चांगल्या दर्जाच्या बांधकामातील वस्तू, लाकडी वस्तूंचे फिटिंग आणि लेआउट पाइंटमध्ये भिंती आणि फ्लोरिंग हे प्रमुख घटक आहेत. यांच्या दुरुस्तीमध्ये ग्राहकांच्या घराच्या बाह्य़ आणि अंतर्गत अशा दोन्ही बाजू समान महत्त्वाच्या आहेत. याचा घराच्या किंवा अपार्टमेंटच्या बांधकामाच्या दर्जावर परिणाम होतो. बांधकाम करताना कुठली सामग्री वापरली आहे, यावर त्याची किती वेळा दुरुस्ती करावी लागेल हे ठरते. पाणी गळतीपासून संरक्षण आणि इलेक्ट्रिकल कामांना दुरुस्तीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य असले पाहिजे, यानंतर मग रंगकाम, प्लास्टर आणि प्लबिंग अशा क्रमाने कामे झाली पाहिजेत.

पाणीगळतीपासून संरक्षणाबाबतचा दृष्टिकोन अलीकडेच पिडिलाईटने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, बहुतांश लोकांना छतावरून किंवा गच्चीवरून होणाऱ्या पाणीगळतीची तातडीने दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे वाटते. शिवाय ओले राहणारे बाथरूम किंवा स्वयंपाकघरासारखे भागही पाणीगळतीपासून संरक्षित राहावेत असे अनेकांना वाटते. यामुळे पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाययोजना करतात असे लोकांना विचारले असता, सर्वेक्षणात सहभागी झालेले लोक छत किंवा गच्चीवरून होणाऱ्या पाणीगळतीनंतर केवळ बाथरूमलाच प्राधान्य देतात, स्वयंपाकघराला तितकेसे प्राधान्य देत नाहीत.

पाणीगळतीपासून बचाव करणे हे अत्यंत गरजेचे आहेच, असे असले तरीही उपाययोजनांपेक्षा प्रतिबंधात्मक काम करणे कधीही चांगलेच.

कुठल्या टप्प्यावर पाणीगळतीसाठी उपाययोजना केल्या यावर लोकांची मते-

  • जेव्हा मी झिरपणारे पाणी घरात पहिल्यांदा पाहिले तेव्हा : ३५%
  • जेव्हा मी पाणी झिरपणे वाढले आहे हे पाहिले तेव्हा : ४४%
  • जेव्हा मी प्लास्टरचे पापुद्रे निघतायत/पडतायत हे पाहिले तेव्हा : १६%
  • जेव्हा भिंतींवर भेगा पाहिल्या तेव्हा : ५%
  • पाणीगळतीनंतर काही गंभीर घडत नाही तोपर्यंत ६५ % लोकांनी दुरूस्तीसाठी काहीही हालचाल केली नाही. पाणीगळतीची शंका आल्याबरोबर केवळ ३५ टक्के लोकांनी तातडीने उपाययोजना केली.

विविध भागांमध्ये किती वेळा दुरुस्ती करावी लागली

  • गच्ची / टेरेस : प्रत्येक ३ वर्षांनंतर
  • बाहेरील भिंती : प्रत्येक ३ वर्षांनंतर
  • अंतर्गत भिंती : प्रत्येक ३ वर्षांनंतर
  • बिल्डिंगचे पिलर्स : प्रत्येक ४ वर्षांनंतर
  • पिलर्समधील रॉड्स : प्रत्येक ५ वर्षांनंतर
  • बाहेरील पाण्याच्या टाक्या : प्रत्येक २ वर्षांनंतर
  • लिफ्टजवळील भाग : प्रत्येक २ वर्षांनंतर

लॉबीचा भाग : प्रत्येक २ वर्षांनंतर पोडियम/पोर्च : प्रत्येक ३ वर्षांनंतरपार्किंगचा भाग / बेसमेंट : प्रत्येक ३ वर्षांनंतर प्रमुख गोष्टी.

सर्वसाधारणपणे प्रत्येक तीन वर्षांनंतर को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटय़ांमध्ये देखभाल करवून घेतली जाते. जास्तीत जास्त दुरुस्ती बाहेरील पाण्याच्या टाक्या, मग गच्ची/टेरेसवर केली जाते.  प्रत्येक दोन वर्षांनंतर पाण्याच्या टाक्यांची देखभाल केली जाते आणि प्रत्येकी तीन वर्षांनंतर गच्ची/टेरेसची देखभाल होते.

प्रत्येक तीन वर्षांनंतर बाह्य आणि अंतर्गत भिंतींची अगदी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत देखभाल केली जाते. को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटय़ांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे वॉरंटीचे व्यवस्थापन केले जाते कारण त्यांचे बजेट बरेच असते आणि पाणीगळतीच्या योग्य पद्धती त्यांना वापरता येतात.

मोसमात पाणीगळतीसाठी कधी उपाययोजना केल्या जातात.

  • पावसाळ्याच्या आधी : ५१%
  • पावसाळ्यादरम्यान : १७%
  • पावसाळ्यानंतर : ३२%
  • सर्वेक्षणात पावसाळा सुरू होताना ५१% लोक पाणीगळतीसाठी उपाययोजना करून घेतात असा दावा करतात.
  • उर्वरित ४९% लोक उपाययोजना करण्याआधी प्रश्न सुटायची वाट पाहतात.

मान्सून सुरू झाला की ओल्या मातीचा सुंदर गंध येतो आणि सगळीकडे हिरवळ पसरू लागते. परंतु त्यामुळे ओल्या भिंती, सीलिंग व भिंतींमध्ये तडे असे परिणाम झाले की मान्सूनमुळे घरमालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. या स्थितीमुळे ओलावा व तडय़ांमुळे फंगस, बुरशी वाढीस लागत असल्याने घरातील माणसांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ  शकतो. घर आरोग्य व राहण्याच्या दृष्टीने अयोग्य होते. यामुळे अ‍ॅलर्जी, अस्थमा, डोळे-नाक-घशामध्ये खवखव, सायनसचा त्रास आणि ब्राँकाटिससारखे श्वसनाचे अन्य विकार होऊ  शकतात. परंतु थोडी काळजी घेतली तर हे प्रश्न टाळता येऊ  शकतात. उदाहरणार्थ, सांडपाण्याच्या व्यवस्थेमधील अडथळे दूर करून स्वच्छता राखल्यास पाणी साचण्याची समस्या उरणार नाही.

याविषयी डॉ. संजय बहादूर म्हणाले की, गळतीमुळे घराचे रूप तर बदलतेच, पण फर्निचर व फर्निशिंग हे बाभागही खराब होतात. पोपडे उडालेला रंग आणि भिंती व सीलिंगवरील पाणीगळतीच्या खुणा यामुळे मान्सूननंतर हे परिणाम अधिक तीव्र होतात. साधारणत: असे चित्र दिसू लागले की घरमालक गळक्या भिंती आणि ओले डाग काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतात, कारण पोपडे गेलेला रंग, गळके छप्पर आणि ओलाव्याची दरुगधी यामुळे चारचौघांमध्ये अपमानास्पद वाटते.

पाणी अजिबात गळणार नाही, यासाठी सांडपाण्याचे तुटके पाइप बदलणे किंवा दुरुस्त करणे, अशी काळजी घेऊन हे टाळता येऊ  शकते. तुटलेले सर्व प्लास्टर आणि तडे दुरुस्त केले जावेत आणि बदलले जावेत. टेरेस आणि भिंतींवर उगवलेले अनावश्यक तण व रोपे काढून टाकावीत आणि मॉर्टरचा वापर करून पृष्ठभागाची दुरुस्ती करावी. बाथरुममधील लाद्यांमधील फटी बुजवाव्यात आणि त्यासाठी दर्जेदार रॉफ टाइल मेट इपॉक्सीचा वापर करावा. सीलंट्सचा वापर करून खिडक्यांतील फटी बुजवाव्यात.

संभाव्य गळती आणि ओलाव्याबाबत तज्ज्ञांकडून तुमच्या घराची तपासणी करून घ्यावी. मान्सून सुरू होण्यापूर्वीचा काळ वॉटरप्रूफिंग करून घेण्यासाठी अतिशय योग्य असतो. यामुळे पावसापासून तुमच्या घराचे रक्षण होतेच, शिवाय नेहमी कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा खर्च आणि त्रास वाचवला जातो. उपचारापेक्षा सावधगिरी केव्हाही उत्तम आणि इमारत उभी राहत असतानाच वॉटरप्रूफ्रिंग करून घ्यावे. अशा वॉटरप्रूफिंग पद्धती किफायतशीर असण्याबरोबरच झटपट, सोयीच्या आहेत आणि इमारतीच्या मूळ रचनेला व सौंदर्याला धक्का न पोहोचवणाऱ्या आहेत.