आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून नसíगक पाणी उपयोगात आणण्यासाठी विहिरींचा पर्याय कायम महत्त्वाचा मानला असल्याचे दिसते. अर्थशास्त्रातही दर दहा घरांमागे एका विहिरीचा दंडक कौटिल्याने घातलेला आहे. तसेच शहरात घुसखोरी झालीच, तर राष्ट्राचा घात करणाऱ्या टोळ्यांना घालवून द्यावे, किमानपक्षी त्यांना कोणत्याही सवलती न देता सर्व कर त्यांच्यावर लादावेत, असेही कौटिल्याने सांगितले आहे.
आ मच्या सगळ्या समस्यांच्या बाबतीत आज आम्ही सरकार काही करत नाही, असा तक्रारीचा सूर काढत असतो. पण प्राचीन काळी प्रजा प्रत्येक गोष्टीत शासनावर अवलंबून नव्हती. प्रजेच्या सहकार्याने शासन काही गोष्टी करत होते. नवीन गावात शेती, उद्योगधंदे चालू करायचे म्हणजे ‘जीवना’चा विचार प्रथम करणे गरजेचे आहे. कारण जल हे मूलभूत गरजांच्या क्रमवारीतील पहिले आहे. अशा परिस्थितीत नदी, झरे असे पाण्याचे जलस्रोत असतील त्यांना प्रथम बंधारे घालावेत. यातील काही बंधारे सर्वानी मिळून बांधण्याची सहकारी पद्धत असावी असे ‘सहोदकमाहार्योदकं वा सेतुं बन्धयेत्’ या वाक्यावरून स्पष्टपणे दिसते. सहकाराची कल्पना छान वाटते, पण काळ कोणताही असला तरी माणसाच्या वृत्तींमध्ये फार फरक पडत नाही. कामात आळस, कामचुकारपणा करणारी माणसं त्याही काळी होती. म्हणूनच कामचुकारपणा करणाऱ्या लोकांची गडीमाणसं व बल वेठीस धरावेत व सेतूचा त्यांच्या हिश्शाचा लाभ त्यांना देऊ नये, अशा प्रकारची सूचना अर्थशास्त्रात सापडते.
आपल्याकडे अतिप्राचीन काळापासून नसíगक पाणी उपयोगात आणण्यासाठी विहिरींचा पर्याय कायम महत्त्वाचा मानला असल्याचे दिसते. अर्थशास्त्रातही दर दहा घरांमागे एका विहिरीचा दंडक कौटिल्याने घातलेला आहे. मध्यंतरी गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा योग आला असता तेथे अजूनही प्रत्येक घरात स्वत:ची एक छोटी विहीर असल्याचे पाहिले होते.
नवीन नगराच्या निर्माणाच्या वेळी लोकसंख्येची मर्यादा शंभर ते पाचशे अशी आधीच सांगितली आहे. नाहीतर जुन्या नगरात लोकसंख्यावाढ झाल्यामुळे नवीन नगर वसवताना मर्यादा घातल्या नाहीत तर पुन्हा त्याच समस्यांना तोंड द्यावे लागेल. शिवाय नवीन गावात लोकसंख्येची माहिती असली म्हणजे तेथे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचाही नीट विचार करता येईल, असा विचार यामागे असावा असे वाटते.
नगर हे काही गावांचे मिळून असते. या गावांच्या हद्दींमध्ये एक ‘गोरूत’ म्हणजे एक कोस अंतर असावे. दोन गावांतील अंतर यापेक्षा जास्त असू नये. कारण कौटिल्याच्या मते, गावांच्या संरक्षणाची वेळ आल्यास ही गावे एकमेकांचे रक्षण करू शकतील. त्या गावांच्या सीमा दर्शवणाऱ्या काही गोष्टी निश्चित करण्यास सांगितले आहे. आज लोकसंख्येचा स्फोट झाल्यामुळे दोन गावांच्या वेगळ्या हद्दी दिसतच नाहीत. एक गाव संपतो कधी आणि दुसरा चालू होतो कधी, ते लक्षातसुद्धा येत नाही.
गाव, नगर, शहर, तालुका, जिल्हा असे उत्तरोत्तर वाढत जाणारे लोकवस्तीचे प्रकार असतात. अर्थशास्त्रातही असेच चित्र दिसते. तेथे दहा गावांचा एक ‘संग्रहण’, दोनशे गावांचा एक ‘कार्वटिक’, चारशे गावांचा एक ‘द्रोणमुख’, आठशे गावांचा एक ‘स्थानीय’ अशी विभागणी दिसून येते. गावांच्या सरहद्दीवर गावात प्रवेश करण्याच्या ठिकाणी किल्ले बांधावेत. हे अंत:पालाच्या अधिपत्याखाली असावेत. पुढील काळात देवडी म्हणून ओळखले जाणारे हेच किल्ले असावेत.  
‘आपला गाव ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे’ अशासारख्या घोषणा आपण करतो आणि कचरा वगरे टाकून आपली ही संपत्ती घाण करतो. माणसाची प्रवृत्ती पाहता राष्ट्रीय संपत्ती आहे असे केवळ भावनिक आवाहन पुरेसे नसते. त्यानुसार आचरण न केल्यास कठोर दंड असेल तरच तिचे जतन होते, हे सत्य जाणून कौटिल्याने अशा गुन्ह्यांविरुद्ध दंड सांगितलेले आहेत.
१.    रस्त्यावर केरकचरा टाकल्यास एकअष्टमांश पण दंड.
२.    चिखलाच्या पाण्याने रस्ता घाण केल्यास पाव पण दंड.
३.    हेच गुन्हे राजमार्गावर केल्यास हाच दंड दुप्पट.
४.    पवित्र स्थान, जलाशय, देऊळ व राजाच्या इमारती या ठिकाणी मलोत्सर्ग केल्यास अनुक्रमे १,२,३ व ४ पण दंड.
५.    वरील ठिकाणी मूत्रोत्सर्ग केल्यास वरील दंडाच्या निम्मा दंड.
६.    मेलेले मांजर, कुत्रा, मुंगूस, किंवा साप शहरात टाकल्यास तीन पण दंड.
७.    गाढव, उंट, घोडा, खेचर टाकल्यास सहा पण
८.    मनुष्याचे प्रेत टाकल्यास पन्नास पण
नगरसुरक्षा
पूर्वी ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि सरतेशेवटी संन्यास अशी आश्रमव्यवस्था होती. नवीन नगरात आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावरील लोक असणार. यातील जनपदात जन्मलेल्या लोकांतील वानप्रस्थी सोडून इतर संन्यासी किंवा काही हेतूने करार करून स्थापलेल्या संस्थेतील लोकांना वस्ती करू देऊ नये, असा नियम नवीन जनपदाच्या संदर्भात अर्थशास्त्रात येतो. जनपदात जन्मलेल्या लोकांव्यतिरिक्त असे म्हटल्यामुळे बाहेरच्या राष्ट्रातून येऊ पहाणाऱ्यांना पहिल्यापासून अटकाव केल्याचे दिसते. शिवाय वानप्रस्थ आणि सन्यास हे तसे पाहता शेवटचे आश्रम. म्हणजे कर्मत्याग करून भिक्षेवर जगणाऱ्या लोकांची संख्या अधिक. अशा दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्यांचा लोंढा बाहेरून आल्यास त्याचा ताण अर्थातच विकसनशील नगरावर पडणार, हे योग्य नाही. याशिवाय या बाहेरून आलेल्या वानप्रस्थी आणि सन्यासी लोकांचं कूळ आणि मूळ आजच्या भाषेत सांगायचं तर ५ी१्रऋ्रूं३्रल्ल ऋ ंल्ल३ीूीीिल्ल३ शोधता येणार नाही. या लोकांची विश्वासार्हता काय द्यावी? पर्यायाने या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे त्या राष्ट्राची सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता असते, अशा समस्येला आज आपण नित्य तोंड देत आहोत. या पाश्र्वभूमीवर ही सूचना महत्त्वाची वाटते.
याउपर जर घुसखोरी झालीच तर राष्ट्राचा घात करणाऱ्या टोळ्यांना घालवून द्यावे, किमानपक्षी त्यांना कोणत्याही सवलती न देता सर्व कर त्यांच्यावर लादावेत असे स्पष्टपणे सांगितले आहे.   
कौटिल्य नवीन जनपदात उद्याने व विहारांसाठी जागा ठेवण्याच्या ठाम विरोधात आहे. इतकेच नव्हे तर नट, नर्तक, गायक, वादक, कथाकार, कुशीलव यांनी कामात विघ्न आणू नये यासाठी त्यांना गावात आश्रय नसावा. हे लोक नसले म्हणजे गावातील माणसे शेतीच्या कामात गढून जातील आणि महसूल वाढेल, ही त्यामागची भूमिका. नुकतेच अलेक्झ्ॉंडरचे आक्रमण येऊन गेले होते. अशा वातावरणात लोक चन आणि विलासात रमलेले असणं परवडणार नाही म्हणून ही सूचना कौटिल्याने केली असावी.
कौटिल्याने गावात चन व विलासाला वाव ठेवला नव्हता. पण गावाच्या सुव्यवस्थेत आणि सुरक्षेत कोणतीही कसूर राहू दिली नव्हती.
जनपदात ‘खात’ म्हणजे गटारे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौजकूप, स्नानगृह, अग्नी, विष यांपासून रक्षणाची व्यवस्था अशा सर्व सोयींनी युक्त अशी  कोशगृह, पण्यगृह, कोष्ठागार, कुप्यगृह, शस्त्रागार आणि बंधनागार(तुरुंग) अशी वेगवेगळी आगारे असावीत. प्रत्येक आगाराच्या विशेषानुसार काही खास व्यवस्था मुद्दाम सांगितली आहे. उदा. कोष्ठागार म्हणजे कोठाराच्या बाहेर पाऊस मोजण्यासाठी कुंडाची योजना असावी. शिवाय तिथे अन्नाची साठवण करायची असल्याने पाणी येऊ नये याविषयी योग्य काळजी घेण्यास सांगितले आहे. ही कोठारे तीन-तीन मजली असल्याने तिथे अन्न ठेवण्या-काढण्यासाठी जिन्याची व्यवस्था असून ते यंत्राने सोडघाल करण्याचे होते. तर बंधनागारात स्त्री व पुरुष कैद्यांसाठी वेगळ्या खोल्या सांगितल्या आहेत.
यातील कोशगृहाविषयी एक महत्त्वाची सूचना येते – ‘जनपदान्ते ध्रुवनिधिमापदर्थमभित्यक्तै: कारयेत्’ (२.५.३-४) म्हणजे संकट काळासाठी वेगळ्या कोषाची व्यवस्था असावी असे सूत्र आहे. पूर्वी बँका नव्हत्या. मग धनसंचयाची काहीतरी सोय करणे गरजेचे असे. ती सोय कशी करावी ते या सूत्रात सांगितले आहे. त्याचा अर्थ जनपदाच्या वेशीवर संकटकाळी उपयोगी पडावा म्हणून एक कायमचा निधी वधाची शिक्षा झालेल्यांकडून गुप्त जागी ठेवून घ्यावा. वधाची शिक्षा
झालेली असल्यामुळे त्यांचा इतरांशी संबंध येणार नाही
व त्यांचा मृत्यू लगेचच होणार असल्याने ते ठिकाणही गुप्त राहील अशी योजना यात दिसून येते.
थोडक्यात, नगर केवळ उत्तम इमारतींनी पूर्ण होत नाही.
त्याची सुरक्षा व सुव्यवस्था ह्या साऱ्या गोष्टींचा विचार
राज्यकर्त्यांनी केला पाहिजे, यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे कौटिल्याने सांगितली आहेत.