सागर नरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक आणि दळणवळणाच्या सर्वच प्रकारच्या साधनांनी अंबरनाथ शहर जोडले गेले आहे. अंबरनाथ शहराच्या विस्तारित पाले भागात अर्थात नवीन अंबरनाथमध्ये त्याचा प्रतिबिंब पहायला मिळते आहे. अंबरनाथ शहरात वेगाने पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो स्थानक, अत्याधुनिक रुग्णालये, विस्तारित रस्ते, मुबलक पाणी, मार्केट प्लेस, शाळा, सभागृह अशा अनेक सुविधा येथील शहरात आजच्या घडीला उपलब्ध होणार आहेत. अंबरनाथपासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले आहे.

मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेले कल्याण पल्याडचे चौथ्या मुंबईतील महत्त्वाचे शहर म्हणून अंबरनाथची ओळख आहे. उद्योगाचे शहर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. मराठी बहुल असलेले अंबरनाथ नैसर्गिकदृष्टय़ाही संपन्न शहर आहे. पूर्वेतील बहुतांश भाग झाडांनी व्यापला असून पश्चिमेतील आयुध निर्माणीमुळे शहराचा मोठा भाग हिरवागार आहे. त्यासह शहराच्या दोन्ही बाजूंना डोंगरांची रांग आहे. शहरात सध्याच्या घडीला विविध प्रकारची विकासकामे वेगाने सुरू आहेत. शहराने गेल्या काही वर्षांत नवी ओळख निर्माण केली आहे. शहरात गेल्या काही वर्षांत विविध प्रकल्प उभारले जात आहेत. ठाणे जिल्ह्यची ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिराचा भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे जीर्णोद्धार केला जातो आहे. तर आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथचे शिवमंदिर देशभरासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

शहरात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शूटिंग रेंज उभारण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्यात ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजची उभारणी करण्यात आली आहे. त्याच दर्जाचे शूटिंग रेंज हे अंबरनाथ शहरात आहे. या शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेतलेले अनेक खेळाडू जागतिक स्पर्धामध्ये सहभागी झाले आहेत आणि होत आहेत.

अंबरनाथ शहर येत्या काही वर्षांत महापालिकेमध्ये रूपांतरीत होणार आहे. त्यामुळे शहरात महापालिकेच्या दर्जाच्या सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. प्रशासकीयदृष्टय़ा वाढत्या शहरांचा कारभार सुरळीत करण्यासाठी सध्या सुसज्ज अशा प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. सांस्कृतिक शहर असलेले अंबरनाथ शहर शैक्षणिकदृष्टय़ाही संपन्न आहे. अंबरनाथ शहरात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दि एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी महाविद्यालय, पी. डी. कारखानीस महाविद्यालय यांसारखी महाविद्यालये, जोंधळे तंत्रविद्यालये यांसह विविध संस्थांच्या शाळाही शहराच्या शिक्षण क्षेत्रात मोलाची भर घालत आहेत. या शाळांमधून शिकलेले विद्यार्थी देश, परदेशात अंबरनाथचे नाव मोठे करत आहेत. शैक्षणिकदृष्टय़ा प्रगती करणाऱ्या अंबरनाथ शहरात नव्याने उभारले जाणारे स्पर्धा परीक्षा केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. यूपीएससी, एमपीएससी यांसह विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून या केंद्राची उभारणी केली जाते आहे. त्यामुळे अंबरनाथकरांना स्पर्धा परीक्षांचे महागडे शिक्षण कमी दरात उपलब्ध होणार आहे.

वाहतूक आणि दळणवळणाच्या सर्वच प्रकारच्या साधनांनी अंबरनाथ शहर जोडले गेले आहे. अंबरनाथ शहराच्या विस्तारित पाले भागात अर्थात नवीन अंबरनाथमध्ये त्याचा प्रतिबिंब पहायला मिळते आहे. अंबरनाथ शहरात वेगाने पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो स्थानक, अत्याधुनिक रुग्णालये, विस्तारित रस्ते, मुबलक पाणी, मार्केट प्लेस, शाळा, सभागृह अशा अनेक सुविधा येथील शहरात आजच्या घडीला उपलब्ध होणार आहेत. अंबरनाथपासून नवी मुंबई, मुंबई, ठाणे अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले आहे.

अंबरनाथ शहर काटई कर्जत या राज्य मार्गाने जोडला गेलेला आहे. येथून जवळच खोणी तळोजा मार्गाद्वारे थेट नवी मुंबई आणि नवे विमानतळ काही मिनिटांवर आहे. प्रस्तावित बदलापूर मेट्रो रेल्वेची दोन स्थानके अंबरनाथमध्ये आहेत. यासोबतच शहरात विस्तीर्ण रस्ते उभारले जात आहेत. या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले असून अंतर्गत वाहतूक बिनदिक्कत होण्यासाठी घरे उभारण्यापूर्वीच रस्ते तयार केले गेले आहेत. नवे अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर शहराशी याच रस्त्यांनी जोडले गेले आहेत. अंतर्गत रस्त्यांना करण्यात आलेली विद्युत रोषणाई केल्याने एखाद्या महानगरात फिरल्याचा अनुभव येतो.

अंबरनाथमध्ये पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करण्यात आले आहेत. काही भागात विकासकांनी स्वत: पाण्याचा जलकुंभ उभारला असून एमआयडीसी, जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराच्या तुलनेत येथे पाण्याचा मुबलक पुरवठा आहे. पाण्यासोबतच सांडपाणी वाहून नेण्याची सक्षम व्यवस्था येथे उभारण्यात आली आहे.

नवे औद्योगिक क्षेत्र

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ शहरात यापूर्वीच मोठय़ा प्रमाणावर उद्योग आहेत. त्यातच आता पाले येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आपल्या औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करत आहे. शेकडो नव्या कंपन्या पाले भागात सुरू होणार आहेत. त्यामुळे या भागात नव्याने रोजगाराची निर्मिती होणार आहे.

अत्याधुनिक रुग्णालय

करोनाच्या संकटा रुग्णालयांची गरज प्रकर्षांने जाणवली. मात्र नव्या अंबरनाथमध्ये गृहसंकुलांच्या जोडीलाच रुग्णालयांची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे या भागात अद्ययावत रुग्णालय उभारले जाते आहे. अंबरनाथ शहरात यापूर्वीच राज्य शासनाचे रुग्णालय असून पालिकेच्या माध्यमातून आणखी तीन रुग्णालयांचे प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. त्यामुळे अंबरनाथ आरोग्य दृष्टीने सक्षम होण्याकडे वाटचाल करत आहे.

परवडणारी घरे

अंबरनाथ शहराच्या पाले, चिखलोली, कोहोज, खुंटवली या भागात नव्याने शहराचा विस्तार होतो आहे. विविध नामांकित बांधकाम व्यावसायिकांसह स्थानिक व्यावसायिकांनी विस्तारित भागात सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. या सर्व भागात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे बजेट घरांची उपलब्धता मोठी आहे. एक बीएचके, दोन बीएचके, तीन बीएचके अशा विविध घरांचे पर्याय, विविध प्रकारच्या फायनान्शियल सोयीसुविधांसह उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath developed center mumbai railway ysh
First published on: 11-12-2021 at 01:45 IST