|| सीमा पुराणिक

मिती म्हणजे मोजमाप (Dimensions, Measurements) आणि गती म्हणजे चलनवलन (Circulation, Movement) मिती बदलल्या की गतीला वेगळे वळण घ्यावे लागते आणि गतीने एकदा स्वत:चा मार्ग निश्चित केला की मितींचे बदलणे अपरिहार्य असते. उदाहरणादाखल आकृती क्र. १ पाहा.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

स्वयंपाकघरात येण्याचा मार्ग आणि त्यालगत असलेल्या भिंतीचे मोजमाप बदलले तर गती म्हणजे चलनवलन बदलते. या बदलाचा उपयोग करून जागेचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला आणि त्यामुळे साहजिकच अंतर्गत जागेचे मूल्यांकन (Space-value) वाढले.

अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण या विषयावरील मागील लेखात आपण इमारतीच्या बांधकामाचा प्रकार (आर. सी. सी. किंवा लोड बेअिरग ), इमारतीची (स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने) अद्ययावत स्थिती व त्यानुसार घेण्याची काळजी, इमारतीतील जागेच्या गळतीसंबंधीचे प्रश्न (Leakage Problems), तसेच अंतर्गत कामाचे नूतनीकरण यासंदर्भात अनेक तांत्रिक मुद्दय़ांचा उलगडा केला व जागेचा सुयोग्य पद्धतीने अधिकाधिक वापर कसा करू शकतो याचे एक उदाहरणदेखील पाहिले.

‘अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण’ करण्याचा मुख्य उद्देश अंतर्गत जागेचा अधिकाधिक उत्तम प्रकारे वापर करून जागेचे मूल्यांकन वाढवणे हा असतो.  या संदर्भातच आज आपण मिती आणि गती यांचा विचार करणार आहोत. मिती, क्षेत्रफळ, घनफळ इत्यादी तांत्रिक व गणिती पारिभाषिक शब्द हे रेषा, त्रिकोण, चौकोन, घनाकार यासारख्या भौमितिक घटकांच्या संदर्भात अधिक माहिती देतात. तसेच गती (Movement ,Circulation) प्रमाणबद्धता Proportion), तोल (Balance), सुसंवाद (Harmony ) ही झाली रचनातत्त्वे, (Design Principles) म्हणूनच भौमितिक व तांत्रिक बाबी आणि रचनातत्त्वे- अर्थात गणित, तंत्रज्ञान व कला यांचा सुरेख मेळ अंतर्गत रचनाशास्त्राचा अभ्यास करताना पाहावयास मिळतो. रेषा, वक्राकार, घनाकार इत्यादी घटकांची सांगड घालून अंतर्गत रचनाकार त्रिमितीय कलाकृती करत असतो. ज्याप्रमाणे उत्तम संगीतकाराने लीलया केलेल्या सुंदर रचनेतील रागालापी मनाला सुखद आनंद देऊन जाते, अगदी त्याचप्रमाणे अंतर्गत रचनाकाराने केलेल्या रचनाकृतीत त्याच्याही नकळत प्रमाणबद्धता, तोल, एकतानता, गतिबद्धता इत्यादी अनेक रचनामूल्यांचा वापर होऊन ती कलाकृती नेत्रसुखकारक व सकारात्मक वातावरण निर्माण करते. मिती आणि गती यांचा विचार करताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की मिती बिघडली की गती बिघडते.

अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण करताना ‘गती कशी नसावी’ याचे एक उत्तम उदाहरण आढळले. आकृती क्रमांक २ मधील भाग ‘अ’ मध्ये तुमच्या लक्षात येईल की सदर बेडरूममधील दरवाजाची स्थिती (खोलीच्या) कर्णाच्या दिशेत असेल तर जागेचा नीट वापर करता येत नाही. दोन्ही त्रिकोणात्मक भागांतील जागेत फíनचरची मांडणी नीट होत नाही व चलनवलनाच्या मार्गात अडथळे येतात किंवा तो मार्ग चुकीच्या पद्धतीने स्थापित करावा लागतो. याउलट ‘ब’ उदाहरणानुसार गतिबद्धता साधली जाऊन बेड, वॉर्डरोब इत्यादी सर्व फíनचरची मांडणी उत्तम प्रकारे करता येते व खोलीचा दृश्य समतोलही साधता येतो.

अंतर्गत रचनेचा आराखडा लक्षात घेताना गती अथवा चलनवलन या रचनातत्त्वाचा अधिक विचार केला पाहिजे. लेखापरीक्षण करताना या रचनातत्त्वांच्या दृष्टीने काही त्रुटी बरेचदा आढळतात. जसे की, दरवाजाची उंची केवळ साडेसहा फूट असतानाही दरवाजाच्या वरच्या भागात कमान (Arch) केली जाते. अशा वेळेस सामान्य उंचीच्या माणसालादेखील दरवाजाच्या मध्यभागातूनच जा-ये करावी लागते. दोन्ही बाजूला खाली उतरणारा कमानीचा भाग चलनवलनाच्या दृष्टीने त्रासदायक असतो व गतीला बाधा आणतो.

त्याचप्रमाणे चलनवलनाचा विचार करताना फíनचरचे टोकदार कोपरे येता-जाता लागणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे अशा वेळेस त्या भागाला गोलाई दिल्यास बरे पडते. किंबहुना आपण कॉर्नर गार्डस् अथवा एज गार्डस्चा वापर करू शकतो. विशेषत: अरुंद पॅसेज असेल तर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांचे फíनचर डिझाइन करताना त्यांचे वय, उंची लक्षात घेऊन त्यांना कोठेही इजा पोचणार नाही याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांच्या खोलीतील फíनचरची उंची कमी ठेवल्यास त्यांना ते वापरण्यास सुकर होईलच, परंतु त्यांच्या मनावर अतिउंच व अतिभव्य फíनचरचा ताणही येणार नाही.

त्याचप्रमाणे बरेचदा एक प्रकारची काल्पनिक भीती (Abstract Fear) वाटेल अशा प्रकारची अंतर्गत रचना केलेली असते. जसे की- खूप खाली आलेला छताचा भाग किंवा खोलीच्या आकाराचा व तेथील वस्तूंचा समतोल न ठेवता खूप खाली आलेले झुंबर.. जरी प्रत्यक्षात या गोष्टी सामान्य उंचीच्या माणसाच्या डोक्याला लागत नसल्या तरी एक प्रकारचे दडपण किंवा भीती निर्माण करतात. बरेचदा बीमची खोली जास्त असते, अशा खूप खाली आलेल्या बीमला गडद रंग देणे टाळलेच पाहिजे.

तसेच खोलीत शिरताक्षणीच अगदी समोरच्या भिंतीवर दिलेला गडद रंग आत येणाऱ्याच्या गतीवर परिणाम करतो. अशा वेळेस संवाद अर्थात वास्तुसंवाद साधणे किती गरजेचे असते ते लक्षात येते. थोडक्यात, अंतर्गत सजावट ही दैनंदिन जीवनात अडथळा न होता सुसंवाद निर्माण होणे आणि अंतर्गत रचना करताना  मिती आणि गतीचे गणित जमणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर)