दिवाळीत भिंतीला द्या नवी झळाळी

भारतात प्रांतानुसार भिंती सजवण्याच्या पद्धतीही बदलत असतात. त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने रंगकाम-मातीकाम होतं

श्रीनिवास बाळकृष्ण

अंधाऱ्या गुहेत राहणारे आदिवासी उपलब्ध साधनाने गुहेच्या दगडी भिंती रंगवत. आदिवासींच्या घराच्या भिंतीवरही अशी चित्रं आजही दिसतील. अजिंठा लेण्यांसारखीच नवी मंदिरभिंती चित्रांनी सजलेल्या असतात. जुन्या वाडय़ांच्या भिंतींवरही चित्रं असतात. कोकणातील नव्या घरात लोक हौसेने देवकथांची चित्रं काढून घेतात. भारतात प्रांतानुसार भिंती सजवण्याच्या पद्धतीही बदलत असतात. त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने रंगकाम-मातीकाम होतं. कधी कधी भिंती बांधतानाच त्यावरल्या चित्राची संकल्पना डोक्यात ठेवली जाते. गरीब असो वा श्रीमंत राहत्या घरात सजवलेल्या भिंती आनंद निर्माण करतात.

इतकं सगळं असताना घराच्या भिंती सपाट, गुळगुळीत, बेदाग आणि एकरंगी असण्यातलं शहरी सौंदर्य शहरी डोळ्यांमध्ये कुठून आलं देव जाणे! पण मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत घराच्या भिंती आतून अशाच फिकट रंगात असतात आणि त्यांची पुढे अनेक दुखणी असतात. त्यावरली धूळ, भिंतीला ओल असताना निघालेले पापुद्रे इत्यादी इत्यादी.. आणि अशा थोडय़ाफार डागडुजीला काही वर्षांनी किंवा सण समारंभात हात लागतो. दिवाळीआधी रंगकाम केले जाते.

मात्र करोनाकाळात अनेकांनी बाहेरील रंगाऱ्यांना टाळण्याचा पर्याय स्वीकारला. त्यात एखाद् भिंतीसाठी पूर्ण घराला रंग देणं परवडण्यासारखंही नसतं. दिवाळीत सणांची व पाहुण्यांची लागोपाठ रेलचेल असताना अशा भिंतींचं काय करावं यावर स्वस्तात, थोडक्यात व तात्पुरता मार्ग!

फोटोत पाहून साधारण अंदाज येईलच. तरीही..

१. भिंतीवरली धूळ ओल्या फडक्याने स्वच्छ करा.

२. भिंतींवर रंग-लांबीचे पापुद्रे आले असतील तर ते असे काढून घ्या. (खूप उकरण्याचा प्रयत्न नको. सहज जितकं होईल तितकंच.)

३. वॉटर बेस प्राइमर किंवा डिस्टमेंपर घ्या. आणि त्या रंगाची साधरण शेड बनेल असा स्टेनर. हे रंग कुठल्याही धातू, कपडे, लाकडावर बसू शकतात.

४. स्पंज रोलरच्या साहाय्याने पाचेक मिनिटांत केवळ त्याच भागात हा बेस मारता येतो. कदाचित दोनदा (कोट) मारल्यास भिंत एकसारखी दिसेल. हा रंग चटकन सुकतो. सुकल्यावर वेगळा दिसतो.

५. साधारण एका गडद, विरोधी रंगसंगतीतला रंग घ्या. काळा-पांढरा, हिरवा लाल, निळा-नारंगी, पिवळा-जांभळा या विरोधी रंग जोडय़ा! त्यांच्यात पांढऱ्या-काळ्या रंगाने शेड बदलता येईल.

६. पेन्सिलने आरेखन करून छोटय़ा ब्रश अथवा स्टेन्सिल्स-स्पंजच्या  साहाय्याने यावर काम करता येईल.

७. नेटवरून एखादं झेपेल असं सोपं डिझाइन प्रिंटून रेफरन्स म्हणून वापरता येईल. सोशल मीडिया किंवा यूटय़ूबवर सोप्या डिझाइन्स तुम्हाला पाहता येतील.

http://www.shirba.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best colours for home walls this diwali house painting in diwali zws

Next Story
व्हॅटचे ओझे सदनिका खरेदीदारांवरच!
ताज्या बातम्या