28 February 2021

News Flash

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान- विपणन आणि विक्री व्यवस्था

इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही सध्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागला

(संग्रहित छायाचित्र)

संदीप धुरत

सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचे असलेले क्षेत्र म्हणजे स्थावर मालमत्ता क्षेत्र. आधीच्या लेखांमध्ये आपण करोना काळामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्र कशा प्रकारे प्रभावित झाले याचा ऊहापोह केला आहे. कोविडनंतर सर्वात सुरक्षित अशा वातावरणात म्हणजेच आपल्या घरातून जर ग्राहक मालमत्ता खरेदी-विक्री करू शकत असेल तर ते स्वागतार्ह राहील.

इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच स्थावर मालमत्ता क्षेत्रालाही सध्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. बरेच गृहप्रकल्प रखडले. ग्राहकांचा ओघ आटला. अर्थातच बऱ्याच नोकऱ्यांवर परिणाम झाल्यामुळे ग्राहक खरेदी करण्यास अनुत्सुक आहेत. पण ही परिस्थिती पूर्णपणे  करोना काळातच निर्माण झाली असे नाही, तर त्या आधीसुद्धा कित्येक प्रकल्प बांधून तयार होते, पण विकले गेले नव्हते. बरेच ग्राहक हे घरांच्या किमती आणखी कमी होतील या आशेवर मालमत्ता खरेदीचा निर्णय पुढे ढकलत होते. याचा परिणाम बांधून विक्रीसाठी तयार अशा प्रकल्पांची संख्या वाढण्यात झाला. अपेक्षेइतकी विक्री नसल्यामुळे विकासकाचे पैसे प्रकल्पात अडकले गेले आणि या क्षेत्रावर मंदीचे सावट आले.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, मजुरांची अनुपलब्धता आणि सामाजिक अंतराच्या नियमांमुळे देशभरातील बांधकामांवर कडक बंदी घालण्यात आली होती. या काळातील बांधकाम बंदीचा भविष्यातील उपलब्ध पुरवठय़ावर परिणाम होऊ शकतो. २०२० ते २०२२ या कालावधीत वितरणासाठी नियोजित केलेल्या निवासी प्रकल्पांना विलंब होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, ग्राहकांची तयार मालमत्तेसाठी मागणी ही उशिराने मिळणाऱ्या निर्माणाधीन प्रकल्पांपेक्षा अधिक वेगाने वाढू शकते. कारण ग्राहक तयार ताबा असलेल्या मालमत्तेला जास्त प्राधान्य देतील.

एका अंदाजानुसार, देशभरातील १५०९ निवासी प्रकल्पांमध्ये ४.५८ लाख निर्माणाधीन घरे आहेत. उच्च किमतीचा भार कमी करण्यासाठी विकासकांनी कमी किमतीत निवासी प्रकल्प विकण्याची गरज असल्याचे मत वेळोवेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा वेळी बरेच गृहप्रकल्प कमी किमतीत विकण्याची तयारी दाखवत आहेत आणि घरे विक्रीविना ठेवण्यापेक्षा साधारण कमी दरात विकून कॅश फ्लो सुधारण्याकडे भर देत आहेत. बांधकाम व्यावसायिकांसाठी निधीचे दर आणि बांधकाम साहित्य यांची किंमत वाढल्याने विकासकासाठी बांधकामाचा खर्चही वाढतो. तथापि, बाजारपेठेची परिस्थिती आणि विक्री क्षमता लक्षात घेता भाववाढीची टक्केवारी ठरवण्याची जबाबदारी अंतिमत: विकासकावर आहे. अनेक विकासक अधिक व्याज खर्च टाळण्यासाठी उपलब्ध घरे लवकर विकण्याचा प्रयत्न करण्यासाठी सवलती आणि इतर ऑफर्स देत आहेत. सध्या अनलॉकिंगनंतर जरी ग्राहक नवीन मालमत्ता विकत घेण्यात रस दाखवत असले तरी स्थावर मालमत्ता बाजारात म्हणावा तितका उत्साह नाही. याची बरीच कारणे असली तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्याची विक्री व्यवस्था! या क्षेत्रामधील विक्री व्यवस्था ही पूर्वापार चालत आलेली अशीच अजूनही असल्याने जितके आवश्यक बदल व्हायला हवे होते ते दिसत नाहीत. ग्राहक बदलला तरी जुनेच विक्री तंत्र, तेच फोटो आणि त्याच प्रकारची संथ विक्री व्यवस्था. याचा परिणाम हा थेट ग्राहकांच्या निर्णय क्षमतेवर होतो. एखादा ग्राहक एखाद्या प्रोजेक्टविषयी माहिती घेण्यास आल्यावर- ‘या प्रोजेक्टमध्ये थोडेसे ऑप्शन्स शिल्लक आहेत.’, ‘२-३ दिवसांनी दर वाढणार आहेत.’, ‘आजच ४-५ ग्राहक टोकन रक्कम देऊन गेले.’.. अशा छापाची उत्तरे मिळतात. त्याने ग्राहक दुसरा पर्याय शोधतो आणि विकासकाचा एक ग्राहक कमी होऊन नुकसान होते.  स्थावर मालमत्ता विक्री व्यवस्था ही पुढील ४ घटकांवर आधारित आहे-

१. योग्य किंमत (Right price)

२. योग्य जागा (Right location)

३. योग्य विक्री प्रक्रिया (Right process)

४. योग्य लोक (Right people)

यासोबत मालमत्ता ही Affordable , Adaptable आणि Accessible  असणे गरजेचे आहे.

सध्या कशावर जास्त बंधन असेल तर ते आपल्या मुक्तसंचारावर आहे. या काळात पूर्वीप्रमाणे हवे तिथे आणि हवे त्या प्रवास साधनाने जाणे शक्य होणार नाही. आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रावर  मुख्य परिणाम याच गोष्टीचा होणार आहे. साईटला भेट करणे आता कमी होणार आहे. अशा वेळी उपाय म्हणजे ऑनलाइन मार्गाने प्रकल्प माहिती देणे. त्याचा योग्य वापर कसा करावा हे पुढे नमूद केले आहे.

या परिस्थितीत मोबाइल अ‍ॅप आधारित विक्री व्यवस्था असणे सर्वाधिक सुयोग्य ठरेल. ग्राहक आपल्या जागेवरून इच्छित मालमत्तेची खरेदी विक्री करू शकतील आणि विकासकांनाही कमी गुंतवणुकीत जास्त आणि खात्रीशीर व्यवसाय वृद्धीची खात्री मिळेल. KAGAAअ‍ॅप हे या प्रणालीचे एक उत्तम आणि एकमेव उदाहरण ठरू शकेल. आपण या आधी पाहिले की ऑनलाइन वेबसाईट या मुख्यत्वे अ‍ॅड लिस्टिंगव्यतिरिक्त जास्त काही करत नाहीत. ग्राहकाला सुयोग्य माहिती मिळणे कठीण होते आणि त्याचा परिणाम विक्रीवर होतो.

अशा वेळी KAGAA अ‍ॅपने GGAMIFICATION  तंत्राचा वापर करून एक नवीन विक्री व्यवस्था विकास केली आहे. इथे विकासकांना फक्त ग्राहकाची माहितीच मिळणार नाही तर विक्री प्रक्रियासुद्धा पूर्ण करता येईल. इतर अ‍ॅपमध्ये फक्त ग्राहकांची माहिती मिळते आणि त्यानंतर पुढचे सर्व विक्री व्यवस्थापन विकासकांना करावे लागते. त्या पुढे जाऊन KAGAA अ‍ॅपमध्ये विकासकाच्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती, अगदी ड्रोन शूट पर्यंत ग्राहकाला सहज उपलब्ध होते. यामुळे पहिल्याच ऑनलाइन भेटीमध्ये ग्राहकाला वास्तूविषयी भरपूर माहिती मिळते, ज्यामुळे विक्री यशस्वी होण्यास मदत होते. या अ‍ॅपमध्ये GPS प्रणालीमुळे प्रोजेक्टचे अचूक लोकेशन कळते, प्रोजेक्टपासून महत्त्वाची स्थळे जसे रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, शॉपिंग सेन्टर इत्यादी किती जवळ आहेत आणि मुख्य रस्त्यापासून प्रोजेक्ट किती दूर आहे याची खरी माहिती कळते. आभासी भेटीमुळे (Virtual Visit) प्रकल्पाची बांधणी आणि त्याची गुणवत्ता याचाही उत्तम अंदाज आपल्याला येतो. त्यामुळे खरेदी निर्णय प्रक्रिया सुलभ होते. KAGAA अ‍ॅपमुळे या सर्व महत्त्वाच्या बाबी ग्राहकांना सुलभरीत्या समजतात.

KAGAA अ‍ॅपवर ग्राहक एक ठरावीक रक्कम भरून एखादे घर बुक करू शकतात आणि त्याच वेळेस आणखी किती ग्राहक तेच घर घेण्यास उत्सुक आहेत हेसुद्धा पाहू शकतात. यामुळे प्रोजेक्टला किती मागणी आहे याची खरी माहिती मिळते आणि ग्राहक आपले खरेदी निर्णय पूर्ण करू शकतात. ग्राहक नोंदणी करताना आधार कार्ड माहितीप्रमाणे नोंदणी होते, त्यामुळे बनावट ग्राहक किंवा ग्राहक संख्या फुगवून दाखवणे असे प्रकार होऊ शकत नाहीत.  या सोबतच KAGAA अ‍ॅपमध्ये लॉटरी प्रणालीसुद्धा उपलब्ध असून त्याचा विकासक लाभ घेऊ शकतात. आणि फ्लॅश सेलही उपलब्ध आहे, ज्याद्वारे एखाद्या प्रोजेक्टची किंमत कमी करून ग्राहक आकर्षित करता येऊ शकतात- मर्यादित काळासाठी ही ऑफर असू शकते, त्यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो.  मुळात ग्राहकांसाठी हे एक प्रामाणिक स्थावर मालमत्ता खरेदीचे स्थान ठरू शकते. ग्राहक आणि विकासक https://www.kagaay.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. अशा प्रकारे विविध आणि सुलभ विक्री व्यवस्था वापरून आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून स्थावर मालमत्ता क्षेत्राला आपण पुन्हा उभारी देऊ शकतो. त्यासाठी ग्राहक आणि विक्री व्यवस्था यामध्ये विश्वास आणि सहभाग आवश्यक आहे.

sdhurat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 12:42 am

Web Title: real estate technology marketing and sales management abn 97
Next Stories
1 स्थावर मालमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान- विपणन आणि विक्री व्यवस्था
2 मुद्रांक शुल्क कपातीचा लाभ डिसेंबरअखेर पर्यंतच!
3 सदनिका गहाण टाकताना..
Just Now!
X