सद्य:स्थितीत अनेक वेळा साधेपणा म्हणजे भोळेपणा किंवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिकीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकरण यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपलं केवळ नीटनेटकं राहणं हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळं आणि आकर्षक दिसणं आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या तरीही केवळ सुंदर असणंसुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काही जणांचा कल असतो.
काही वेळा काळाची गरज म्हणून, तर कधी आवड म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात असतो. अर्थातच, अशा सौंदर्यप्रसाधनांचा वापर प्रत्येकाला घरी करणं शक्य होतंच असं नाही, अथवा जरी शक्य असेल तरीही नेहमी ते घरी जमेलच असं नाही. अशा वेळी निश्चितच व्यावसायिक ब्युटी पार्लरकडे धाव घेतली जाते. हल्ली अशी ब्युटी पार्लर्स अगदी छोटय़ा गल्लीबोळातसुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यांच्यातही सध्या व्यावसायिक स्पर्धा सुरू असल्याचं दिसून येतं. या स्पध्रेला स्वाभाविकच सामोरं जाण्यासाठी त्याचं व्यावसायिक वास्तूचं सौंदर्य आकर्षति करणारं इतरांपेक्षा वेगळं असणं अनिवार्य झालं आहे.
सौंदर्यविषयक सेवासुविधा देणारं हे ब्युटी पार्लर मुळातच सुंदर असणं आवश्यकच नाही तर अशा सेवासुविधांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला साहजिकच ते अपेक्षित असणं स्वाभाविक असतं. पूर्वी ज्या ठिकाणी केवळ केस कापण्याची अथवा हेअरस्टाइल करण्याची व्यवस्था असायची त्या ठिकाणी आता सौंदर्यविषयक इतरही सेवासुविधा उपलब्ध झाल्याचं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी तर एका सोबत आजूबाजूला थाटली गेलेली अशी अनेक सौंदर्यप्रसाधनगृह आपापसात स्पर्धा करत असल्याचं दिसून येतं. त्यांच्याकडे जाणाऱ्यांचा चेहरामोहरा बदलण्याची कामगिरी करणाऱ्या ब्युटी पार्लर्सना आपला स्वत:चा चेहरा देखील हसतमुख, आकर्षक, विश्वासदर्शक ठेवावा लागतो, तो सजवावा आणि खुलवावा लागतो.
सुरुवातीला केवळ महिलांना सेवा देणाऱ्या ब्युटी पार्लर्सचं प्रमाण वाढत गेलं. हल्ली मात्र काही ब्युटी पार्लर्समध्ये स्त्री आणि पुरुषांसाठी अनेकविध सौंदर्यविषयक सेवासुविधा उपलब्ध असतात. अर्थात, यामध्ये काही ब्युटी पार्लर्स ही केवळ स्त्रियांसाठीच असतात, तर काही केवळ पुरुषांसाठी. अलीकडच्या दिवसांमध्ये तर या ब्युटी पार्लर्सची जागा ‘स्पा’नं घेतली आहे. ब्युटी पार्लर कोणतंही असलं तरीही त्याचं अंतरंग हे सुंदरच असलं पाहिजे, ते सुसज्ज असलं पाहिजे. अशा ठिकाणी सर्व नवनवीन अत्याधुनिक सोयीसुविधा केलेल्या असणं जरुरीचं झालं आहे. या ब्युटी पार्लर्समध्ये अनेकविध सेवा उपलब्ध केलेल्या असतात. अर्थातच या सर्व सेवा देण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्यानुसार ब्युटी पार्लर्सचं अंतर्गत संरचनेचं काम करावं लागतं. यामध्ये वॉिशगच्या जागेला तसेच हेअर वॉशला अधिक महत्त्व द्यावं लागतं. याचबरोबर वापरल्या जाणाऱ्या टॉवेल, नॅपकीन तसेच अॅप्रन्स ठेवण्यासाठी अथवा वाळवण्यासाठी योग्य सोय करावी लागते.
मसाज, हेअरस्टाइल, हेअर रिमुव्हल-व्हॅिक्सग अथवा थ्रेिडग, सन टॅिनग, फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, नेल्स रिमुव्हल आणि शेिपग, नेलआर्ट, टॅटू आणि बॉडी पेंटिंग, फेशियल आणि बॉडी टोिनग अशा अनेक सेवा या स्पा अथवा ब्युटी पार्लर्समधून दिल्या जात असतात. या प्रत्येक सेवेसाठी एका विशिष्ट प्रकारची अंतर्गत संरचना करणं गरजेचं असतं. या ठिकाणी सौंदर्याच्या दृष्टिकोनातून अंतर्गत संरचनात्मक सजावट करताना रंगसंगती, प्रकाश योजना आणि आरशांचा तसेच काचेचा अधिकाधिक विचारपूर्वक वापर करावा लागतो.
अंतर्गत संरचना आणि सजावट करत असताना प्रथमत: त्या जागेचा आकार आणि आकारमान माहीत करून घेणं जरुरीचं असतं. व्यावसायिक जागांच्या बाबतीत तर अंतर्गत सजावटीच्या कामात प्रत्येक इंच न इंच उपयोगात, वापरात आणायचा असतो. वापरलेला प्रत्येक इंच कशाप्रकारे सजवला आणि खुलवला आहे, यावरून अंतर्गत रचनाकाराचं कसब दिसून येत असतं. अनेक ब्युटी पार्लर्सचं काम अत्यंत उच्च व्यावसायिक पातळीवर चालत असतं, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी वेळ निश्चित करून तसेच अपेक्षित सेवा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या भेटीची वेळ काही वेळा अनेक दिवस अगोदर ठरवून घ्यावी लागते. काही ठिकाणी वार्षकि सभासदत्व देण्याची सोय उपलब्ध असते. अनेक प्रकारच्या उच्च प्रतीच्या सेवा याद्वारे उपलब्ध केलेल्या असतात. अर्थातच त्यासाठी स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्ती अशा ठिकाणी कार्यरत असतात. अंतर्गत सजावटीच्या दृष्टिकोनातून अशा व्यक्तींसाठी ब्युटी पार्लर्समध्ये स्वतंत्र दालन असणं जरुरीचं असतं.
ब्युटी पार्लरची जागा नेमकी कोठे आहे यावरूनही त्याची अंतर्गत संरचना आणि एकूणच सजावट कशी असावी हे ठरवावं लागतं. अद्ययावत ब्युटी पार्लरमध्ये प्रथमदर्शनी स्वागत कक्षाची आणि सेवा घ्यायला येणाऱ्यांसाठी बठकीची व्यवस्था करणं अर्थातच आवश्यक असतं. त्यांच्याशी सल्लामसलत करणाऱ्या माहीतगार, तज्ज्ञ तसेच त्या क्षेत्रातल्या शिक्षण घेतलेल्या समुपदेशकाचं अथवा सल्लागाराचं एक स्वतंत्र दालन असावं. ज्या ठिकाणी त्या ब्युटी पार्लरमध्ये सेवा घ्यायला येणारी व्यक्ती स्वत:च्या गरजा आणि अपेक्षा याविषयी सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ शकेल. या ब्युटी पार्लर्समधून दिल्या जाणाऱ्या विशेष सेवासुविधांप्रमाणे आवश्यक ती फíनचर तसेच इतर अंतर्गत सजावट करून घ्यावी लागते. त्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या सेवा कशा तऱ्हेनं उपलब्ध केल्या जाव्यात हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. संरचना करत असताना ब्युटी पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंची तसेच विजेच्या उपकरणांचीदेखील अभ्यासपूर्वक माहिती करून घ्यावी लागते. त्यांना लागणारी जागा, त्यांचा वापर करण्याची पद्धत, त्यांचा आकार आणि आकारमान, त्यासाठी आवश्यक असणारी विद्युतीकरणाची सुविधा, त्यांची देखभाल अशा अनेक बाबींची माहिती करून घ्यावी लागते. सर्वच अथवा काही सेवांसाठी ठराविक फíनचर अथवा काही विशिष्ट व्यवस्था केलेली असावी लागते. जागेअभावी काही व्यवस्था ही सामायिकरीत्या वापरता येऊ शकते.  
हेअरस्टाइल : हेअरस्टाइल करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या खुर्चीची आवश्यकता असते. त्याचे अर्थातच मोजमापही निराळे असते. अशा खुर्चीच्या किमान तीन बाजूंनी हेअरस्टाइल करणाऱ्यासाठी फिरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करावी लागते. या खुर्चीची जागा अर्थातच िभतीच्या जवळ आणि खुर्ची िभतीकडे तोंड करून ठेवलेली असावी लागते. त्या िभतीवर मोठय़ा आकारातला आरसा लावलेला असावा. तो अशाप्रकारे लावण्यात यावा जेणेकरून खुर्चीत बसलेल्या व्यक्तीला हेअरस्टाइल अथवा हेअरकट कशाप्रकारे होत आहे हे नीटपणे दिसू शकले पाहिजे. या आरशाच्या खालील बाजूला िभतींवर छोटेखानी काऊंटरसारखं डेस्क असावं ज्यावर विविध हेअरस्टाइलसाठी लागणाऱ्या लहानसहान वस्तू ठेवल्या जाऊ शकतात आणि गरजेप्रमाणे त्या सहजपणे वापरतादेखील येतात. याच ठिकाणी िभतींवर विद्युतीकरण केलेले असणं आवश्यक असतं. आरशाच्या वरील बाजूस िभतीवर विशिष्ट प्रकारची प्रकाशयोजना केलेली असणंदेखील गरजेचं असतं.   
हेअर रिमुव्हल- व्हॅिक्सग अथवा थ्रेिडग : या स्वरूपातलं काम सहसा छोटेखानी बेडवर केलं जातं, त्यामुळे त्यासाठी याचं ठिकाण अर्थातच ब्युटी पार्लरच्या आतील बाजूस असावं लागतं. जागा मोठी असल्यास एकाच वेळी एकापेक्षा जास्त बेडची व्यवस्था करता येऊ शकते. परंतु अशा ठिकाणी दोन बेड्सच्या जागा स्वतंत्र दालनामध्ये असाव्यात अथवा दोन्हींच्या मध्ये पडदा लावणं सयुक्तिक ठरतं. अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या पडद्यांचा वापर करणं योग्य ठरतं.  
नेल्स रिमुव्हल, शेिपग आणि नेलआर्ट : नेल्स रिमुव्हल, शेिपग आणि नेलआर्टच्या कामासाठी स्वतंत्र बठकीची व्यवस्था करता येऊ शकते. हे काम करणारी व्यक्तीदेखील निराळी असू शकते. या कामासाठी जागाही फारशी लागत नाही. या ठिकाणी रंगांचा वापर करणं गरजेचं असल्यामुळे अशा ठिकाणी विविध प्रकारचे रंग ठेवण्यासाठी कपाटाची सोय करावी लागते.
मेनिक्युअर आणि पेडीक्युअर : हातापायाच्या सौंदर्यासाठी आणि त्यांच्या निगराणीसाठी मेनिक्युअर आणि पेडीक्युअरच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात. यांची व्यवस्था नेलआर्टच्या दालनाच्या जवळ असल्यास योग्य ठरतं. या सुविधेचा लाभ घेऊन एखाद्याला नेल्स रिमुव्हल, शेिपग आणि नेलआर्टची सेवा घेता येऊ शकते.
टॅटू आणि बॉडी पेंटिंग : नेलआर्टप्रमाणेच यासाठी स्वतंत्र बठकव्यवस्था असावी लागते. अथवा नेलआर्ट आणि टॅटू आणि बॉडी पेंटिंग करण्याचं काम एकाच दालनामध्ये करता येऊ शकतं. हे विशेषत: दर्शनी भागात असलं तरी चालू शकतं. किंबहुना ते दर्शनी भागात असल्यास ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या प्रत्येकास ते बघता येऊ शकतं. एकप्रकारे या कामाची जाहिरातच अशा तऱ्हेनं होऊ शकते.
फेशियल आणि बॉडी टोिनग : फेशियलचं काम हेअरस्टाइलच्या खुर्चीवर होऊ शकतं, परंतु बॉडी टोिनगसाठी मात्र स्वतंत्रपणे छोटय़ाशा बेडची गरज असते. या कामानंतर वॉश घेण्याची सुविधादेखील उपलब्ध केलेली असावी लागते आणि त्यामुळे हे काम वॉशरूमच्या जवळ असणं सयुक्तिक ठरतं.   
सन टॅिनग आणि मसाज : मसाज करण्यासाठी येणारी व्यक्ती अर्थातच पुरेसा वेळ काढूनच आलेली असते. या कामासाठी हेअर रिमुव्हल-व्हॅिक्सग अथवा थ्रेिडगसाठी केल्या जाणाऱ्या व्यवस्थेप्रमाणेच सोय करावी लागते. अथवा ही सर्वच कामं एकाच ठिकाणी करता येऊ शकतात.
आपण सुंदर दिसावं असं वाटत नसणारी व्यक्ती सापडणं विरळाच! या सौंदर्याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. आपल्या सौंदर्याची वाहवा व्हावी, इतरांपेक्षा आपलं व्यक्तिमत्त्व वेगळं असावं अथवा तसं ते दिसावं, ते सर्वामध्ये खुलून दिसावं असं वाटणारी प्रत्येक व्यक्ती पार्लरच्या ब्युटीफुल लुकवर फिदा झाल्याशिवाय राहात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beauty parlour decoration location
First published on: 08-02-2014 at 05:50 IST