सीमा पुराणिक

‘वास्तुसंवाद’ या लेखमालेतील मागील लेखात संवाद, चर्चा हे विचारही नवनवीन संकल्पना निर्माण करण्यास मदत करतात हे आपण पाहिले. तसेच संकल्पनांचे वर्गीकरण कसे होऊ शकते हेदेखील लक्षात घेतले.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

जेव्हा एखाद्या विशिष्ट संकल्पनेला (Concept) अनुसरून अंतर्गत रचना केली जाते, तेव्हा तेथे राहणाऱ्या व्यक्तींची, कुटुंबाची आवड, संस्कृती, परंपरा त्या रचनेतून प्रतीत होतात. किंबहुना उलटपक्षी, अगदी दहा बाय दहाच्या एका खोलीची अंतर्गत रचना पाहून तेथे राहणाऱ्या व्यक्तीची आवड, व्यक्तिमत्त्व लक्षात येऊ शकतात. ती व्यक्ती कोणत्या प्रादेशिक विभागातील आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला कार्यालयीन ठिकाणीही येतो. कार्यालयातील अंतर्गत रचना आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन आपल्याला त्या कंपनीतील कार्यालयीन संस्कृतीचा, मूलतत्त्वांचा आणि मानवी सुखसंवादांचा अंदाज येतो.

ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीच्या मालकाचे व्यक्तिमत्त्व त्या कंपनीची संस्कृती घडवते, तद्वत त्या कंपनीची अंतर्गत रचना त्या कंपनीची कार्य संस्कृती, मूल्ये प्रतीत करतात.

कोणत्याही कार्यालयीन अंतर्गत रचनेचा विचार करताना त्या कंपनीचे, संस्थेचे नाव, तेथील उत्पादने आणि सेवा, त्याचप्रमाणे त्या कंपनीचा दृष्टिकोन आणि कार्यकारणभाव (Vision and Mission) हे सर्व लक्षात घेतले जाते. त्या कंपनीची उत्पादने किंवा सेवा या संदर्भानुसार त्या विषयाला अनुसरून अंतर्गत रचनेमागील संकल्पना असली तर निश्चितच ती कंपनी किंवा संस्था एक उत्साहवर्धक रूप घेऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यास नव्याने सज्ज होते. त्याचप्रमाणे संस्थात्मक संरचना (Organisational Structure) जाणून घेऊन कर्मचाऱ्यांना कामासाठी दिली जाणारी जागा आणि सोयी (Comfort) निश्चित केल्या जातात. कामाच्या वेळा, सत्र (Shifts), कामाचा प्रकार (Type of Work), कामाची गती (Work-Flow), आंतरविभागीय कामकाज (Interdepartmental Interactions) अशा सर्व गोष्टींचा सखोल विचार रचनात्मक संकल्पना प्रत्यक्षात आणताना करावा लागतो. म्हणूनच अंतर्गत रचना ही या दृष्टीने उपयोजित कला (Applied Art) प्रकारात गणली जाते. नाहीतर स्वप्नातल्या कळ्या कशा काय उमलणार? अंतर्गत रचनाकार ज्या संकल्पनेचा विचार करतो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक ज्ञान रचनाकाराला असणे अत्यंत आवश्यक असते.

अशाच प्रकारे एका आध्यात्मिक संकल्पनेवर (Spiritual Concept) आधारित नुकतीच प्रत्यक्षात आणलेली कार्यालयीन अंतर्गत रचना (Office Interior Design) येथे उल्लेखित करण्यास मला नक्कीच आनंद होत आहे.

सदर कार्यालय हे ‘आत्मदर्शन’ या कंपनीचे असून ही एक आध्यात्मिक यात्रा कंपनी (Spiritual Tourism Company) आहे. आणि म्हणूनच ‘गुरुतत्त्व’ ही  संकल्पना अंतर्गत रचनेत समाविष्ट करण्याचा हा एक प्रयत्न.

Atmadarshan…

To  recognise  ourselves…

May the Universe guide us

Into a Divine Journey to understand

Atmatatva, Gurutatva and

Aanvikshiki – The Art of  Thinking…

Let our Soul get Enlightened

As we walk  through this

Inner Spiritual Path…

..अशा प्रकारे मुख्य दरवाजातून आत आल्यावर समोरच ग्लास-वर्कमध्ये मूळ संकल्पना शब्दांच्या माध्यमातून मांडली आहे. विशेष उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे ‘गुरुतत्त्व’ ही  संकल्पना  स्पष्ट करणारे बहुतांशी काम हे कार्यालयाच्या छताच्या (False- Ceiling) डिझाइनमध्ये बसविले आहे. आणि बाकी सर्व फर्निचर किंवा अंतर्गत रचना ही आधुनिक (Modern or Contemporary) या प्रकारात गणली जाते. असे करताना मुख्य उद्देश होता की तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयींमध्ये (Comforts) कुठेही बाधा येऊ नये. परंतु आध्यात्मिक संकल्पनेचा प्रभाव निर्माण व्हावा. प्रवेश कक्षातील (Entrance – Lobby) छतावर साकारलेल्या पणतीची तेजोमयी ज्योत आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाची आठवण करून देते. आणि त्यानंतर हा प्रकाशझोत आपल्याला कर्मयोगाकडे घेऊन जातो. ‘योग: कर्मसु कौशलम्’ असा हा कर्मयोग कर्मचाऱ्यांची कामाप्रति निष्ठा आणि गती वाढविण्यासाठी उद्युक्त करतो.

बाजूलाच असलेल्या विचारविनिमय कक्षातील (Conference Room) छतावर साकारलेला ओंकार चर्चा – विचार आणि संवादांना शांततेची जोड देण्यास सुचवतो. ज्ञानयोग आणि भक्तियोगाची प्रेरणा देणारा ओंकार नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

७०० स्क्वेअर फूट इतक्या कार्पेट एरियात प्रत्यक्षात आणलेल्या या कार्यालयात जागेचा पुरेपूर वापर केलेला आढळेल. त्याचप्रमाणे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक फायदा होईल अशा प्रकारे अंतर्गत रचना केलेली लक्षात येईल. केंद्रीय कक्षाच्या छतावरील अलंकारिक आकार आणि प्रकाशयोजना ही ‘आत्म-दर्शन’ या कंपनीच्या नावाला सार्थ ठरवतात. (Enlightenment of  Soul)

या कार्यालयात एकूण तीन केबिन्स आहेत. मोठी केबिन ही मुख्य संचालकांची असून, बाकीच्या दोन केबिन्स या अन्य दोन संचालकांच्या आहेत. ६’ ७  ८’ या आकाराच्या एका केबिनमध्ये ‘पद्म’ ही संकल्पना दर्शविली आहे. येथील पेटल इफेक्ट्स असलेला वॉलपेपर, फाल्स-सिलिंगचे डिझाइन आणि भरतनाटय़म् या नृत्यशैलीतील पद्ममुद्रा असलेली वॉल म्युरल्स आपल्याला पुन्हा एकदा गुरुतत्त्वाकडेच नेतात.

दुसऱ्या केबिनमधील गोपुरम ही संकल्पना म्हणजे दक्षिण भारतातील मंदिर संस्कृतीची प्रतीकात्मकता.. येथे छताला गोपुरांचा आकार देताना आधुनिकतेची जोड (Contemporary Look) आहे. स्टोन वॉलचा परिणाम साधणारा वॉल पेपर आणि दर्शनी भागात असलेली रामेश्वरम् मंदिराची प्रतिमा या छोटय़ाशा केबिनला जिवंतपणा आणण्यासाठी खूपच मदत करतात.

या कार्यालयातील मुख्य संचालकांची केबिन मात्र राज्यकारभाराची सप्तांगे सांगणाऱ्या कौटिल्यांच्या अर्थात चाणक्यांच्या राज-ऋषी या संकल्पनेवर आधारित असून आपल्याला पुनश्च गुरुतत्त्वाकडेच घेऊन जाते. (या कंपनीचे मुख्य संचालक हे कौटिल्यीय अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि तत्त्वज्ञ आहेत.)

राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड, मित्र ही राज्याची सप्तांगे बुद्धिबळाच्या सात प्याद्यांच्या रेखाटनातून दाखविली आहेत. कोणतीही संस्था आणि तिचे अंतर्गत कामकाज हे एखाद्या राष्ट्राचे, राज्य कारभाराचे प्रतीकात्मक रूप असतेच असते.

बुद्धिबळातले काळे व पांढरे चौरस हे राजाचे आणि राज्य कारभाराचे प्रतीक आहेत, परंतु राज-ऋषी अर्थात ऋषीतुल्य तत्त्वे अंगिकारणारा राजा मात्र येथे पीत आणि केशरी रंगांच्या चौकडीवर राज्य करतो. पीत म्हणजे पिवळा रंग हा गुरुतत्त्व आणि केशरी रंग हा मांगल्य दर्शवतो. असा हा राजाचा राजऋषीकडे जाणारा प्रवास या केबिनच्या छतावरील त्रिमितीय चित्रात बांधण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी आयुष्याची गती एकाच अहंकाराच्या आसाभोवती फिरत असते व त्या त्या चक्रातून सुटका मिळवू शकतो तोच गुरुपदाला प्राप्त करतो.

आत्मदर्शन या कंपनीसाठी अमलात आणलेली ही आध्यात्मिक संकल्पना वस्तुत: युती अथवा संलयन (Fusion) या प्रकारात गणली जाते. नवनवीन संकल्पना निर्माण करणे पण जुन्या उच्चतम तत्त्वांची आस न सोडणे हे मानवी जीवनातील महत्त्वाचे मूल्य आपण जपले पाहिजे ना? संकल्पना निर्माण होतात तेव्हा रंगांची आणि प्रकाशाची उधळण करताना विचारांचा पाया भक्कम असेल आणि रचनेची गती व ताल सांभाळला जात असेल तर निर्माण होणारी कलाकृती नक्कीच उच्च प्रतीची ठरेल.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)