नॉन आक्युपन्सी चार्जेस नियमापेक्षा जास्त लावले आहेत. संस्था हे चार्जेस आपल्या मर्जीप्रमाणे लावू शकते का?
एस. डी. सावंत, चेंबूर

याचे उत्तर नाही असेच आहे. संस्था आपल्या मनाप्रमाणे असे चार्जेस लावू शकत नाही. शासनाच्या निर्देशाप्रमाणेच ते लावावे लागतात, तसे न केल्यास ती गोष्ट बेकायदेशीर ठरेल व सभासदाला उपनिबंधक, दुय्यम निबंधक व सहकारी अथवा दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागता येईल.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

चुकीचे नॉन ऑक्युपन्सी चार्जेस लावल्यानंतर सोसायटीचे विभाजन झाले व दोन सोसायटय़ा स्थापन झाल्या. आत्ता ज्या सोसायटीमध्ये त्यांच्या सदनिकेचा समावेश होतो, ती सोसायटी ही पूर्वीच्या सोसायटीकडे व दोन्ही सोसायटय़ा एकमेकांकडे ही गोष्ट विचारा असा सल्ला देतात व सभासदांच्या हिशेबाचे अथवा लावलेल्या चार्जेसचे वर्गीकरण करून द्यायचे टाळतात, याला उपाय काय?

खरे तर अशी टोलवाटोलवी करण्याचे काहीएक कारण नाही. कारण संस्थेने लावलेल्या चार्जेसचे वर्गीकरण द्यायला संस्था बांधील आहेत. त्यासाठी सभासदांनी प्रथम उपनिबंधकांकडे दाद मागावी हे उत्तम. तिथे दाद न लागल्यास दुय्यम निबंधकांकडे दाद मागावी. तेथेही न्याय न मिळाल्यास सहकार न्यायालय अथवा दिवाणी न्यायालयात दाद मागावी. याबाबत संस्थेने कोणाही तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेणे इष्ट ठरेल.

काही सदनिकाधारकांची जागा म्हाडा ले आऊटनुसार जास्त आहे. नगरपालिका ओसीपेक्षा अधिक असणाऱ्या जागेवर विकासक रु. ६०००/- प्रति चौ.फूट भाव देत आहे. याला गृहनिर्माण संस्था अथवा गृहनिर्माण संस्थेचा एखादा सभासद काही आक्षेप घेऊ शकतो का?
-जयदीप पी. गायकवाड,
म्हाडा वसाहत, पोखरण रोड नं. २, ठाणे.

आपले सविस्तर पत्र व प्रश्न वाचला, परंतु त्यातून बिल्डरने कोणते कागदपत्र बनवलेले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते पाहिल्याशिवाय कोणतेही मतप्रदर्शन करणे धाडसाचे ठरेल. म्हणून आपण विकासक/बिल्डर संस्था व वैयक्तिक करारनामे यापैकी जी कागदपत्रे बनवली असतील, ती व गृहनिर्माण संस्थेने कोणते कोणते ठराव मंजूर केले आहेत, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. म्हणूनच आपण वर दर्शविलेली सर्व कागदपत्रे घेऊन कोणत्या तरी तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे उचित ठरेल.

माझ्या मालकीची ३ दुकाने आहेत. सलूनच्या व्यवसायासाठी मला १५०० ते २००० लिटर पाण्याची अतिरिक्त जरुरी आहे. ते बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणे शक्य नाही. त्यासाठी मी बोअरचे पाणी वापरायचे ठरवले. त्यासाठी मला ‘सॉफ्टनर’ वापरावा लागणार आहे. त्यासाठी संस्थेने परवानगी दिली आहे. हे पाणी साठवण्यासाठी मला पाण्याची टाकीसुद्धा बसवणे जरुरीचे आहे. या दोन्ही गोष्टी बसवण्यासाठी मी सव्‍‌र्हिस फ्लोअरवर जागा मागितली, तर ती मागणी संस्थेने नाकारली. म्हणून माझे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत- १)‘सव्‍‌र्हिस फ्लोअर’ ही सोसायटीची कॉमन प्लेस आहे का? २) सोसायटी केवळ बहुमताच्या जोरावर अशी परवानगी नाकारू शकते का? ३) सभासदाला जर सव्‍‌र्हिस फ्लोअर वापरायचा असेल तर सभासदाने कसा वापरावा.
-गजानन तिवरेकर, चेंबूर-मुंबई.

आपले प्रश्न वरवर जरी बिनतोड वाटत असले तरी प्रत्येक सदस्याने जर सव्‍‌र्हिस फ्लोअर वापरण्यासाठी परवानगी मागितली तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. म्हणूनच या बाबतीत पुढील गोष्टींची खात्री करून घेतल्याशिवाय उत्तर देणे धाडसाचे ठरेल? म्हणूनच आपण पुढील गोष्टींची खात्री करून घ्यावी. त्या अशा- १) याबाबत सोसायटीने काही ठराव मंजूर केले आहेत का? २) ‘सव्‍‌र्हिस फ्लोअर’ वापरण्यासाठी काही नियम गृहनिर्माण संस्थेने मंजूर केले आहेत का? ३) आपण संस्थेकडे अर्ज केला होतात त्याचा तपशील काय होता?
या सर्व गोष्टी जाणून घेतल्यावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. केवळ आकसाने नियमबाह्य़ रीतीने आपणाला सव्‍‌र्हिस फ्लोअर वापरण्यास नकार दिला असेल तर त्याविरुद्ध दाद मागता येईल. म्हणूनच वरील कागदपत्रे घेऊन एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे हे योग्य ठरेल.

गच्ची, गार्डन, पार्किंग या कॉमन प्लेस आहेत का?
– एक वाचक

होय. या कॉमन प्लेस म्हणूनच गणल्या जातात. त्यावर सोसायटीचा अधिकार असतो. मात्र सभासदाला त्याच्या विनंतीवरून यातील काही भाग अथवा संपूर्ण गच्ची, गार्डन, पार्किंग इ. वापरायला देऊ केली जाते. परंतु ती परवानगी कायमस्वरूपी वापरासाठी नसते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

टॅक्स कन्सल्टंट अ‍ॅण्ड लीगल अ‍ॅडव्हायजर्स
ब्लॉक नं. २ ए विंग, तळमजला, चंदन सोसायटी, कीर्तिकर कंपाऊंड, नूरी बाबा दर्गा रोड, मखमली तलावाजवळ ऑफ एल.बी.एस. रोड, ठाणे (प.) ४००६०१. दू. ०२२-२५४०३३२४ ghaisas2009@gmail.com