20 March 2019

News Flash

कचरा पुनर्प्रक्रियेमधून पेवर ब्लॉकची निर्मिती

घरासंदर्भातील रचनेत नव्याने फेरबदल करताना वेगवेगळ्या स्वरूपाची तोडफोड करावी लागते.

घरासंदर्भातील रचनेत नव्याने फेरबदल करताना वेगवेगळ्या स्वरूपाची तोडफोड करावी लागते. त्यावेळी जो कचरा तयार होतो त्याचे नेमके काय करायचे, हा एक प्रश्नच असतो. अशा वेळी कॉण्ट्रक्टर किंवा आपण हा कचरा इमारतीच्या परिसरात एके ठिकाणी साठवून ठेवतो. मग गरजेनुसार ट्रक येऊन तो कचरा उचलून घेऊन जातो. इतके झाले की संपली आपली जबाबदारी. पुढे या कचऱ्याचे काय होते, तो कुठे टाकला जातो याबाबत आपण फारसा विचार करीत नाही.

मुंबईसारख्या शहरात जिथे छोटय़ा स्वरूपापासून ते ग्रीन सर्टफिाइड प्रमाणित बांधकामापर्यंतचे अनेक छोटे-मोठे प्रकल्प सतत सुरू असतात. अशा वेळी हा बांधकामाचा सिंमेटमिश्रित कचरा ही अलीकडे एक गंभीर समस्या ठरू पाहात आहे. पण या कचऱ्याचे पुनप्र्रक्रिया करून त्यापासून बांधकाम उद्योगाला लागणारे पेलव्हीक ब्लॉक तयार करण्याचा अनोखा प्रकल्प विक्रोळी येथे गोदरेज समूहातर्फे राबविला जात आहे.

या प्रकल्पाविषयी माहिती सांगताना, गोदरेज अ‍ॅण्ड बॉइस ग्रीनर इंडिया टास्कफोर्स आणि गोदरेज कन्स्ट्रक्शनचे व्यावसायिक प्रमुख असलेले अनुप मॅथ्यू म्हणाले की, कचरा ही आपल्या देशाची एक गंभीर समस्या आहे आणि हल्ली या कचऱ्याची नेमकी विल्हेवाट कशी लावायची यावर बऱ्याच संस्था आणि तज्ज्ञ मंडळी कार्यरत आहेत. बांधकाम कचरा ही देखील तितकीच गंभीर समस्या आहे. तो वेळीच उचलला गेला नाही तर अनेक स्वरूपाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. जेव्हा मुंबई विमानतळाच्या रस्त्याचे नूतनीकरण क्षाले, त्यावेळी सिमेंट क्राँक्रीटच्या कचऱ्याचा प्रचंड डोंगर तयार झाला. अशा वेळी या कचऱ्यावर पुनप्र्रक्रिया करून त्यापासून काही नवनिर्मिती करता येणं शक्य आहे का, या संदर्भात आमचा अभ्यास सुरू झाला. त्यातूनच या पेवर ब्लॉकच्या प्रकल्पाची निर्मिती झाली.

पर्यावरणाचा ऱ्हास न होता, पूर्णत: नैसर्गिक गोष्टींनी बनलेले आणि तितकेच उपयुक्त उत्पादन तयार करावे, या उद्देशाने या बांधकाम कचऱ्यासंदर्भात संशोधन करून आम्ही भिंती व जमिनीसाठी लागणाऱ्या पेवर ब्लॉकची निर्मिती करायचे ठरविले. शिवाय, बांधकाम इण्डस्ट्रीमध्ये यांना मागणीदेखील उत्तम असते.

हे पेवर ब्लॉक पूर्णत: संगणकीय प्रक्रियेव्दारे तयार केले जातात. बांधकामांचा सिमेंट स्वरूपाचा कचरा एका क्रशरमध्ये टाकला जातो. त्यापासून आवश्यक ती रेती तयार करून, त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून तयार मिश्रण साच्यामध्ये टाकून, त्यापासून वेगवेगळ्या आकारातील पेवर ब्लॉकची निर्मिती केली जाते

यासाठी लागणारा बांधकामाचा कचरा कसा मिळविला जातो, याविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले की, सध्यातरी आम्ही अशा प्रकारचा कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या प्रमाणित विक्रेत्यांकडूनच कचरा घेतो. कारण वरवर जरी ही कचरा उचलण्याची प्रक्रिया असली तरी हा कचरा नमूद केलेल्या मापदंडानुसार आहे का नाही हे तपासणे आवश्यक असते. समजा एखादा वैयक्तिकरीत्या घर बांधत असेल आणि त्याच्याजवळ अशा स्वरूपाचा बांधकाम कचरा असेल तर तो आम्ही घेऊ शकत नाही. कारण अशा प्रकारच्या कचऱ्यात भेसळ आहे की नाही हे पाहणेदेखील गरजेचे असते. जसे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करताना काही ठरावीक मापदंड निश्चित केले असतात, तसेच काही आराखडे या प्रक्रियेसाठी देखील निश्चित केले आहेत.

या पेवर ब्लॉकचे खास वैशिष्टय़ असे की, ते नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केले असल्यामुळे वातावरणातील अतिरिक्त कार्बनडाय ऑक्साइड ते सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे या ब्लॉक्सचा जिथे जिथे वापर होतो तेथील हवा अधिक खेळती राहण्यास मदत होते.

या प्रकल्पाबाबतची विशेष आठवण सांगताना प्रकल्प साहाय्यक असलेल्या तेजश्री जोशी म्हणाल्या की, अलीकडेच या प्रक्लापाला भेट देण्यासाठी इस्रायलवरून एक खास पथक आले होते. कारण त्या देशातदेखील बांधकाम कचरा ही एक मोठी समस्या ठरत आहे. जर असा प्रकल्प आमच्या देशातदेखील सुरू करता आला तर तो या कचऱ्याच्या समस्येवर निश्चितच एक उपयुक्त तोडगा असेल, असे मत या पथकाने व्यक्त केले. यावरूनच हा प्रकल्प निव्वळ आपल्या देशातील समस्येवरच नाही, तर जागतिक स्तरावरील समस्येला पूरक असा तोडगा आहे, हे या निमित्ताने सिद्ध झाले.

या प्रकल्पासंदर्भात भेडसावणारी अडचण सांगताना मॅथ्यू म्हणाले की, आपल्याकडे कचऱ्यातून नवनिर्मिती केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे काहीशा सांशक नजरेने बघितले जाते. बाजारात मिळणाऱ्या इतर पेवर ब्लॉकपेक्षा आमच्या ब्लॉक्सचा दर्जा निश्चितच चांगला आहे. शिवाय किमतीतदेखील फारसा फरक नाही आहे. तेव्हा गरज आहे ती लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची. बांधकाम व्यावसायिकांनी जास्तीत जास्त अशा प्रकारच्या उत्पादनाचा वापर करावा, यासाठी आमच्या समूहातर्फे वेगवेगळ्या स्तरांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्यात आíकटेक्चर, इंटेरिअर डिझायनर्स यांना या उत्पादनाच्या उपयुक्ततेविषयीची माहिती दिली जाते.

– सुचित्रा प्रभुणे

suchup@gmail.com

First Published on March 31, 2018 12:49 am

Web Title: paver block making from waste recycling