१४ एप्रिल हा दिवस ‘भारतीय अग्निशमन दिन’ म्हणून पाळण्यात येतो. गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर इमारतींचे फायर ऑडिट व लोकांची मानसिकता याचा मागोवा घेणारा लेख.  
आग ही अत्यंत संहारक आहे. आग त्वरित आटोक्यात न आल्यास धनधान्य, यंत्रसामुग्री व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होतात. बऱ्याचदा प्राणहानीदेखील होते. त्यासाठी आग लागण्याची कारणे शोधून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आगीचे कारण कळल्यावर ती विझविण्यासाठी कोणती उपाययोजना करणे तसेच भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करणे सोपे जाते. आत्तापर्यंत लागलेल्या आगींच्या संख्येपकी ९० टक्के आगी मानवी निष्काळजीपणा/चुकांमुळे तसेच शॉर्ट-कट पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आणि शॉर्टसíकट झाल्यामुळे आग लागल्याच्या बहुतांश घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रत्येक वेळी आपण फक्त आग लागल्यावरच तात्पुरती विहीर खणून वेळ मारून नेतो. त्यासाठी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ काढण्यात आला. बऱ्याचदा शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या कायद्यातील अटी व तरतुदींचे पालन आपल्याकडून केले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आगीच्या वाढत्या घटना व त्यापासून होणारी राष्ट्रीय संपत्तीची हानी व जीवितहानी लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
आगीपासून घराच्या/इमारतीच्या सुरक्षिततेबाबतचा अधिनियम काय म्हणतो ते पाहू :–
राज्य शासनाच्या उपरोक्त अधिनियमानुसार घरमालकांना आपले घर आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे, याची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील अग्निशमन दल तसेच सरकारने ज्या संस्थांना किंवा व्यक्तींना अशा प्रकारची तपासणी करण्याचे अधिकार दिले आहेत अशांकडून ही तपासणी करून घेऊन त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलमध्ये ही प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. वर्षांतून दोन वेळा होणाऱ्या तपासणीमुळे आग लागू शकण्याची कारणे शोधून काढण्याची व समूळ दूर करण्याची उत्तम उपाययोजना करणे, या उपयुक्त कायद्याच्या आधारे अधोरेखित करणे हा त्यामागचा मुख्य हेतू दिसून येतो.
(अ)  विजेच्या बाबतीत निष्काळजीपणा व नियम/र्निबध झुगारून झटपट काम संपवून आराम करण्याची मानवी प्रवृत्ती आगीस कारणीभूत ठरते.
 दैनंदिन जीवनातील काही धोकादायक शॉर्टकट  टाळणे आवश्यक आहे
(१) घरातील प्रत्येक विजेचा पॉइंट हा ‘थ्री-पिन सॉकेट’ असल्याची व त्यासाठी व्यवस्थित अíथन्ग दिली गेली असल्याची काळजी न घेता विजेची उपकरणे वापरणे. कोणतेही विजेचे उपकरण वापरताना ते ‘थ्री-पिन प्लग’ असल्याची काळजी न घेता वापर करणे. बऱ्याचदा विजेची उपकरणे ‘टू-पिन प्लग’ चा वापर करून वापरली जातात. काही वेळा तर नुसत्याच वायर्स काडय़ापेटीच्या कांडय़ांच्या साह्याने सॉकेटमध्ये घुसवून विजेचा वापर केला जातो.
(२) दिवाळी व अन्य कार्यक्रमावेळी कंदील व अतिरिक्त शोभेच्या रोषणाईसाठी थ्री-पिन/टू-पिन प्लग उपलब्ध नसल्यास नुसत्याच वायर्स काडय़ापेटीच्या कांडय़ाच्या साहाय्याने सॉकेटमध्ये घुसवून सण साजरा केला जातो.
(३) घरातील फ्युजची वायर बदली करताना योग्य जाडीची वायर बसविण्याची काळजी घेतली जात नाही. फ्युजसाठी जास्त जाड वायर बसविल्यास वायर गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. अधूनमधून फ्युजची वायर बदलण्याचा त्रास टाळण्यासाठी अधिक जाडीची वायर बसविण्याचा अत्यंत धोकादायक शॉर्टकट स्वीकारला जातो. पारंपरिक फ्युजऐवजी आधुनिक व अधिक सुरक्षित असे ‘एम. सी. बी.’ ( मिनीएचर सíकट ब्रेकर ) बसविल्यास आगीसारख्या दुर्घटना टाळण्यास मदत होते. परंतु थोडय़ाशा खर्चासाठी तसे करणे सोयीस्कररीत्या टाळले जाते.
(४) निष्काळजीपणे अर्धवट जळलेल्या विडय़ा, सिगरेटसची थोटके व काडय़ा पेटीतील काडय़ा इतस्तत: टाकणे.
(५) इमारतीच्या/संस्थेच्या जिन्याखाली असलेल्या अरुंद व अंधार असलेल्या जागेत विजेची मीटर्स, मेन स्विच / मेन फ्युज बसविण्यात येतात. या ठिकाणी  शॉर्टसíकट  होऊन आग लागण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत अशा ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांकडे दुर्लक्ष करून आपण विजेची मीटर्स, मेन स्विच/मेन फ्युज सुरक्षितस्थळी हलवीत नाही. तसेच अशा ठिकाणी आग-प्रतिबंधक उपकरणे अथवा वाळूने भरलेली बादली ठेवण्यास टाळाटाळ करतो.
(६) इमारतीची/संस्थेची अग्निशमन यंत्रणा व आग-प्रतिबंधक उपकरणे व्यवस्थित कार्यरत असल्याची नियमितपणे तपासणी करणे व चाचणी घेणे अत्यंत आवश्यक असते. असे केल्याने आग-प्रतिबंधक उपकरणे वापरण्याजोगी राहातात. तसेच ही यंत्रणा/उपकरणे कशा प्रकारे हाताळावी याचे रहिवाशांना/सभासदांना प्रशिक्षण/माहिती देणे गरजेचे आहे. परंतु त्याची तसदी घेतली जात नाही.
(७) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अग्निशमन दलासाठी इमारतीच्या एका बाजूला सहा मीटर मोकळी जागा ठेवण्याची काळजी घेतली जात नाही. तसेच इमारतीच्या/संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका व अन्य आपत्कालीन मदत वाहने तातडीने येण्यासाठी आवारात कायम मोकळा मार्ग राहील याची खबरदारी घेतली जात नाही.
(८) इमारतीच्या रहिवाशांकडून/संस्थेच्या सभासदांकडून सहा महिन्यांतून एकदा ‘मॉक फायर ड्रिल’ (  Mock Fire Drill ) म्हणजे लुटुपुटुची किंवा प्रतीकात्मक आग विझविण्याचा सराव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात नाही.
(९) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ प्रमाणे इमारत आगीच्या धोक्यापासून सुरक्षित असल्याची तपासणी वर्षांतून दोन वेळा म्हणजे जानेवारी व जुलमध्ये करणे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याचे बंधनकारक असून देखील तसे करण्याचे सोयीस्कररीत्या टाळणे.
(ब) ‘शॉर्टसíकट’म्हणजे काय व त्यामुळे लागणाऱ्या आगीची काही प्रमुख कारणे :-
विजेच्या तारांवरील रबरी/प्लास्टिक वेष्टण कालांतराने किंवा उष्ण वातावरणामुळे चिरा पडून अथवा वितळून त्याचे बारीक तुकडे होऊन पडतात व आतील तारा उघडय़ा पडतात. क्वचितप्रसंगी उंदीर/घूस अथवा तत्सम प्राण्यांनी वायर्स कुरतडल्यामुळेदेखील आतील तारा उघडय़ा पडतात. वीज प्रवाह चालू असलेल्या अशा उघडय़ा तारांचा एकमेकांस स्पर्श झाल्यास ठिणगी पडून आग लागण्याची शक्यता वाढते. अशा प्रकाराला शॉर्टसíकटमुळे लागलेली आग म्हणतात.
(१) बहुतांश ठिकाणी, विजेची मीटर्स व मेन स्विच/मेन फ्युज इमारतीच्या/संस्थेच्या तळ मजल्यावरील जिन्याखाली एकत्रितपणे लावलेली आढळतात. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडल्यावर या भागात पाणी साचून मीटर्स/मेन स्विच/मेन फ्युजमध्ये पाणी जाऊन शॉर्टसíकट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते. तसेच कधी कधी विजेचा अतिरिक्त दाब किंवा प्रवाह यामुळे विजेच्या वायर्सवरील वेष्टण वितळून दोनपेक्षा अधिक  वायर्स एकत्र आल्यामुळेदेखील शॉर्टसíकट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते.
(२) समारंभाचे कापडी मंडप, विविध प्रकारची विजेची तोरणे/माळा यांची अयोग्य रीतीने केलेली जोडणी यामुळेदेखील शॉर्टसíकट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते.
(३) दमट/ओलसर िभतीवरील विजेचे स्विच अथवा उघडय़ा वायर्सचा पाण्याशी संपर्क आल्यास शॉर्टसíकट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते.
(४) एक्स्टेंशन वायरचा अयोग्य रीतीने केलेला वापर.  उदाहरणार्थ –  डोळ्यांना दिसू नये म्हणून काप्रेट किंवा गालिच्याखालून वायर्स नेणे. तसेच थर्मोकोल, कागद व लाकडी सामान असलेल्या खोलीत वायर्स लोंबकळत असणे धोकादायक ठरू शकते.
(५) बऱ्याचदा कमी क्षमतेच्या सॉकेट व वायरवर वॉिशग मशीन, फ्रीज, टी. व्ही. व गिझर     सारखी विजेची उपकरणे वापरली जातात. त्यामुळे देखील वायर गरम होऊन त्यावरील वेष्टण वितळून शॉर्टसíकट होऊन आग लागण्याची शक्यता निर्माण होते. त्यासाठी अशा डोमेस्टिक उपकरणासाठी अधिक क्षमतेची वायर व सॉकेट वापरणे अधिक सुरक्षित ठरेल.
(६)  आपल्या सदनिकेतील विजेची सर्व प्रकारची उपकरणे जुनी / नादुरूस्त झाल्यावर लगेचच  नवी उपकरणे खरेदी करतो. जसे, वॉिशग मशीन, फ्रीज, टी. व्ही. व गिझर इत्यादी.  परंतु एकदा केलेले विजेचे वायिरग, मेन स्विच / मेन फ्युज मात्र वर्षांनुवष्रे बदलत नाही की त्याची तपासणी करण्याचे कष्ट घेत नाही. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट  असते. विजेची वायर त्याला अपवाद नाही. शॉर्टसíकटमुळे  लागणाऱ्या संभाव्य आगीचा धोका टाळण्यासाठी, ठराविक मुदतीनंतर तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक तपासणी करून विजेचे संपूर्ण वायिरग, मेन स्विच / मेन फ्युज बदलणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरेल.
आपल्याकडे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ येऊन आठ वष्रे झाली तरीही त्याची अंमलबजावणी करण्याकडे आपण दुर्लक्षच करतो. परंतु आग लागून होणाऱ्या सर्व प्रकारच्या दुर्घटना टाळणे व त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे हीच काळाची गरज आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध