संदीप धुरत

अक्षय्यतृतीया हा सोने किंवा मालमत्तेसारख्या मोठय़ा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. अनेक इच्छुक घर खरेदीदार वर्षांच्या या काळात त्यांची गृह आणि स्थावर मालमत्ता खरेदी करतात. अक्षय्यतृतीयेदरम्यान विकासक अनेक फायदेशीर ऑफर आणि सवलती देऊन खरेदी विक्री व्यवहारांना प्रोत्साहन देतात.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

अक्षय्यतृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरी तिथी आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही त्यांच्या ग्रहस्थानी सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. संस्कृतमध्ये अक्षय्य या शब्दाचा अर्थ अमर असा होतो, जे  कायम टिकते. परिणामी, या दिवशी केले जाणारे कोणतेही कार्य चिरकाल टिकते, असा विश्वास आहे. बहुधा या दिवशी लोकांनी धर्मादाय कार्य करण्यास सुरुवात केली आणि नंतर सोने आणि स्थावर मालमत्तेमध्ये  गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

अक्षय्यतृतीया हा सोने किंवा मालमत्तेसारख्या मोठय़ा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. अनेक इच्छुक घर खरेदीदार वर्षांच्या या काळात त्यांची गृह आणि स्थावर मालमत्ता खरेदी करतात. अक्षय्यतृतीयेदरम्यान विकासक अनेक फायदेशीर ऑफर आणि सवलती देऊन खरेदी विक्री व्यवहारांना प्रोत्साहन देतात.

भारतीय रिअल इस्टेट बाजार प्रामुख्याने महत्त्वाच्या सणासुदीच्या काळाचा विचार करून चालतो. परिणामी, अशा महत्त्वपूर्ण घटनेचा मालमत्ता विक्रीवर परिणाम होणे निश्चितच आहे. खरेदीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सण आणि शुभ दिवसांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. बहुतेक गृहखरेदीदार त्यांचे स्वप्नातील घर गुंतवणूक करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी अक्षय्यतृतीयेसारख्या दिवसांची वाट पाहत असतात. अनेक विकासक यावेळी विशेष ऑफर आणि सुलभ पेमेंट योजना ऑफर करतात, ज्यामुळे हा व्यवहार आणखी आकर्षक बनतो. तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची खरेदी आणखी खास बनवण्यासाठी ही योग्य वेळ असू शकते.

शुभ काळ : अक्षय्यतृतीया अनेक शुभ प्रसंगांची सुरुवात करते. अक्षय्यतृतीया हा कोणत्याही उपक्रमाच्या सुरुवातीसाठी, विशेषत: गुंतवणूक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी एक उत्तम दिवस आहे. या दिवशी खरेदी केलेली मालमत्ता चांगले परिणाम देणारी मानली जाते.

आकर्षक ऑफर्स : घर खरेदीदार अक्षय्यतृतीयेचा सर्वोत्तम फायदा मिळवण्याची योजना आखत असताना, विकासकांनी त्यांना सर्वोत्तम संधी सादर करण्याची योजना आखली आहे. खरेदीदारांसाठी घर खरेदी सुलभ करण्यासाठी, विकासक आकर्षक ऑफर घेऊन येतात. या दरम्यान, बँकांदेखील स्वस्त गृहकर्ज आणि इतर ऑफर जाहीर करतात ज्यामुळे घर खरेदी  करणे सोपे होते.

मालमत्ता विरुद्ध सोने : दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे. सोन्यासोबत, बाजारातील चढउतारांसोबत परतावाही चढ-उतार होऊ शकतो. मालमत्ता गुंतवणुकीमुळे तुम्हाला गृहकर्जाच्या परतफेडीवर कर लाभ आणि आयकर सूट मिळण्यास मदत होते.

वरील मुद्दे स्पष्ट संकेत देतात की, अक्षय्यतृतीया घर खरेदीसाठी योग्य वेळ ठरते. अशा प्रकारे, अक्षय्यतृतीयासारख्या सणांमुळे. गृहखरेदीदारांना व्यवहारात चांगला फायदा होऊन त्यांचे गृहखरेदीचे स्वप्न पूर्ण  होते. हे क्षेत्र तुलनेने स्थिर असल्याचे दिसून येत असल्याने, सुट्टीच्या हंगामाच्या अगोदर या उद्योगाला खूप आवश्यक चालना मिळेल असा अंदाज आहे.