सार्थक सेठ
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताचे औचित्य साधून ‘स्वत:चे घर’ या अधिक अर्थपूर्ण गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. अनेक कुटुंबांसाठी स्वत:चे घर खरेदी करणे म्हणजे स्थिरता, सुरक्षितता आणि यशाचे एक चिरंतन प्रतीक असते.

अक्षय्य तृतीया हा सण समृद्धी,  संपन्नता आणि शुभारंभाचे प्रतीक! काळ जसजसा पुढे जाईल तसतसे ज्यांचे मूल्य वाढत जाते अशा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा अतिशय शुभ मुहूर्त आहे अशी भारतीयांची आस्था आहे. अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा पूर्वापारपासून आहे, पण आजच्या काळात मात्र एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताचे औचित्य साधून ‘स्वत:चे घर’ या अधिक अर्थपूर्ण गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. अनेक कुटुंबांसाठी स्वत:चे घर खरेदी करणे म्हणजे स्थिरता, सुरक्षितता आणि यशाचे एक चिरंतन प्रतीक असते; ही सर्व मूल्ये अक्षय्य तृतीयेच्या आध्यात्मिक गोष्टींशी तंतोतंत जुळणारी आहेत. या काळात अक्षय्य मूल्य जपणार्‍या मालमत्ता पर्यायांचा विचार करताना, ‘रिअल इस्टेट’ अर्थात स्थावर मालमत्ता ही सर्वात प्रगल्भ आणि कमालीचे भावनिक समाधान देणारी निवड ठरत आहे.

घर खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेचे महत्त्व का वाढत आहे?

अक्षय्य तृतीयेला केलेल्या खरेदीचे मूल्य कैक पटींनी वृद्धिंगत होते, ही श्रद्धा आणि स्थावर मालमत्तेची दीर्घकालीन नफा किंवा ‘मूल्यवृद्धीची’ क्षमता या दोन्ही गोष्टी एकमेकींना खूप अनुरूप आहेत. पण केवळ भावनाच नव्हे, तर अनेक व्यावहारिक घटकदेखील या काळात घर खरेदीला गुंतवणुकीची एक उत्तम संधी बनवण्यात योगदान देत आहेत.

पहिला मुद्दा असा की, विकासकांसाठी अक्षय्य तृतीया ही एक धोरणात्मक संधी असते, अशा संभाव्य ग्राहकांशी जोडले जाण्याची- ज्यांचा कल आधीच महत्त्वपूर्ण खरेदी करण्याकडे असतो. सण-उत्सवाचे हे वातावरण घर खरेदीसाठी सकारात्मकता निर्माण करते, ज्यामुळे अनेकदा निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते. खासकरून घरांच्या बाजारपेठेत हे अधिक लागू होते, जिथे आर्थिक बाबींइतकीच भावनिक ओढदेखील मोलाची भूमिका बजावते. उल्लेखनीय बाब म्हणजे, उत्सवाच्या काळातील वाढत्या मागणीमुळे बाजारपेठेत एक सकारात्मक गती दिसून येत आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या (ङल्ल्रॠँ३ ा१ंल्ल‘ कल्ल्रिं) अहवालानुसार, गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात मुंबईत मालमत्ता नोंदणीमध्ये २३% वाढ झाली होती. ही मोठी वाढ दर्शवते की, अक्षय्य तृतीयेसारखे सांस्कृतिक सण ग्राहकांच्या मानसिकतेवर आणि व्यवहारांच्या प्रमाणावर लक्षणीय परिणाम करतात. विकासक या उत्साहाला विशेष ‘फेस्टिव्ह ऑफर्स’ आणून अधिक बळकटी देतात; उदाहरणार्थ, टाटा हाऊसिंगतर्फे ठाण्यातील ‘सेरीन’ ( री१ी्रल्ल) प्रकल्पात घर खरेदी केल्यास ३० ग्रॅम सोन्याचे नाणे, पुण्याजवळील ‘सेन्स ६६’ ( रील्ल२ी 66) मध्ये २० ग्रॅम आणि बेंगळूरु येथील ‘वर्णम’ (श्ं१ल्लंे) प्रकल्पात १० ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देण्याच्या मर्यादित कालावधीच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. अशा प्रकारे पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक गृहखरेदीचे निर्णय यांचा एक उत्तम मेळ घातला जात आहे.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, स्थावर मालमत्ता बाजारपेठ सध्या एका अतिशय रंजक महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. शहरांमध्ये वेगाने होणारा पायाभूत सुविधांचा विकास, सुधारलेली कनेक्टिव्हिटी आणि प्रशस्त तसेच उत्तम रचना असलेल्या घरांना मिळणारी वाढती पसंती… यामुळे आजचे खरेदीदार अधिक जागरूक आणि भविष्याचा विचार करून निर्णय घेत आहेत.

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, एक स्थिर आणि उत्तम गुंतवणूक ठरणारी मालमत्ता म्हणून रिअल इस्टेटबद्दल वाढलेली जागरूकता. सोने हे आजही समृद्धीचे प्रतीक मानले जात असले, तरी आजची पिढी स्थावर मालमत्तेकडे त्याच मूल्यांचे आधुनिक रूप म्हणून

पाहते: जे शाश्वत आहे, ज्याचे मूल्य कालानुरूप वाढत जाते आणि जे जीवनाचा दर्जा उंचावणारे आहे. शेवटी, व्याजदर स्थिरता आणि गृहकर्ज मिळवण्यातील सुलभता यामुळे स्वत:चे पहिले घर घेणार्‍या ग्राहकांसाठी परवडण्याजोग्या घराचा स्तर उंचावला असून, घर खरेदीचे स्वप्न आता त्यांच्या आवाक्यात आले आहे.

पारंपरिक मुहूर्त- जो प्रत्यक्ष निर्णयांना दिशा देतो

एकूणच, अक्षय्य तृतीयेने आपल्या पारंपरिक सीमा ओलांडून आता स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा सण सांस्कृतिक श्रद्धा, भावनिक आकांक्षा आणि आर्थिक शहाणपण यांचा सुरेख संगम घडवून आणतो, ज्यामुळे घर खरेदीसाठी हा एक आदर्श मुहूर्त ठरतो. विकासक आणि खरेदीदार या दोघांसाठी हा सण ‘संधी’ आणि ‘खरेदीचा ठाम हेतू’ यांचा एक मोलाचा मिलाप घेऊन येतो; ज्यामुळे घर खरेदीची प्रक्रिया केवळ एक व्यवहार उरत नाही, तो एक अर्थपूर्ण आणि मंगलमय टप्पा बनतो.

अशा प्रकारे हा सण एक आश्वासक जाणीव करून देतो की, काही परंपरा काळासोबत अत्यंत सुंदररीत्या विकसित होतात. आजच्या काळात आर्थिक निर्णय केवळ आकडेवारीवर आधारित असण्याचे प्रमाण वाढले आहे, तिथे अक्षय्य तृतीया हा सण श्रद्धा आणि सकारात्मकतेचा भाव जपतो; ज्यामुळे लोकांना स्वत:च्या घराचे स्वप्न एका शाश्वत वास्तवात बदलण्याची प्रेरणा मिळते.

(लेखक टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख आहेत.)