09 March 2021

News Flash

घरगुती सजावट

अनेकदा काही सुंदर रेशमी साडय़ा घडीवर विरतात अशावेळी त्या नेसता येत नाहीत, पण सजावटीसाठी मात्र नक्कीच वापरता येतात

संग्रहित छायाचित्र

श्री गणरायांच्या आगमनाची तयारी जिकडेतिकडे उत्साहात सुरू आहे. बरीचशी मंडळी अजूनही वर्क फ्रॉम होम करत असल्याने या उत्सवाच्या तयारीसाठी सारे कुटुंबच सज्ज झालेले आहे. मखरांची प्रदर्शने, सजावटीच्या सामानाने ओसंडून वाहणारे बाजार हे चित्र यंदा दिसले नसले तरी या वस्तूंची ऑनलाइन विक्री सुरू आहे. अनेक घरात मात्र बाहेरून काहीही आणायचे नाही, असे ध्येय ठेवत अनेक  कुटुंबांनी घरच्या घरीच सजावट करण्याचे निरनिराळे प्लॅन्स केले आहेत. घरातीलच साडय़ा, जुन्या ओढण्या वापरून अनेक घरे गणरायाच्या आगमनासाठी मखर सजवीत आहेत. जुनी वृत्तपत्रे, कागद यांचा वापर करून कागदापासून मखरे किंवा सजावट करण्याच्या अनेक कल्पना लढवल्या जात आहेत.

अनेकदा काही सुंदर रेशमी साडय़ा घडीवर विरतात अशावेळी त्या नेसता येत नाहीत, पण सजावटीसाठी मात्र नक्कीच वापरता येतात. या साडय़ांचा विरलेला भाग वगळून त्यांच्या सुंदर घडय़ा घालून त्या गणरायाच्या मागे लावता येतील अथवा या साडय़ांपासून घरच्या घरी सुंदर पडदेही तयार करता येऊ शकतात. हीच गोष्ट ओढण्यांची. अनेकदा पंजाबी सूट जुने होतात पण त्यावरच्या ओढण्या मात्र आपली झगमग टिकवून असतात. अशा ओढण्यांचाही मखरासाठी उपयोग करता येईल. काहीवेळा ओढण्यांना असलेल्या झिरमिळ्यांचा वापरही सजावटीसाठी करता येऊ शकतो. घरातील जुन्या दागदागिन्यांचा वापरही मखरासाठी केला जाऊ शकतो. काही जुने परंतु सुस्थितीतील कानातले अथवा हार कागदावर कल्पकतेने मांडून चिकटवल्यास एखादी कायमस्वरूपी टिकणारी रांगोळी अथवा नक्षीदार पीसही तयार होऊ शकतो.

आता आपण सारेच विविध वस्तू ऑनलाइन मागवत असतो. या वस्तू आपल्याकडे येताना त्यांची सुंदर वेष्टने, गुंडाळलेले रंगीबेरंगी कागद, वेगवेगळ्या आकारातील कागदाचे खोके ही येत असतात. या साऱ्या साहित्याचा वापर कल्पकतेने केल्यास घरच्या घरीच उत्तम सजावट करता येऊ शकते. या खोक्यांपासून वेगवेगळ्या मांडणी करून त्याचे मखर करता येऊ शकते. सजावटकार फे विक्रीलच्या भावना मिश्रा यांनी मखर करण्याची एक छान कल्पना सांगितली आहे. कार्डबोर्ड किं वा कोणताही जाड कागद, रंग, गोंद, कात्री, सुई-धागा आणि थोडीशी कल्पकता एवढय़ाच साहित्याच्या आधारे ही सजावट करणे शक्य आहे. सर्वप्रथम जाड कागदाचा खांबासारखा गोल आकार करून चिकटवून घ्या. उतरत्या क्रमाने कमी उंची असलेली अशी नळकांडी के ल्यानंतर आता त्याची मांडणी करून घ्या. आता या नळकांडय़ांचे खांबात रुपांतर करायचे आहे. तेव्हा हे खांब सजवायचे काम सुरूकरायचे.  त्यावर रंगकाम करता येईल किं वा तुमच्याकडे असलेले रंगीत कागद, झिरमिळ्या, मण्यांच्या माळा वगैरे गोष्टी त्यावर चिकटवून सजवता येईल. तयार झालेले हे कागदी खांब आपल्याला गणरायाच्या मूर्तीमागे लावायचेआहेत. पाठीमागे पाच किंवा तीन अशा विषम प्रमाणात तसेच डावी उजवीकडे एक एक अशाप्रकारे खांब लावल्यास आकर्षक दिसतील. हे खांब एकाजागी ठेवायचे कसे यासाठी मात्र थोडी आयडिया लढवावी लागेल. पाटावर किंवा अशाच कागदाच्या आडव्या खोक्यावर खांबाच्या आकाराची गोलाकार छिद्रे पाडून ते खांब यात रोवता येतील. हे खांब गोंद लावून पक्के करा. या खांबांची झक्कास मांडणी केलीत की झाली तयारी गणेशाच्या सजावटीची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:07 am

Web Title: vaturang article on home decor for the arrival of the ganaraya abn 97
Next Stories
1 उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास..
2 वाढीव बांधकाम ग्राहकांच्या पूर्वपरवानगीनेच
3 परवडणारी घरे!
Just Now!
X