18 October 2019

News Flash

पुनर्विकास बाजारपेठेला नवा आयाम

जसजसा काळ बदलत जातो, तसतशा आवडीनिवडीदेखील बदलू लागतात. घराच्या बाबतीतदेखील अगदी असेच होते

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा प्रभुणे 

आपल्या मनासारखे घर मिळण्याचा आनंद काही औरच असतो. आज आपण जुन्या इमारतीत असलो तरी भविष्यात या इमारतीचा पुनर्विकास झाला तर निश्तिच नवे, आधुनिक स्वरूपाचे घर मिळेल, असे वाटत असते. पण हा पुनर्विकास साधताना निरनिराळया प्रकारची कागदपत्रे जमविताना, गृहकर्जासाठी दमछाक होताना पाहिले की नको रे बाबा घर, असेच काहीसे वाटू लागते. पण पुनर्विकासाच्या विविध अडचणींवर एकाच छत्रीखाली मात करता यावी या उद्देशाने वुई डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना झाली.

जसजसा काळ बदलत जातो, तसतशा आवडीनिवडीदेखील बदलू लागतात. घराच्या बाबतीतदेखील अगदी असेच होते. बऱ्याच वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींना आता पुनर्विकासाची गरज असते. पण पुनर्विकास सहजशक्य आहे का? त्यासाठी लागणारी कागदपत्रे, व्यवहार अशा अनेक अडचणींचे सोपस्कार पूर्ण करून सरतेशेवटी बिल्डर दिलेल्या मुदतीत घर बांधून ताब्यात देईपर्यंत डोक्यावर सतत टांगती तलवार फिरत असते. मग अशा वेळी मॉल संस्कृतीप्रमाणे एकाच ठिकाणी सर्व आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे समजविण्यापासून ते त्यांची पूर्तता होईपर्यंत जर एखादी संस्था तुमच्याबरोबर असेल तर, नक्कीच फरक पडू शकेल. हीच बाब लक्षात घेऊन प्रणय गोयल यांनी वुई डेव्हलपमेंट या संस्थेची स्थापना केली आहे.

पुनर्विकास प्रकल्पामधील पारदर्शीपणा, कोणत्याही स्वरूपाच्या तांत्रिक अडथळयाविना आणि दिलेल्या मुदतीमध्ये प्रकल्प पूर्ण व्हावा, या उद्देशाने ‘वुई डेव्हलपमेंट’ ही संस्था कार्यरत आहे. अशा पद्धतीने ही काम करणारी भारतातील पहिलीच संस्था आहे. म्हणजेच ज्या इमारती पुनर्विकासासाठी उत्सुक आहेत, अशा इमारतींमधील सदस्य कोणत्याही विकासकाची मदत न घेता, स्वत:च्या अपेक्षेनुसार आपल्या इमारतीचा पुनर्विकास यामार्फत करू शकतात. त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे इथपासून ते प्रकल्प पूर्ण आकारास येईपर्यंतची सर्व जबाबदारी ही संस्था घेते. परिणामी, सोसायटीमधील सभासद स्वत:च्या कल्पनेनुसार इमारतीचा पुनर्विकास साधू शकतात.

या संस्थेने स्वत:ची अशी एक व्यवस्था तयार केली आहे. जिथे सोसायटी /इमारतीमधील सदस्य ठरविणार की, त्यांना पुनर्विकास नेमका कसा पाहिजे आहे, त्यामध्ये काय काय सुविधा अपेक्षित आहेत आणि तो किती वर्षांत पूर्ण व्हावा. यासाठी संस्थेकडे खास तज्ज्ञ आणि नामवंत तितकीच अनुभवी अशा कुशल मंडळींची टीम कार्यरत आहे. यात सिव्हिल इंजिनीअर्स, आर्किटेक्टस्, कायदेशीर सल्लागार त्याचबरोबर इमारत व्यवसायातील विविध विभागात कार्यरत असलेल्या व्यावसायिक मंडळींचा समावेश आहे.

एकदा का पुनर्विकास करण्याचे निश्चित झाले की, सोसायटी अथवा त्यामधील सभासदांना नेमका कशा प्रकारचा पुनर्विकास अपेक्षित आहे, हे जाणून घेण्याचे काम ही संस्था करते. मग संस्थेमधील तज्ज्ञमंडळी त्यानुसार सभासदांना मागदर्शन करतात. यात कागदपत्रांच्या पूर्ततेपासून ते अपेक्षित डिझाइन तयार करण्यापर्यंत संस्था मार्गदर्शन करीत असते. यात वेळोवेळी सभासदांच्या मागणीचा विचार लक्षात घेऊन आराखडा तयार केला जातो. मग या आराखडय़ामध्ये असलेले संभाव्य धोके, त्यामधील फायदे आदी सर्व गोष्टींची कल्पना सभासदांना दिली जाते.

याचा एक फायदा असा होतो की, सोसायटी / सभासदांना कामाच्या प्रत्येक हालचालींवर थेट लक्ष देता येते. सोसायटी आणि बिल्डर असा थेट मामला असल्यामुळे फसगतीची शक्यता कमी असते. शिवाय सर्व गोष्टींवर सोसायटीचे नियंत्रण असल्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास निश्चितच मदत होते.

First Published on September 28, 2019 12:16 am

Web Title: new dimension to the redevelopment market abn 97