संडासदेखील आहे! वापरा जो सोयीचा असेल तो.’’ नवीन बांधकामांमध्ये भारतीय पद्धतीचे संडासाचे भांडे पूर्णत: काढून टाकलेले आणि तिथे केवळ कमोडचीच सोय दिलेले दिसू लागले. त्यावरदेखील कमोड विरोधक आणि भारतीय भांडे समर्थक वेगवेगळ्या चर्चा करू लागले. सकाळी प्रेशर येण्यासाठी नसíगक पद्धतीने संडासला बसणेच श्रेष्ठ आणि त्यासाठी किमान कमोडवर बसताना पायाखाली स्टूल तरी घ्यावा, असा एक ट्रेंड हळूहळू येऊ लागला. गेल्या तीन चार दशकांत मलमूत्र विसर्जनाच्या सुविधेत आणि सोयींमध्ये हे काही बदल मोठय़ा प्रमाणात घडताना दिसून आले.

कमोडचा वापर वाढवूनसुद्धा पाणी कसे वाचू शकते, या भांडय़ाची नीट देखभाल कशा प्रकारे ठेवता येते, नसíगक मलमूत्र विसर्जनाच्या सवयीपर्यंत कसे ते भांडे सुधारून घेता येईल, हे सर्व पुढील लेखात समजून घेऊ.

संडासाची खोली ही पॉश असणे, हे केवळ बडय़ा लोकांसाठीचे ऐषोआरामी पर्याय नसून साध्याशा आणि छोटय़ाशा सेटअपमध्येसुद्धा प्रसन्न, निवांत अशी ही छोटीशी खोली आपल्या घरात, ऑफिसात असू शकते. ती खोली तशी असणे ही कोणतीही चन आणि उधळपट्टी नसून, आपली गरज आणि सोयसुद्धा आहे, तेही समजून घेऊ!

prachi333@hotmail.com