सागर नरेकर

मुंबई, उपनगरे त्यातही पश्चिमेतील शहरांमध्ये राहणे आता सर्वसामान्य नोकरदारांना परवडण्यासारखे नाही. त्यात मध्य रेल्वे मार्गावरील शहरेही महागडी झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नोकरदारांनी आपला मोर्चा कल्याणच्या पुढील परिसराकडे वळविला आहे. अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहराचा त्यात मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत येथे उपलब्ध झालेल्या सुविधा, प्राथमिक सुविधांसह पाणी, रस्ते, नवनवीन प्रकल्प यांमुळे बदलापूर शहर येथे स्थायिक होऊ  इच्छिणाऱ्या नोकरदारांच्या पसंतीस उतरत आहे. बदलापूर शहराचे भौगोलिक स्थानही वैशिष्टय़पूर्ण आहे. शहराच्या पश्चिमेला सह्य़ाद्रीची डोंगररांग तर दुसरीकडे उल्हास नदी. एका बाजूला मुंबईची उपनगरे तर दुसरीकडे निसर्गसंपन्न माथेरानचा डोंगर. यामुळे शहरात राहण्याचा एक वेगळाच अनुभव येतो.

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
Navi Mumbai parking problem
नवी मुंबई : वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्या अधिक जटील

कल्याणपुढील शहरे म्हटली की मध्य मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या अंगावर काटा येतो. एक तासाचा प्रवास, ट्रेनची गर्दी असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतात. मात्र या थोडक्या त्रासानंतर एक वेगळ्या प्रकारचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस अनुभवास येतो. बदलापूर शहराची लोकसंख्या २००५ सालानंतर झपाटय़ाने वाढते आहे. ऐन पुराच्या काळातही शहर अवघ्या एका दिवसात उभे राहिले. त्यामुळे या शहराची सुरक्षिततेची भावना सर्वदूर पोहोचली. आज बदलापूर शहराची सर्वात मोठी ओळख असलेले निसर्ग पूर्वीपेक्षा अधिक बहरले आहे. नुकत्याच वन विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार बदलापूर शहराच्या आसपास आणि बारवीच्या जंगलातील प्राणी संपदा वाढलेली आहे. याचाच अर्थ बदलापूरच्या आसपासचे जंगल बहरते आहे. त्यामुळेच येथे वनातील प्राणी संपदा आणि निसर्गचR  सुधारले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात झालेले वृक्षारोपण, आसपास वाढलेले जंगल यामुळे शहराचे वातावरण थंड राहण्यास मदत होते आहे. तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडते आहे. मोठय़ा शहरांमध्ये पाहायला न मिळणाऱ्या चिमण्या या बदलापुरात सर्रास पाहायला मिळतात. शुद्ध हवेचे हे द्योतक असल्याचे मानले जाते. त्यातच शहरातील उद्यानांची आणि तलावांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे शहरात आणि शहराच्या आसपासही अनेक प्रेक्षणीय स्थळे काही तासांच्या आणि दिवसाच्या पर्यटनासाठी चांगला पर्याय आहेत.

बदलापूर शहरातील रस्ते हे गेल्या काही वर्षांतील चर्चेचा विषय ठरले आहेत. शहरातील ३४ हून अधिक महत्त्वाचे रस्ते, एक महामार्ग, प्रभागातील रस्ते असे सर्वच काँक्रीटचे बनवले जात आहेत. राज्यात सर्वाधिक काँक्रीटचे रस्ते असलेले शहर म्हणून येत्या काळात बदलापूर शहर नावारूपाला येईल, असा विश्वास स्थानिक आमदार किसन कथोरे व्यक्त करतात. इतकेच नव्हे तर शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्तेही येथे काँक्रीटचे होत आहेत. त्यामुळे दळणवळण सुकर झाले आहे. यात स्थानिक पालिकेसह एमएमआरडीएच्या निधीचा मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत एमएमआरडीएच्या क्षेत्रात बदलापूरचा समावेश झाल्याने याकडे या प्राधिकरणाने विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सोपे झाले आहे.

शहराच्या विकासात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे पाणी. बदलापूर शहर पाण्याच्या बाबत स्वयंपूर्ण आहे. शेजारील जिल्ह्य़ातील आंदर धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. दररोज ४० हून अधिक एमएलडी पाणी शहराला पुरवण्यात येते. उल्हास नदीवरील बॅरेज येथे यावर प्रक्रिया करून ते पाणी शहराला देण्यात येते. तसेच शहराच्या वेशीवर असलेले भोज धरणही शहराला पाणीपुरवठय़ासाठी सज्ज आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत शहर संपन्न आहे.

राज्यातील आणि विशेषत: मुंबई उपनगरातील सांस्कृतिक शहरांमध्ये डोंबिवलीनंतर बदलापूर शहर समोर येते आहे. नववर्ष स्वागत यात्रा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिकांची शहरातील रेलचेल, ग्रंथसखा वाचनालयाच्या माध्यमातून होणारे साहित्यमंथन, चित्रपट आणि मालिकांमधील शहरातील कलाकारांचा सहभाग आणि इतर कलाकारांची शहरातील भेटी यामुळे शहर या दृष्टीने एका वेगळ्या उंचीवर गेले आहे. येत्या काही वर्षांत बदलापुरात नाटय़गृह साकारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. जागेचा निर्णय होऊन येत्या दोन वर्षांत शहरवासीयांना नाटय़गृह मिळणार याबाबत शंका नाही.

vasturang@expressindia.com