|| श्रीनिवास बाळकृष्णन

हिंदी सिनेमे पाहणाऱ्या आपण अनेक सिनेमात काही वैशिष्टय़पूर्ण वस्तू (प्रॉप्स) पाहत असतो. संत तुकारामाला घेऊन जाणारे पंख हलविणारे पुष्पक विमान असो की ट्रॉयचा सिनेमातला चाकावरला लाकडी घोडा असो. विविध प्रकारच्या लाकडी वस्तू वापरून सेट सजवला जातो आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला अचंबित केलं जातं. त्याही पुढे जाऊन सावंतवाडीची लाकडी खेळणी पाहण्यापल्याड लाकडाचा आणि कल्पकतेचा संबंध आपल्याला येत नाही.

अनेक वष्रे स्वत: मेहनत घेऊन लाकडी वस्तूंनी सजलेलं घर येणाऱ्या पाहुण्याला असेच आश्चर्य देऊन जाते.

चेंबूरस्थित दीपक मेघनानी यांच्या घरी पाहायला मिळतो हा कलाविष्कार. लाकडी वस्तूंचा जादूगार म्हणावा असं सोशली अ‍ॅक्टिव्ह व्यक्तिमत्त्व चेंबूर परिसरात परिचित आहे. पेशाने बांधकाम क्षेत्रात असणारे दीपक यांनी मुंबई-गोव्यात अनेक हॉटेल, क्लब, जिमखान्याचे बांधकाम केलं आहे. अनेक अडचणींच्या ठिकाणी कल्पक उत्तरं शोधणारे म्हणून त्यांची ख्याती आहेच. पण कामाच्या ठिकाणीदेखील फावल्या वेळेत आपल्या या छंदाची जोपासना करत असतात. मुळातच जुगाड करण्यात हातखंडा असल्याने लहानपणापासून त्यांना हे लाकडी वस्तूंचे वेड खुणावत होते. त्यांची खेळणीही हातोडा, खिळे, करवत, पेचकस, इत्यादी होती. सतत उपयोगी, कल्पक आणि सुंदर वस्तू बनविण्याकडे त्यांना मुळातच ओढ होती. हीच ओळख अनेक वष्रे जपली. आई-वडिलांनीदेखील पोरगा कुठं वाईट वळणाला लागत नाहीये या समाधानाने दीपक यांना प्रोत्साहन देत होते. त्याचा परिपाक म्हणून आज त्यांच्या घरात तुम्हाला कुठलंही फíनचर हे विकत आणलेलं दिसणार नाही व तेही साधे सरळ दिसणार नाही.

रशियन बहुल्यांप्रमाणे एकात एक अशा वस्तू लपलेल्या असतात. कशातून तरी कुठली तरी वस्तू बाहेर येते. आणि अशा वस्तूंनी घराचा दर्शनी भाग ते आतील बेडरूम सर्व काही व्यापलेले असते. यांचे हुनर इथेच संपत नाही. स्वयंपाक करण्यातही यांचा हातखंडा असल्याने बिर्याणीसाठी स्पेशल लाकडी भांडे केलेलं आहे. खाण्यासोबतच पिण्यातही रस असल्यामुळे चहा ते व्हिस्कीपर्यंत पिण्यासाठी त्या त्या प्रकारची भांडी, ग्लास, पेटी असे स्वत: हाताने बनवलेले असते.

घरातील डायिनग टेबल, वॉर्डरोब, वॉल युनिट, टीपॉय हा वैशिष्टय़पूर्ण व दीपक यांच्या हाताने बनवलेला आहे. दीपक सांगतात की, गाडीतून लांबवर फिरायला जायचंय तर दोन पेटय़ा घेऊन जायच्या.. ही एक छोटी, यात चहा किटली आणि सहा काचेचे ग्लास आणि गाडीतच चहा करता येईल असे उपकरण त्या पेटीत मस्त ठेवलेले असते. दुसरी मोठी ड्रमवाली पेटी, त्यात बर्फाचा ट्रे, एक व्होडका, एक व्हिस्की आणि सहा लाकडी ग्लास अशी उभी मांडणी.

दीपक यांच्या घरात एक व्हीआयपीची सुटकेस आहे. त्यात कपडे नाहीत. एक छोटा फोिल्डग बाकडा, ८ ग्लास, २ बाटल्या.

अनेक लाकडी वस्तू या कळत्या वयापासून डोक्यात होत्या. ऑफिसातून आल्यावर घरात ही काप्रेन्ट्री सुरू होई. यामुळे घरच्या कुटुंबीयापासून ते सोसायटीच्या प्रत्येक घरातून येणाऱ्या तक्रारीचा सामना हसतमुखाने केला. परंतु छंदाला थांबवलं नाही. घरभर रोजचा भुसा सहन करणाऱ्या पत्नीचादेखील महत्त्वाचा वाटा दीपक मान्य करतात.

दीपक यांच्या घरचा गणपती हादेखील यांत्रिक-तांत्रिक गोष्टींनी युक्त असतो. इकोफ्रेंडली सजावट आणि दहाव्या दिवशी पाटाखाली असणाऱ्या मोठय़ा फिशटॅन्कमध्ये कप्पीच्या साहाय्याने विसर्जति करण्याची सोय असते. तो नयनरम्य सोहळा पाहायला त्यांच्या घरी लांबून लोक येतात. येणाऱ्या कल्पना हळूहळू प्रत्यक्षात उतरल्या आणि त्यात सतत बदल होत गेले. पण एकासारखी दुसरी वस्तू बनली नाही. ना प्रॉडक्शन केलं. जे केलं ते स्वत:साठी. आजही रात्री उशीशेजारी एक वही घेऊन दीपक झोपतात.. अचानक कल्पना आली की उठून ती कागदावर उतवरून काढतात. हा उत्साह लहानपणीदेखील इतकाच होता. जो अजूनही टिकून आहे.

घरातील डायिनग टेबल, वॉर्डरोब, वॉल युनिट, टीपॉय हा वैशिष्टय़पूर्ण व दीपक यांच्या हाताने बनवलेला आहे. दीपक सांगतात की, गाडीतून लांबवर फिरायला जायचंय तर दोन पेटय़ा घेऊन जायच्या.. ही एक छोटी, यात चहा किटली आणि सहा काचेचे ग्लास आणि गाडीतच चहा करता येईल असे उपकरण त्या पेटीत मस्त ठेवलेले असते.

chitrapatang@gmail.com