कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ तंत्रज्ञानातील क्रांती नाही, तर ती नोकऱ्या, उत्पन्न संरचना, कामाची पद्धत आणि शहरी अर्थव्यवस्था यांमध्ये मूलभूत बदल घडवून आणत आहे. विशेषतः उच्च पगाराच्या, ज्ञानाधारित (white-collar) नोकऱ्यांवर AI चा परिणाम लवकर आणि तीव्र स्वरूपाचा दिसू लागला आहे. याचा थेट परिणाम व्यावसायिक कार्यालयीन जागा (commercial real estate) आणि गृहनिर्माण बाजारपेठ (housing real estate) यांवर होणार आहे.

व्यावसायिक रिअल इस्टेटवर (Commercial Spaces) परिणाम मुंबई, बेंगळुरू, दिल्ली-NCR, हैदराबाद, पुणे यांसारख्या महानगरांमध्ये आयटी, फायनान्स, कन्सल्टिंग, कायदा, मीडिया आणि स्टार्टअप्ससाठी मोठ्या प्रमाणावर कार्यालयीन जागा उभारण्यात आल्या आहेत.

AI मुळे अनेक कंपन्या कमी कर्मचारी + अधिक ऑटोमेशन या मॉडेलकडे वळत आहेत. Work-From-Anywhere आणि Remote-First धोरण कायमस्वरूपी होत आहे. मोठ्या, महागड्या कार्यालयांची गरज कमी होत आहे. याचा परिणाम Grade-A ऑफिस स्पेसमध्ये रिक्तता (Vacancy) वाढणे, दीर्घकालीन लीजऐवजी लवचिक, अल्पकालीन करार, को-वर्किंग स्पेसचे स्वरूप बदलणे (फक्त मीटिंग/हब म्हणून वापर) असा झाला आहे.
बीकेसी, लोअर परेल, नरीमन पॉइंट, सायबर सिटी, व्हाईटफिल्ड यांसारख्या भागांतील भाडे-दरांवर दबाव थोडक्यात, व्यावसायिक रिअल इस्टेट हे ग्राेथ ॲसेटवरून रीपर्पज ॲसेट होत आहे.

उच्च पगाराच्या नोकऱ्या गेल्यावर गृहनिर्माण बाजारावर परिणाम :

AI चा सर्वात मोठा धक्का २५-५० लाख रूपये आणि त्यापुढील पगार गटाला बसण्याची शक्यता आहे- जे गट महागड्या घरांचे EMI भरतात, प्रीमियम लोकेशन्समध्ये राहतात, लक्झरी हाउसिंगला चालना देतात. नोकऱ्या गेल्यावर EMI भरण्यात अडचणी येतात. भाड्याच्या घरांकडे परत जाण्याचा कल वढतो, दुसऱ्या-तिसऱ्या घरांची मागणी घटणे. त्याचा परिणाम असा होतो की लक्झरी आणि प्रीमियम हाउसिंगमध्ये मंदी येते. घरांच्या किंमती स्थिर राहतात किंवा काही भागांतील घरांच्या किंमती कमी होतात. विकासकांना (developers) स्टॉक क्लिअर करण्यात अडचण येते. मुंबई, बेंगळुरू, गुरुग्राम, नोएडा, हैदराबाद याठिकाणी हा बदल २–५ वर्षांत स्पष्टपणे जाणवेल.

शहरी स्थलांतराचा (Urban Migration) उलटा प्रवाह पूर्वी ग्रामीण → शहरी → मेट्रो सिटीज असा होता. आता मेट्रो → टियर-2 / टियर-3 शहरं → मूळ गाव असा प्रवाही सुरू आहे. कारण गावात राहूनही काम करू शकतो. खर्च कमी होतो. नोकरीतील अनिश्चिततेमुळे मेट्रो शहरांतील घरांची मागणी कमी होते. टियर-२ शहरांमध्ये मध्यम किमतीच्या घरांना चालना मिळते.

पुढील १० वर्षांचे वास्तव :

जर योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर व्यावसायिक जागा मोठ्या प्रमाणावर रिकाम्या होतील.काही भागांत हाऊसिंग बबल (घरांच्या किंवा मालमत्तेच्या किमतीत मागणीपेक्षा जास्त आणि अनियंत्रित वाढ होणे) फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. बेरोजगारीमुळे सामाजिक ताण वाढतो. AI ही संधीही आहे आणि धोकादेखील आहे.

उपाय काय करायला हवेत?

सरकारसाठी :

  • रिकाम्या ऑफिस स्पेसचे निवासी / शिक्षण /इनोव्हेशन हबमध्ये रूपांतर करणे.
  • कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय एआय आधारित कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण करणे.
  • गृहनिर्माण कर्जांमध्ये Job-Loss Protection Policies
  • टियर-2 शहरांमध्ये पायाभूत सुविधा वेगाने उभारणे
  • रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी लक्झरी घरांपेक्षा परवडणाऱ्या घरांवर भर देणे
  • Live-Work-Learn संकल्पनेवर आधारित प्रकल्प राबविणे
  • शॉर्ट-टर्म लीज आणि हायब्रिड युझेस मॉडेल वापरणे.

AI मुळे भारतातील रिअल इस्टेट बाजार कोसळणार नाही, पण तो मुळापासून बदलणार आहे.
मुंबईसारखी शहरे आकाराने लहान होणार नाहीत, पण त्यांची भूमिका बदलेल.

Sdhurat@gmail.com