आज सकाळी मंगलाताईंना कसलं तरी विचित्र स्वप्न पडल्यामुळे एकदम दचकून जाग आली. खोलीच्या दरवाजावर थाप ऐकू आल्यामुळे दरवाजा उघडल्यावर समोर त्यांची सून दिसल्याचं त्यांना स्वप्नात दिसलं आणि त्यानं त्या दचकून उठल्या. मंगलाताई उठून बेडवर सुन्न होऊन बसून राहिल्या. उजाडलेलं दिसत होतं, vr08पण नेमके किती वाजले आहेत ते काही कळत नव्हतं. बाहेर ढगाळ वातावरणामुळे अंधारून आलं होतं. मनातही कोंदटलेपण दाटलं होतं. बाहेर गडगडाट होऊन पावसाच्या धारा सुरू झाल्या. मंगलाताईंचं मन भूतकाळात गेलं आणि इथे या ज्येष्ठालयात आपण आलो होतो, त्या दिवसाची आठवण होऊन डोळ्याला धारा लागल्या. मंगलाताईंचा हा बेड म्हणजे त्यांचं आत्मचिंतनाचं ठिकाण होतं. वय पंचाहत्तरीच्या पुढे असलं, तरी तशा त्या िहडत्या-फिरत्या होत्या. हातीपायी धड होत्या. त्यामुळे त्यांच्या खोलीतल्या या बेडवर बसून समोरच्या फिक्कट पिवळसर िभतीकडे एकटक लावून पाहताना अनेकदा डोक्यात चाललेल्या आयुष्यातल्या घटना, प्रसंग यांचा चित्रपट जणू त्या िभतीच्या पडद्यावर त्यांना दिसत असे. त्यांना लिखाणाचाही आवड होती. त्यासाठी त्यांच्या खोलीत असलेल्या लाकडी टेबल आणि खुर्चीवर बसून त्यांची लेखनसाधना चालायची. आजही सकाळी उठतानाच पडलेल्या या स्वप्नामुळे त्यांना ज्येष्ठालयातला त्यांचा प्रवेश आठवत होता.
घरात नेहमीची होणारी भांडणं विकोपाला गेलीत आणि आई आणि पत्नी यांच्या कात्रीत सापडलेल्या मुलाने- काíतकने त्याच्या परीने दोघींच्या सुखासाठी एक मार्ग शोधून काढला; तो म्हणजे हे ज्येष्ठालय. मंगलाताईंना तो दिवस आठवत होता. ‘‘आई, तुझं आणि ऋचाचं काही जमत नाहीये. आज वेगळं घर घेऊन राहायचं म्हटलं तर ते परवडणारं नाही. त्यामुळे मी तुझ्यासाठी एक चांगलं ठिकाण शोधून काढलं आहे. आपल्या शहरापासून दोन-अडीच तासांच्या अंतरावरच ते ठिकाण आहे. त्यामुळे मला कधीही तिथे येता येईल. आपण उद्याच तिथे जाऊया.’’ एक आवंढा गिळून कसाबसा धीर एकवटून तो म्हणाला, ‘‘तो वृद्धाश्रम नाही.’’ एवढं म्हणून त्याचा बांध फुटला. हे सांगताना त्याची नजर खाली गेली होती, डोळ्याला धार लागली होती आणि भरून आलेला त्याचा कापरा आवाजही मंगलाताईंना जाणवत होता. मंगलाताईंनाही दाटून आल्यामुळे बोलवत नव्हतं. फार काही न बोलता त्यांनी फक्त काíतकच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्या बॅग भरण्यासाठी निघून गेल्या.
दुसऱ्या दिवशी काíतक आणि मंगलाताई ज्येष्ठालयात आल्या. खरोखरच बाहेरून बघितल्यावर हा वृद्धाश्रम असेल, असं वाटतच नव्हतं. बंगल्यांच्या सोसायटीतला हा एक मोठा टुमदार बंगला होता. या सोसायटीतल्या बंगल्यांच्या मधूनच जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्यांच्या दुतर्फा गुलमोहर, भेंडी, पांगारा, रबर, बदाम अशा विविध डेरेदार वृक्षांनी केलेल्या कमानीमुळे पसरलेली थंडगार सावली आणि वृक्षांवर किलबिलाट करणारे कोकीळ, सुतारपक्षी, पोपट, टिटवी अशा अनेक पक्ष्यांच्या नादमधुर आवाजाने संपूर्ण वातावरणातच एक प्रकारचं चतन्य जाणवत होतं. ज्येष्ठालयाच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर बंगल्याचं विस्तीर्ण आवार आणि या आवारात बंगल्याच्या आजूबाजूला हिरव्यागार गवताचं पसरलेलं लॉन मनाला भुरळ घालत होतं. लॉनवर मोठय़ा कापडीछत्र्यांखाली जागोजागी मांडलेल्या टेबल खुच्र्या आणि त्याकडे लॉनच्या मधूनच जाणाऱ्या थोडय़ाशा वळणदार पण व्यवस्थित बांधून काढलेल्या परसदारी पायवाटा होत्या. लॉनच्या कडेला कुंपणाच्या िभतीला लागून हिरव्या पानांमधून डोकावणारी झुपकेदार तुरे असलेली लालचुटुक टपोरी जास्वंद, पिवळा चाफा, मोगरा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांचा सुगंध वातावरणात दरवळत होता. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून थेट मुख्य बंगल्याकडे जाणारी एक सरळसोट, पण रुंदीला इतर पायवाटांच्या तुलनेत रुंद अशी वाट होती. या वातावरणानं मंगलाताईंच्या चेहऱ्यावरचा ताण बराच कमी झालेला दिसत होता. ते पाहून काíतकला थोडं बरं वाटलं. बंगल्यात आत शिरल्यावर उजव्या बाजूला एक काऊंटर होता. डाव्या बाजूला वेताचं सेंटर टेबल आणि वेताचेच सोफा आणि खुच्र्या. त्यावर कापसाचे अभ्रे घातलेले तक्के अशी साधी बठकव्यवस्था. काऊंटरवर जाऊन काíतकने नाव सांगितलं. काऊंटरवरच्या लताताईंनी दोघांना बसायला सांगितलं आणि त्या निरोप देण्यासाठी आत गेल्या. थोडय़ाच वेळात पासष्ट-सत्तरीच्या घरातले पांढरा नेहरू शर्ट आणि लेंगा तसंच डोळ्यांवर जाड काडय़ांचा चष्मा आणि झुपकेदार पांढरी मिशी असलेले गृहस्थ आणि सोबत, साधं पाचवारी पातळ नेसलेल्या, ठसठशीत कुंकू आणि लांब मंगळसूत्र घातलेल्या एक गृहिणी आल्या. हसतमुख चेहऱ्याने हात जोडून मोठय़ा खणखणीत आवाजात, ‘‘याऽऽ,’’ असं अगत्यपूर्वक स्वागत करत ते दाम्पत्य आलं आणि काíतक आणि मंगलाताईंसमोर बसलं. त्या गृहस्थांनी आपली ओळख करून दिली. मी पांडुरंग देसाई आणि ही माझी पत्नी शकुंतला. हा बंगला आमचा आहे. आम्हाला इथे सगळे अप्पा आणि माई म्हणतात. तीस-पस्तीस र्वष कारखानदारी करून मुलांवर सगळा व्यवसाय सोपवला आणि निवृत्त आयुष्य जगण्यासाठी या बंगल्यात येऊन राहिलो. जरी नोकरचाकर असले, तरी एवढय़ा मोठय़ा बंगल्यात आम्हाला दोघांनाच एकटं वाटायला लागलं. संपूर्ण आयुष्य मुलाबाळांमध्ये भरल्या घरात घालवल्यानंतर असं एकाकी वेगळं राहणं मनाला अस्वस्थ करून सोडत होतं. पण इथे राहण्याचा निर्णय हा आमचाच होता. तो काही कोणी लादलेला नव्हता. उलट आमच्या या निर्णयाला मुलांचा विरोधच होता. पण उगाच मुलांच्या संसारात राहिलं की मग आपल्या अनुभवाचा फायदा त्यांना करवून द्यायचा मोह आवरत नाही आणि आपल्याकडून न विचारलेले सल्ले नकळत दिले जातात. ती आपलीच मुलं असलीत, तरी व्यक्ती म्हणून त्यांना स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणूनच आपले आणि त्यांचे स्ट्रेंग्थ आणि विकनेसेस हे वेगवेगळे असतात. आपण आपल्या आयुष्यात जे करू शकलो किंवा करू शकलो नाही, त्या गोष्टी ते तशाच करू शकतील किंवा करू शकणार नाहीत, हे सांगता येत नाही. म्हणूनच कुठल्याही प्रकारचे ठोकताळे मनाशी धरून त्यातून निर्माण होणारे आपले आग्रह आपण त्यांच्यावर अगदी रोजच्या लहानसहान गोष्टीत आणि सवयींमध्येही लादता कामा नयेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण जे फटके सोसले, ते त्यांना सोसावे लागू नयेत, यासाठी आपण सल्ले देतो. हा आपला विचार चांगला असला तरी त्यांच्या मर्यादा, गरजा, सभोवताली असलेली आजची परिस्थिती आणि आजचा काळ हे सगळं आपल्या कालच्या तुलनेत बदललं आहे, हे आपण लक्षात न घेता, आपलं ऐकण्याचा आग्रह धरतो आणि मग घरात वादविवाद सुरू होतात व ते विकोपाला जातात. तेव्हा हे सर्व टाळायचं असेल तर पूर्वी जसा वानप्रस्थाश्रम होता, तसा हा आमचा आपला वानप्रस्थाश्रम! पण आमच्याकडे पसा होता म्हणून आम्ही असा बंगला बांधून राहू शकलो. इतरांचं काय? हे लक्षात आल्यावर आम्ही विचार केला की, आमच्यासारख्या ज्येष्ठांना त्यांचा असा या वयातला निवारा मिळावा आणि आमचाही एकटेपणा दूर व्हावा, या दुहेरी हेतूने आम्ही हे ज्येष्ठालय सुरू केलं. म्हणूनच त्याला आम्ही ज्येष्ठालय म्हणतो. वृद्धाश्रम नाही. तसंच इथलं वातावरणही आम्ही आमच्या घरासारखंच ठेवलंय.  इथे येणाऱ्यांना त्यांच्याच वयाच्या भावाबहिणींबरोबर घरातच राहत असल्यासारखं वाटावं, हा आमचा प्रयत्न असतो. इथे एका वेळी दहा ते बारा ज्येष्ठच असतात. हा वृद्धाश्रम नसल्यामुळेच आजारी पडल्यावर घेऊन जा, असं आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कळवत नाही. बंगल्याच्या मागच्या बाजूला आऊट हाऊसमध्ये आयसीयू असलेलं एक छोटं नìसग होमही आम्ही केलं आहे. तिथे पूर्णवेळ एक डॉक्टर असतात. शिवाय माझे निवृत्त सर्जन असलेले मित्रही इथे आमच्याबरोबर राहतात. त्यांच्या अनुभवाचा फायदाही आम्हाला होतो. इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर आणि रीतसर प्रवेशप्रक्रिया पार पडल्यावर मंगलाताईंना त्यांची पहिल्या मजल्यावरची स्वतंत्र खोली दाखवण्यात आली. सगळ्यांमध्ये असूनही स्वतंत्र खोली असल्यामुळे स्वत:चं विश्वही जपलं जाणार म्हणून मंगलाताईंना बरं वाटलं. त्यांच्या खोलीत त्यांचं सामान लावून दिल्यावर काíतक जड अंत:करणाने आणि भरल्या डोळ्यांनी परत जायला निघाला.
‘‘हे बघ आता वाईट वाटून घेऊ नकोस,’’ मंगलाताईंनी त्याला धीर दिला. हे सगळे लोक बरे वाटत आहेत. मी इकडे आनंदाने राहीन.
‘‘आई, काहीही वाटलं, तर मला कधीही फोन कर. इथे नाहीच जुळलं, तर आपण परत घरी जाऊ,’’ काíतकने मंगलाताईंची आणि त्याच्या स्वत:च्या मनाची समजूत घातली आणि निघाला. काíतक गेल्यावर मंगलाताई बेडवर िभतीला उशी टेकून बसल्या. समोरच असलेल्या िभतीकडे पाहताना पती महेश यांचं निधन, ते गेल्यावर नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना झालेली प्रचंड धावपळ, काíतकच्या शिक्षणासाठी केलेली मेहनत, त्यानंतर काíतकचं लग्न, लग्नानंतर ऋचाला काही शिकवायला, सांगायला गेले तर तिच्या कपाळाला पडणाऱ्या आठय़ा, नंतर तिच्याबरोबर हळूहळू सुरू झालेले आणि विकोपाला गेलेले वाद आणि शेवटी मानावर दगड ठेवून काíतकने सांगितलेला इथे येण्याचा निर्णय हे सगळे प्रसंग समोरच्या िभतीवर जणू चित्रपटासारखे दिसत होते. बाहेर लांबवर लॉनवर पसरलेलं रणरणतं ऊन दिसत होतं. बेडच्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीतून अधूनमधून वाऱ्याच्या झुळुका येत होत्या. लांब लॉनवर असलेल्या उन्हासारखं आता रोजच्या घरातल्या भांडणांचा ताप लांबवर गेल्यासारखा वाटत होता. मनावरचा ताण दूर झाल्यानं मन आणि शरीर हलकं होऊन थकल्यासारखं वाटत होतं. त्यातच डोळा लागला.        
थोडय़ा वेळाने कधी तरी खोलीच्या दारावरची बेल वाजली आणि जाग आली. मंगलाताईंनी दरवाजा उघडला. लताताई जेवणासाठी बोलवायला आल्या होत्या. खाली डायिनग हॉलमध्ये गेल्यावर तिथे राहणाऱ्या इतर ज्येष्ठांशी अप्पा आणि माईंनी मंगलाताईंची ओळख करून दिली. डायिनग हॉल बऱ्यापकी मोठा होता. मध्यभागी काहीसं अंडाकृती आकाराचं डायिनग टेबल होतं. टेबलाच्या दोन निमुळत्या टोकांना अप्पा आणि माई जेवायला बसायचे आणि इतर सगळे रुंद गोलाकार भागावर समोरासमोर बसायचे. जेवणाची तयारी झाली आहे. थोडय़ा वेळात वाढतीलच. तोपर्यंत तुम्ही आमचं स्वयंपाकघर बघा, असं सांगून माई, मंगलाताईंना स्वयंपाकघरात घेऊन गेल्या. डायिनग हॉलशेजारीच स्वयंपाकघर होतं. ओळख करून देण्यात आलेल्या ज्येष्ठांमधल्या काही बायका इथे ओटय़ाकडे काम करत होत्या. एक-दोन ज्येष्ठ पुरुष खाली जमिनीवर बसून कांदा-िलबू चिरत होते. ‘‘एवढय़ा सगळ्यांचं जेवण कोण करतं?’’ मंगलाताईंनी विचारलं. माई म्हणाल्या, ‘‘तसं स्वयंपाक करायला सखू येते. पण काही ज्येष्ठांचं म्हणणं होतं की, आम्ही नुसतंच बसून असतो, वेळही जात नाही आणि आमचे हातपायही चालतेफिरते आहेत, ते तसेच ठेवायचे असतील तर आम्हालाही थोडं काही तरी करू द्या. एकेक दिवस प्रत्येकाच्या आवडीचं ज्याला-त्याला करू देतो. जे अगदीच थकले आहेत, ज्यांना जमतच नाही, अशांनाही विचारून त्यांच्या आवडीचे पदार्थ आळीपाळीने करत असतो. तेवढीच सखूलाही मदत होते. तिला आम्ही नोकर समजत नाही. आमच्याच घरातला एक सदस्य मानतो. त्यामुळे घरी असतो, तर सुनेला मदत केलीच असती ना? अशा भावनेने ते काही तरी करत असतात.’’
मंगलाताई म्हणाल्या, ‘‘मीसुद्धा उद्यापासून स्वयंपाकात मदत करीन.’’ जेवणं उरकल्यावर डायिनग हॉलशेजारीच असलेल्या दुसऱ्या एका मोठय़ा हॉलमध्ये सगळे जमले. अप्पा म्हणाले, ‘‘बरं का मंगलाताई, हा हॉल म्हणजे ज्येष्ठालयातली फॅमिली रूम. इथे सगळ्यांच्या गप्पा रंगतात. कोणी पत्ते खेळतो. त्या कोपऱ्यात कॅरमही ठेवला आहे. संध्याकाळी आम्ही इथे टी.व्ही. लावतो. ज्यांना टी. व्ही. बघायचा नसेल, गप्पा मारायच्या असतील, ते लॉनवरच्या खुच्र्यावर जाऊन बसतात.’’ थोडय़ा वेळाने सगळे विश्रांती घेण्यासाठी आपापल्या खोलीत पांगले. मंगलाताईही त्यांच्या खोलीत आल्यात. अनेक र्वष मनात होतं की दिवाळी अंकांसाठी कथा पाठवायच्या. पण घरच्या धबडग्यात ते शक्यच झालं नव्हतं. बेडशेजारी असलेल्या रायटिंग टेबलावर बसून त्यांनी त्यांच्या लिखाणाला सुरुवात केली.
अशा प्रकारे सकाळी उठून अंघोळ वगरे आटोपल्यावर फॅमिलीरूममध्ये जमून सर्वाची एकत्र प्रार्थना-भजन वगरे व्हायचं. मग नाश्ता. मग जेवणाला मदत. दुपारी लिखाण. संध्याकाळी कधी टी.व्ही., कधी लॉनवर तर, कधी बंगल्याबाहेरच्या सोसायटीतल्या रस्त्यांवरून फेरफटका, असा मंगलाताईंचा दिनक्रम सुरू झाला. काíतकचा रोज रात्री फोन आणि आठ-पंधरा दिवसांमधून ज्येष्ठालयात प्रत्यक्ष चक्कर असं चक्र सुरू होतं.
दोन र्वष ज्येष्ठालयात कशी गेलीत तेच कळलं नाही. आज अचानक सकाळी पडलेल्या विचित्र स्वप्नामुळे जाग आली आणि हे सगळं चित्र डोळ्यांसमोरून सरकलं. आता उठावं आणि नेहमीप्रमाणे आवरावं,
या विचारानं त्या उठल्या, बेड आवरला इतक्यात दरवाजावरची बेल वाजली. मंगलाताईंनी दरवाजा उघडला. समोर लताताई होत्या. म्हणाल्या, ‘‘लवकर खाली या. तुमचा मोबाइल लागला नाही, म्हणून तुमच्या मुलाने खाली लॅण्डलाइनवर फोन केला आहे.’’ मंगलाताई धावतच खाली गेल्या. ‘‘काíतक काय
झालं? इतक्या सकाळीच फोन केलास?’’
काíतकने कापऱ्या आवाजात विचारलं, ‘‘आई तू कशी आहेस?’’
‘‘मी बरी आहे. पण तू का इतक्या सकाळीच फोन केलास?’’ दोन क्षण शांततेत गेल्यानंतर काíतकचा हंबरडा ऐकू आला. रडतच त्याने सांगितलं,  ‘‘आई ऋचा गेली.’’ मंगलाताईंना काही कळेचना. त्यांनी धक्का पचवून स्वत:ला शक्य तितकं सावरत काíतकला धीर दिला आणि शांतपणे काय झालं, ते सांग म्हणून सांगितलं. तेव्हा हुंदका आवरत काíतक म्हणाला, ‘‘गेले सहा महिने ती घशाच्या कॅन्सरने आजारी होती. बोलता येत नव्हतं. लिहून दाखवतं होती. नळीने लिक्विड फूड द्यावं लागत होतं.’’
‘‘मग मला कधीच का बोलला नाहीस?’’ मंगलाताईंनी विचारलं.
तीच म्हणाली होती, की नको सांगूस म्हणून. तिने एकदा लिहून सांगितलं. मी त्यांना खूप बोलले. माझ्यामुळे त्यांना घराबाहेर जावं लागलं. मला
शिक्षा मिळाली. आता त्यांना माझी सेवा करायला कशी बोलवू? कसंबसं कार्तिकने वाक्य पूर्ण केलं आणि परत बांध फुटला. मंगलाताई म्हणाल्या, ‘‘तू नको रडूस, माझीही चूक झाली. भिन्न आवडीनिवडी, सवयी आणि म्हातारपणी आलेल्या व्याधींनी ग्रस्त झालेले चिडचिडे स्वभाव असलेल्या तिऱ्हाईत माणसांबरोबर मी गेले दोन र्वष जुळवून घेतलं. पण माझ्या घरातल्याच सुनेबरोबर मला जुळवून घेता आलं नाही. या ज्येष्ठालयाने ते मला गुरूसारखं शिकवलं. बाळा, मी परत येतेय कायमचीच,’’ असं सांगून त्यांनी फोन ठेवला आणि ज्येष्ठालयाचा निरोप घेऊन त्यांनी घरची वाट धरली.
मनोज अणावकर – anaokarm@yahoo.co.in